दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

एक दिवा सावित्रीचा’ उपक्रम

मुंबई, (वा.) येत्या ३ जानेवारी रोजी देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीमाई फुले यांचा या निमित्त समस्त महिला वर्गाने हा जन्मदिन दिवाळीसारखा साजरा करावा असे आवाहन सामाजिक स्तरातून आणि राष्ट्रसेवा दल तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले आहे. दरम्यान, या दिवशी एक दिवा सावित्रीचा’ हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांनी दिली आहे. येत्या शुक्रवारी (३ जानेवारी) ‘सावित्री उत्सव २०२५’ हा उपक्रम सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांकडून राबवला जाणार आहे. तो ‘एक दिवा सावित्रीचा’ ही टॅगलाईन या उपक्रमाची असून, या दिवशी प्रत्येक क्षेत्रातील महिला सावित्रीमाईंचा हा जन्मदिन साजरा करणार आहेत. सावित्रीमाई फुले यांची आठवण जागविण्यासाठी आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या घराच्या उंबरठयावर एक दिवा’ लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेण-दगडांचा मारा झेलल्याने शिक्षणाची वाट सोपी
शेण दगडांचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि ‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुढे नेण्याची अवघड वाट ‘ती’ चालत राहिली म्हणूनच आज आपली प्रशस्त वाट तयार झाली. त्यामुळे याच वाटेवरून चालताना ‘सावित्रीमाई फुले’ यांची आठवण तर जागवायलाच हवी हा हेतू मनाशी बाळगून आपल्या सोसायटी, वस्तीमध्ये तसेच स्वतःच्या घरापासून याची सुरवात करावी असे आवाहन सावित्री ‘उत्सव उत्सव’ समितीच्या वतीने करण्यात आले आहे. तर सावित्री आणि फातिमा यांची आठवण जागवूया असे आवाहन करत प्रत्येकाने या दिवशी आपल्या घरासमोर कंदील, दरवाज्याला फुलांचे तोरण, दारात रांगोळी, घरात गोडधोड आणि ‘उंबरठ्यावर विवेकाची एक पणती लावून सावित्रीबाई यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करु या असे आवाहन’ सावित्री उत्सवाचे शरद कदम, सिरत सातपुते, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी केले आहे.

कपाळावर आडवी चिरी लावा
या दिवशी अनेक महिला, शालेय विद्यार्थीनी सावित्रीमाई जशी कपाळावर आडवी चिरी लावायची तशी चिरी लावून शाळेत, ऑफिसमध्ये जावे, यापूर्वी असा सावित्री उत्सव अनेक आस्थापनात साजरा केला असून, महिलांनी अशी चिरी लावल्याचे आणि हा उत्सव साजरा केल्याचे आपले असे फोटो व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवावे असे आवाहन सिरत सातपुते आणि शरद कदम यांनी केले आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे आवाहन
भारतातील तमाम स्त्रियांना शिक्षणाचा हक्क देणारी पहिली महिला शिक्षिका सावित्रीमाई आणि महात्मा फुले हे दांपत्य होते. त्यामुळे आपल्या घराच्या उंबरठयावर एक दिवा सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी म्हणजे ३ जानेवारीला लावावा असे आवाहन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले आहे. नव्या वर्षातील पहिला उत्सव हा ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस ‘सावित्री उत्सव’ म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. या दिवशी सावित्रीबाई जशा कपाळावर आडवी चिरी लावायच्या तशी चिरी लावावी आणि आपल्या घराच्या उंबरठ्यावर ज्ञानाची एक पणती लावून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी असेही सोनाली कुलकर्णी यांनी महिलांना आवाहन केले आहे.
[1/2, 5:40 PM] +91 98203 57051: 👉#कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला सर्वांनी अभिवादन का करावे?❓
—श्रीमंत कोकाटे

       👉कोरेगाव-भीमा युद्धातील लढ्याची प्रेरणा घेऊन तत्कालीन सामाजिक संघर्षाच्या लढ्याला वेग देता यावा या उद्देशाने डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना या युद्धातील संघर्षाची अोळख व्हावी यासाठी १ जानेवारी विजयी दिन साजरा करण्याची प्रथा निर्माण केली.

      👉आज भिडे-एकबोटे आदिंच्या कुप्रबोधनाने कोरेगाव-भिमा येथे बौद्ध विरुद्ध मराठा संघर्षाची ठिणगी पडली आहे. ती अधिक नुकसानदायक ठरु नये, यासाठी कोरेगाव-भीमा युद्धाची पार्श्वभूमी मांडणे आणि तिचे लोकांपर्यंत घेऊन जाणे अत्यंत आवश्यक ठरते.

युद्धाची पार्श्वभूमी

        👉छत्रपती शिवाजी राजांनी सुरू केलेला शिवशक पेशव्यांनी बंद पाडला आणि मोगलांचा फसली शक सुरु केला. पेशव्यांनी छत्रपती संभाजीराजांना तीन वेळा मारण्याचा कट केला आणि शेवटी संस्कृतवरती प्रभुत्व मिळविल्यामुळे औरंगजेबाच्या ताब्यात देऊन ब्राह्मणीधर्मानुसार त्यांना हाल हाल करून ठार मारले.

      👉पहिल्या बाजीराव पेशव्याने जोरावरखानाचा पराभव करून गुजरात जिंकणाऱ्या मराठा सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना तह करण्यासाठी आळंदीजवळ बोलावून कैदेत टाकले आणि त्यांना कैदेत मारले.त्यांच्या मुलाला द्वेषापोटी दगाबाजीने मारले. 

      👉तिसऱ्या पानिपताच्या वेळेस अब्दाली युद्धाचे नियोजन करत होता, तर पेशवे यज्ञ,याग,होम हवन,भेदाभेद, व्रतवैकल्ये करण्यात दंग होते. भोजनाचे वेळी पेशवे हे जाधवराव, निंबाळकर, घोरपडे, शिंदे, होळकर, भोसले, पवार, जगदाळे इत्यादी मराठा सरदारांनादेखील पंक्तीला घेत नसत, शिवाजीराजानी कधीही भेदभाव केला नाही. पेशव्यानी अनैतिकतेचा कळस गाठला होता. अब्दाली युद्धाचे नियोजन करत होता, तेंव्हा पेशवे जप तप आणि भोजनाचे नियोजन करत होते. म्हणजे सदाशिव पेशव्याने एक लाख मराठयांना अब्दालीच्या समोर नेवून बळी दिले, तेंव्हा महाराणी ताराराणी म्हणाल्या "बरं झालं पेशवाई बुडाली". पानिपतात पेशव्यांच्या पराभवाचा महाराणी ताराराणीला आनंद झाला,इतका पेशव्याबद्धल महाराष्ट्रात रोष निर्माण झाला होता.

    👉छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा  गादीचे वंशज पहिले छत्रपती प्रतापसिंह महाराज हे लहान वयात गादीवरती आले, तेव्हा दुसऱ्या बाजीराव पेशव्याने त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली, कारण हा बाल छत्रपती शिकला तर शहाणा होईल आणि शहाणा झाला तर तो आपल्या अंकित राहणार नाही, म्हणून त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली. छत्रपती घराणे त्यांना चोरून शिकवेल म्हणून पेशव्यांनी सातारच्या राजवाड्याभोवती गुप्तहेर नेमले, तेव्हा छत्रपती प्रतापसिंह महाराजांची आई रात्री अडीच वाजता चोरून शिकवायची. छत्रपतींची ही अवस्था तर सामान्य रयतेचे पेशव्यांनी काय हाल केले असतील?❓

याची कल्पना करा.🤔

      👉पेशव्यांना धडा शिकवण्यासाठी सातारा येथून पुण्याकडे सैन्य घेऊन निघालेल्या छत्रपती चतुरसिंग भोसले यांना दगाबाजीने पकडून दुसऱ्या बाजीरावाने कोकणातील कांगोरी किल्ल्यात डांबून छत्रपती चतुरसिंगांना हालहाल करून ठार मारले.

     👉अमृतराव पेशवेव्याने खंडणी न देणाऱ्या शेतकऱ्यांना तापलेल्या तव्यावर उभे करून छळले, तर शेतकऱ्यांच्या लहान मुलांच्या बेंबीत आणि कानात तोफेची दारू भरून त्याला अग्नी द्यायचा, त्यामुळे मुलांचे डोके आणि पोट फुटायचे, इसिस, तालिबानी, नक्षली, सनातनी जसे निरपराध लोकांना निर्दयपाने मारतात, तसेच पेशवेदेखील निरपराध प्रजेला निर्दयपणे मारत असत.

  👉 इंदूरच्या विठोजी होळकर यांना पुण्यात हत्तीच्या पायाला बांधून पेशव्यांनी हालहाल करून ठार मारले. पेशवेकाळात अस्पृश्यांना तर माणूस म्हणून जगायचा अधिकार नव्हता. त्यांचा प्रचंड छळ झाला.कंबरेला केरसुणी आणि गळ्यात मडके अशी अस्पृश्याची अवस्था होती.

युद्ध-वास्तव

      👉पेशव्यांनी सर्वाधिक छळ ब्राह्मण महिलांचा केला, महिलांचा जन्म जणू कांही उपभोग घेण्यासाठीच आहे,अशी महिलांची स्थिती पेशवाईत होती.त्या छळाचे या ठिकाणी वर्णन करणे देखील उचित ठरणार नाही. छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या समतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी, लोककल्याणकारी, महिलांचा सन्मान करणाऱ्या शासन व्यवस्थेला मूठमाती देण्याचे काम पेशव्यांनी केले, त्यामुळेच 500 शूरवीर मावळ्यांनी 300 ब्रिटिशांच्या मदतीने 28 हजार पेशव्यांचा पराभव केला. त्या 500 शूरवीरामध्ये मराठा, महार, मुस्लिम, राजपूत, मातंग धनगर, इत्यादी मावळे होते.

      👉मराठा-महार-मुस्लिम खांद्याला खांदा लावून भावाप्रमाणे पेशवाई विरोधात लढले. त्यांची यादी पेरणे कोरेगाव - भीमा येथील विजयस्तंभावरती आहे. त्या 500 सैनिकांपैकी खंडोजी माळवदकर हे एक शूर मराठा वीर होते. त्यांना ब्रिटिशांनी बक्षीस म्हणून जमीन इनाम दिली, त्यांच्या शेतालागतच हा विजयस्तंभ आहे.

    👉 500 मावळ्यांनी 300 ब्रिटीशांची मदत घेतली किंबहुना ब्रिटिश आणि पाचशे मावळे एकत्र येऊन पेशव्याविरुद्ध लढले, म्हणून त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही, कारण 1818 साली देश, राष्ट्र ही संकल्पना नव्हती, त्या काळात विविध संस्थाने होती. देश,राष्ट्र ही संकल्पना 1947- 1950 नंतर आली. 

     👉500 मावळ्यांना देशद्रोही ठरविणार्‍यांनी टिपू सुलतानविरुद्ध इंग्रजांना मदत करणाऱ्या पेशव्याबद्दल आपले मत स्पष्ट करावे, तसेच पेशव्यांनी 1802 साली इंग्रजाबरोबर वसईचा तह केला होता व इंग्रजांची तैनाती फौज पदरी बाळगली होती.

     👉छत्रपती प्रतापसिंह महाराजांना कैद करण्यासाठी इंग्रजांना मदत करणाऱ्या व शनिवारवाड्यावरचा जरीपटका खाली उतरवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकविनाऱ्यानी  राष्ट्रवादाच्या व देशप्रेमाच्या वल्गना करणे हास्यास्पद आहे.

     👉ज्यावेळेस कोरेगाव भीमा येथे युद्ध सुरू होते, तेंव्हा शिवाजीराजांचे अत्यंत तरुण वंशज छत्रपती प्रतापसिंह महाराज व राजपरिवाराला दुसऱ्या बाजीराव पेशव्याने  वासोटा किल्यावर नजरकैदेत अर्थात कैदेत ठेवले होते.छत्रपतींना कैदेत टाकणाऱ्या पेशव्याना पराभूत करून त्या पाचशे शुरावीरांनी खरे तर छत्रपतींच्या अपमानाचा बदलाच घेतला.पेशव्यांचा पराभव झाल्यानंतरच प्रतापसिंह महाराजांची सुटका झाली.

      👉एवढे मात्र नक्की की शिवरायांचे पाचशे मावळे जुलमी पेशवाईविरुद्ध खांद्याला खांदा लावून 1 जानेवारी 1818 रोजी लढले व शिवस्वराज्याची वाताहात लावणाऱ्या पेशव्यांना धडा शिकवला, त्यांचा तमाम मराठा, बौद्ध, ओबीसी, एससी, मुस्लिम यांना अभिमान वाटायला हवा.जुलमी पेशव्याविरुद्ध त्यांनी गाजवलेल्या शौर्यामुळे इंग्रजानी पेरणे येथे विजयस्तंभ उभारला.त्यामुळे तमाम बहुजन समाजाला त्या विजयस्तंभाबद्धल अभिमान वाटायला हवा. 

    👉त्यामुळे आम्ही 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत आहोत.आपल्या पूर्वजानी एकोपा जपला,आपणही एकोपा जपूया!

               *---- श्रीमंत कोकाटे*
            *(इतिहास अभ्यासक)*

👉संदर्भग्रंथ-

1)छत्रपती शिवाजी महाराज-वा सी बेंद्रे
2)छत्रपती संभाजी महाराज-वा सी बेंद्रे
3)नामांतर औरंगाबाद आणि पुण्याचे-शरद पाटील
4)पानिपत 1761-त्र्यंबक शेजवलकर
5)सातारच्या राज्यक्रान्तिचा इतिहास-प्रबोधनकार ठाकरे
6)दाभाडे घराण्याचा इतिहास-परांडकर
7)महात्मा फुले -धनंजय कीर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!