१६ आमदारांची तिरडी बांधलीये, फक्त हे राम म्हणायचं बाकी -संजय राऊत.

मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची राजकीय तिरडी बांधलेली आहे, फक्त हे राम म्हणायचं बाकी आहे, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.एकनाथ शिंदे यांच्यासहित १६ आमदार अपात्र ठरतील, याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. त्याचवेळी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागेल, जर त्यांनी निर्णय घेतला नाही तर संसदीय राजकारणाच्या इतिहासात त्यांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिलं जाईल, असेही सांगायला राऊत विसरले नाहीत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत