भाजप सत्तेत असो की काँग्रेस सत्तेत असो आंबेडकरी वंचित जनतेला काय मिळालंय? आपण जे काही मिळवलंय ते सत्तेशी भांडून मिळवलंय…

समाज माध्यमातून साभार
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, उध्दव ठाकरे, शिंदे यांनी आंबेडकरी जनतेला फक्त त्रास दिला आहे. मराठवाड्यातील नामांतर दंगली आठवा, रमाबाई नगर हत्याकांड आठवा, खैरलांजी हत्याकांड आठवा, भीमा कोरेगाव येथे झालेला हल्ला आठवा आणि आताच सोमनाथ सूर्यवंशी यांचा व्यवस्थेने घेतलेला बळी लक्षात घ्या. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या सर्वांची मिलीभगत दिसेल. विसरू नका खैरलांजी गावाला तंटामुक्त गावाचा खिताब देणारी ही लोक आहेत.
कधी खाजगीकरणाच्या माध्यमातून तर कधी क्रिमिलेयरच्या माध्यमातून आरक्षणावर घाला घालण्यात भाजप आणि काँग्रेस व सर्वच प्रस्थापित पक्ष यांचे सर्वांचे एकमत दिसेल.
प्रत्येकवेळी आपल्या सोबत फक्त आंबेडकरी पक्ष उभा असतो.. फक्त आंबेडकरी नेता उभा असतो. या जातीयवाद्यांना आंबेडकरी समाजाची हीच लढव्यी ताकद संपवायची आहे.त्यांना आंबेडकरी राजकारण संपवायचे आहे. यासाठी यासर्वांनी मिळून ॲड.बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला टार्गेट केले आहे एकदा का वंचित बहुजन आघाडी संपली की यांना विरोध करायला कोणी उरणार नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळ टिकून राहावी यासाठी आंबेडकरवादी जनतेने प्रयत्नशील असायला हवे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत