मविआ – म्हणजे भाजपचा स्लीपर सेल.

राज्यात सोलापूर, नागपूर आणि भंडाऱ्यात भाजप सोबत जाणाऱ्या काँग्रसने भाजप आणि काँग्रेसची विण किती घट्ट आहे याची प्रचिती करून दिली आहे.शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीये. राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे.असे वक्तव्य नुकतेच प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री ह्यांनी केले आहे.कारण २०१४ ला भाजपाला बाहेरून पाठिंबा देणारे शरद पवार असून २०१९ मध्ये पहाटे अजित पवार भाजप सोबत शपथ घेऊन स्वतःच्या सिंचन घोटाळ्यात आणि शिखर बँक घोटाळा प्रकरणात क्लीन चीट घेऊन परतले होते आणि पुन्हा मविआ मध्ये उपमुख्यमंत्री बनले.आता पक्ष फुटीच्या नौटंकी मध्ये सत्तेत आणि विरोधात राष्ट्रवादी कायम ठेवण्याचा खेळ सुरू आहे.शिवसेनेने तर राज्यात २५ वर्षे भाजप वाढविण्याचे काम केले आहे.त्यामुळे मविआ – म्हणजे भाजपचा स्लीपर सेल आहे हे स्पष्ट आहे.मात्र विकलेल्या आंबेडकरी विचारजंत आणि पाकीटछाप संघटना तसेच हरिजनाना त्याचे काहीही वावगे वाटत नाही.गेल्या दोन तीन वर्षात काँग्रेसने राज्य सभा आणि विधान परिषदेत तीन वेळा थेट भाजपला मतदान केले मात्र कुणावरही कारवाई झालेली नाही.
भाजप विरोधात लढत असल्याचा कितीही आव मविआ आणत असली तरीही मविआ मधील तिन्ही पक्ष अर्थात काँगेस, उद्धव सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हेच भाजपचे खरे स्लीपर सेल आहेत.त्याचा पुरावा म्हणजे आताच्या सोलापूर नागपूर आणि भंडाऱ्यात झालेल्या निवडणुका.काँग्रेस थेट भाजप बरोबर आहे.त्याची सुरुवात मागील वर्षात राज्य सभा आणि विधान परिषदेत तीन वेळा भाजपला झालेले मतदान पासून होते.त्यामूळे राज्यसभा आणि विधान परिषदेत भाजप आणि महायुतीचे निवडून येणारे मते नसतांना आपले उमेदवार निवडून आणले.१० जुन २०२२ ला राज्यसभा तर २० जुन २०२२ ला विधान परिषद आणि १२ जुलै २०२४
विधानपरिषदेच्या निवडणूकीत मविआ आणि त्यातल्या त्यात काँग्रेसच्या आमदरानी थेट भाजपला मते दिली. माञ त्याची ना चौकशी झाली ना कुणावर कार्यवाही.
त्यानंतर ११ जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी झाले.जिंकण्यासाठी आवश्यक असलेली मते हाताशी नसताना
विधानपरिषदेच्या अकरापैकी नऊ जागा युतीने व त्यात पाचही जागा भाजपने जिंकल्या.हा धडधडीत पुरावा समोर आहे.तरीही काँग्रेसी नाक वर करून संविधान बचावची नाटके करून जनतेची दिशाभूल करीत आहे. हया विधान परिषद निवडणूकीत महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार उभा केला नसता तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती.सलग तिसऱ्या निवडणूकीत अतिरिक्त उमेदवारामुळे तिन्ही निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली.त्या मुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, महायुतीला निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार कुणी दिला होता? भाजपला फायदा होणारा तिसरा उमेदवार देताना शरद पवारांनी काय कारण सांगीतले? सलग तीन निवडणुकीत मते फुटली तरीही कुणाची चौकशी का होत नाही ? नाना पटोले भाजप मधून येवून प्रदेश अध्यक्ष होणे हा योगायोग आहे की नुरा कुश्ती आहे ?
ह्या निवडणूकीत महाविकास आघाडीकडील ६४ मतांचा विचार केला असता त्यांची पाच मतं फुटली आहेत. मविआसोबत असलेल्या शंकरराव गडाख आणि विनोद निकोले या दोन आमदारांची मतं मोजली असता. मविआ कडील एकूण ७ मतं फुटल्याचं समोर आलं आहे.महाविकास आघाडीच्या एकूण मतांपैकी ५ मतं फुटली आहेत.महाविकास आघाडीकडे एकूण ६४ मतं होती.त्यापैकी प्रज्ञा सातव यांना २५, मिलिंद नार्वेकर यांना २२ आणि जयंत पाटील यांना १२ मतं मिळाली.पहिल्या आणि दुसऱ्या फेरीचा निकाल पाहता काँग्रेसची एकूण ८ मतं फुटली.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत
विधानपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच काँग्रेसची मतं फुटणार, अशी चर्चा होती.या निवडणुकीत अजित पवार गटाला दोन उमेदवार निवडून आणणे कठीण होते. त्यासाठी त्यांना अतिरिक्त मतांची गरज होती.विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यावर शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांनी पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवत विजय मिळवला.त्यामुळे काँग्रेसची सरळ सरळ ८ मतं फुटली आहेत.त्या पाठी मागे कोण आहे? काँग्रेसने मुस्लिम समाजाला लोकसभेत आणि विधान परिषदेत पूर्ण पणे बेदखल केले आहे.भाजपचा मुस्लीम द्वेषाचा नवा अध्याय काँग्रेस लिहीत आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या १० जून २०२४ रोजी मतदान झालेल्या सहा जागांपैकी भाजपकडे दोन जागांसाठी उमेदवार निवडण्याची क्षमता होती, तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी एक उमेदवार निवडू शकले असते.मात्र, भाजपने पियुष गोयल, अनिल बोंडे आणि महाडिक हे तीन उमेदवार उभे केले. शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार हे दोन उमेदवार उभे केले, तर काँग्रेसने इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली. गोयल, बोंडे, राऊत, प्रतापगढ़ी आणि पटेल यांनी आपापल्या पक्षांच्या जोरावर प्रवास केला, तर सहाव्या जागेसाठी भाजपचे महाडिक आणि शिवसेनेचे पवार यांच्यात कडवी लढत झाली.हयात मते फुटल्याने मविआला मोठा धक्का बसला, भाजपने महाडिक यांना ४१ मते मिळवून दिली, तर संजय पवारांना फक्त ३३ मते मिळाली होती.त्यावेळी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांपैकी भाजपकडे दोन जागांसाठी उमेदवार निवडण्याची क्षमता होती, तर त्यांनी तीन राज्यसभा सदस्य निवडून आणले.हा निकाल समोर असताना आमदार फुटीची कुठलीही चर्चा होऊ दिली नाही.त्याची पुनरावृत्ती २० जून २०२४ मध्ये विधान परिषद निवडणुक मध्ये झाली.चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप हे काँगेस कडून विधान परिषदेत उमेदवार होते.रणनिती प्रमाणे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची मते देवून काँग्रेसचे दोन्ही उमेद्वार जिंकून आले असते. प्रत्यक्षात मात्र छुपे मतदान असल्याने हांडोरे यांची सहा मतं फुटली, त्यातील काही मतं ही भाई जगताप यांना मिळाली. परिणामी चंद्रकांत हांडोरे यांना पहिल्या पसंतीची २३ आणि भाई जगताप यांना २२ मतं पडली. निवडून येण्यासाठी लागणारी २८ मतं काँग्रेसच्या दोन्ही उमेदवाराला मिळाली नाही, त्यामुळे दुसऱ्या प्राधान्यांच्या मतांची मोजणी करण्यात आली, त्यात भाई जगताप यांना हांडोरेंपेक्षा जास्त मते पडली, म्हणून भाई जगताप जिंकून आले.काँग्रेसच्या उमेदवाराने काँग्रेसच्याच उमेदवाराचा भाजप बरोबर मिळून पाडाव केला होता. या सगळ्या खेळाचे मास्टर माईंड अशोक चव्हाण होते, असा आरोप नाव न घेता त्यावेळी नाना पटोले यांनी केला होता.मात्र कार्यवाही किंवा चौकशी मात्र कुणाचीच झाली नाही.
विधानसभेत महाविकास आघाडीपैकी काँग्रेसकडे सर्वाधिक ३७ आमदार आहेत. काँग्रेसनं फक्त एक उमेदवार निवडणुकीसाठी उभा केला होता. त्यामुळे काँग्रेसकडे अतिरिक्त १४ मतं अतिरिक्त होती.हे १४ आमदार टिकवुन ठेवणे काँग्रेसची जबाबदारी होती. दुसरीकडे शरद पवार गटानं शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता.शरद पवार गटाकडे विधानसभेत फक्त १२ आमदार होते.जयंत पाटील यांच्या विजयासाठी शरद पवार गटाला एकूण १४ मतांची जुळवाजुळव करणे अभिप्रेत होते.मात्र ती होऊ शकली नाही आणि त्यामुळे जयंत पाटील पराभूत झाले.
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व एनडीए आघाडीला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले होते.भाजप विरोधातील जनतेचा कौल होता.महाराष्ट्रात भाजपाची मोठी पीछेहाट झाली.भाजपाचं संख्याबळ २३ वरून थेट ८ पर्यंत खाली आलं आहे.भाजप विरोधातील मते संविधानाच्या नावावर घ्यायची आणि निवडून आलेल्या मविआ आमदारांनी त्यांची मते भाजपला देवून त्यांना मदत करायची हा खेळ बिनदिक्कत सुरू आहे.
विधानसभेत भाजपाच्या १०३ आमदारांचं संख्याबळ असल्याने पाच उमेदवार जिंकून आणण्यासाठी ११५ मतांची आवश्यकता होती. त्यामुळे वरच्या १२ मताची तजवीज करणे आवश्यक होते.शिंदे आणि अजित पवार गटाचे दोन दोन उमेदवार असताना भाजपला पहिल्या फेरीत २३ मतांचा कोटा पूर्ण करणारे मते मिळाली त्यात काँग्रेसच्या आणि मविआच्या फुटीर मतांचा वाटा आहे.हे आता लपून राहिले नाही. इतरांना भाजपची बी टीम म्हणून बोल लावणाऱ्या मविआ आणि त्यातल्या त्यात काँग्रेसचे राजकीय चारित्र्य ह्या तिन्ही निवडणूकीत आणि आताच्या सोलापूर नागपूर आणि भंडाऱ्यात भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन केल्याने उघडे नागडे पडले आहे.
राजेन्द्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत