शेख जावेद खुर्शिद यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

बीड: साप्ताहिक द स्कूल एक्स्प्रेस बीड, आविष्कार कोचिंग क्लासेस व युनिक कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५ चा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, नगर रोड, बीड येथे उत्साहात संपन्न झाला.
द स्कूल एक्स्प्रेस मागील तेरा वर्षांपासून मराठवाडा विभागातील शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेले एकमेव वृत्तपत्र आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित व्यक्तींच्या सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यासाठी व त्यांच्या कार्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी वृत्तपत्राच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात जामखेड (अहमदनगर) येथील पंचायत समिती अंतर्गत समग्र शिक्षा अभियान मध्ये विषयतज्ञ या पदावर कार्यरत श्री. शेख जावेद खुर्शिद अहमद यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. जावेद सर गेल्या १८ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी समाजातील विविध घटकांसाठी तसेच शाळेतील आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. सन २००७ ते २०१३ या काळात बीड जिल्ह्यात आणि २०१४ पासून अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यात त्यांनी आपले योगदान दिले आहे.
यापूर्वी श्री. शेख जावेद खुर्शिद यांना मुप्टा ऊर्दू शिक्षक संघटनेतर्फे मौलाना अबुल कलाम आझाद आदर्श विषयतज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर श्री. जावेद खुर्शिद यांनी द स्कूल एक्स्प्रेसचे संपादक श्री. शेख एजाज यांचे आभार मानले.
पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड शहराध्यक्ष मा. श्री. खुर्शिद आलम, क्रांतिकारी शिक्षक संघटनेचे संस्थापक व राज्य सचिव श्री. शाहीद कादरी, तसेच अध्यक्ष स्थानी सेवा निवृत्त प्राचार्य व मराठवाडा शिक्षक संघ बीडचे श्री. डी. जी. तांदळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री. जावेद खुर्शिद यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व्यक्त केले जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत