नवी मुंबई मध्ये सीनियर सिटीजन ना बसने मोफत प्रवास

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी तर्फे भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना १७ मार्च २०२३पासून एसटीमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहेच. आता दिवाळीचे औचित्त्य साधत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा बोनस एनएमएमटीने दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असलेल्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी (NMMT) बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा आजपासून म्हणजे रविवार, १३ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे. तसेच लोकप्रतिनिधी आणि ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या मागणीमुळे पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिवाळी सणाचे औचित्य साधत १३ नोव्हेंबर २०२३ पासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एनएमटी बसचा प्रवास मोफत असेल, असे जाहीर केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत