देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

भगवानांच्या मार्गात जाती-भेद नव्हता*

भगवान बुद्धांच्या शतकांपूर्वी पासूनच देशात जाती-पातीमुळे अंधकार पसरलेला होता. नीच कुळात जन्म घेतल्यामुळे अथवा हीन कर्म केल्यामुळे व्यक्तीला हीन मानले जात होते.

व्यवसाय, कर्म आणि जातींच्या उच्च आणि नीच, हीन व श्रेष्ठ वेगवेगळ्या श्रेण्या होत्या –

१. शूद्र

२. चांडाळ

३. भंगी

४. चांभार

ह्या नीच जाती मानल्या जात होत्या.

१. ब्राम्हण

२. क्षत्रिय

३. वैश्य

ह्या उच्च जाती मानल्या जात होत्या.

ह्याच प्रकारे ब्राम्हणांचे गोत्रही हीन आणि उच्च होते-

हीन गोत्र-

१. कोसिय गोत्र

२. भारद्वाज गोत्र

उच्च गोत्र –

१. गोतम-गोत्र

२. मोग्गल्लान-गोत्र

३. कच्चान गोत्र व

४. वसिट्ट-गोत्र

हस्तकला आणि शिल्पकलाही उच्च आणि निम्न श्रेणीत वाटल्या गेली होती.

उच्च मानल्या जाणार्या शिल्प-कला आणि कर्म कौशल्य –

१. लेखन कला

२. मुद्रण (छपाई) कला

३. हिशोब ठेवणे, मुनीम कार्य

निम्न समजले जाणारे कर्म-

१. बांबूच्या वस्तू बनविने

२. मातीचे माठ इत्यादी भांडे बनविने

३. वस्त्र विणणे

४. चर्म-कला (पशुंच्या चामड्यापासून जोडे इत्यादी वस्तू बनविणे

५. न्हावी कर्म (केस कापणे)

अत्यंत हीन आणि तुच्छ समजले जाणारे कर्म

१. मल-मूत्र उचलण्याचे काम

२. घाण, कचरा उचलून सफाई करण्याचे काम,

उत्कृष्ट समजले जाणारे व्यवसाय

१. कृषि

२. वाणिज्य व्यवसाय

३. गो-पालन

पाली साहित्यात खालील पाच नीच कुळ वर्णित आहेत व ह्या कुळांच्या कर्माना हीन-कर्म मानले जात होते-

१. चांडाळ कुळ श्मशानात शव जाळणे.

२. नेसाद कुळ पशु-पक्षांची शिकार करणे.

३. वेनकुळ शौच्यालय साफ करणे.

४. रथकार कुळ मेलेल्या पशुंच्या चामड्यापासून वस्तू वनविणे.

५. पुक्कुस कुळ कचरा उचलून सफाई करणे.

ह्याच प्रकारे खालील कर्म करणार्या व्यक्तींनाही हीन मानले जात होते.

१. नळकार बांबूपासून टोपल्या बनविणारे.

२. कुंभकार मातीचे माठ इत्यादी बनविणारे.

३. पेसकार वस्त्र विनण्याचे काम करणारे.

४. चम्मकार चामड्याच्या वस्तू बनविणारे.

५. न्हावी केस कापण्याचे काम करणारे.

जे खूप नीच जातीचे होते, त्यांची सावलीही कोणावर पडली तर तो आपल्याला दूषित झालेला समजायचा. कधी-कधी क्रोधामुळे ज्याची छाया पडली, त्याला लोक मारित असत. ह्यामुळे अत्यंत नीच जातीचे लोक जे शहरात येत असत ते खूप जपून चालत असत की त्यांची सावलीही कोणावर पडू नये.

अश्या खराब स्थितीत बुद्धांनी एक खूप क्रांतीकारी पाऊल उचलले त्यांनी नीच पेक्षाही नीच जाती वाल्यांनांही आपल्या संघात सामील केले. जो राज-कर्मचारीही पूजा करायचा, शेठ सावकारही पूजायचे आणि ब्राम्हणही पूजायचे. ह्या प्रकारे नीच जातींचा उद्धार करण्याचे एक खूप मोठे पाऊल भगवान बुद्धांनी उचलले.

भगवान स्वतः जात-पात मानित नसत. संघात सामील झाल्यानंतर जात-पातीमुळे कोणताही भेद-भाव केला जात नसे. भिक्षुही संघात सामील झाल्यानंतर उच्च-कुळ, नीच-कुळ सर्वांजवळ भिक्षेसाठी जात असत. कधी-कधी नीच-कुळ असणार्यांना चांडाळ व वसल म्हणून बोलाविले जात असे. कोणी नवीन भिक्षू ह्या प्रकारचे संबोधन करून दुसर्याना बोलावित असे तर तो भगवानांच्या विनयानुसार अपराध घोषित केला.

त्याच दिवसांची एक घटना आहे- प्रकृती नावाची एक षोडशी अस्पृश्य कन्या, आपल्या परिवारासाठी अस्पृश्यांच्या विहिरीतून पाणी भरित होती. दरिद्रतेमुळे मळलेले फाटके, जुने पुराणे वस्त्र घातले होते. समोरून भगवान बुध्दांचे शिष्य आनंद येत होते. आनंदही क्षत्रिय कुलोत्पन्न गौरवर्ण, प्रभावशाली व्यक्तित्वाचे धनी आणि भगवानांचे चुलत भाऊ होते. खूप गर्मीचा ऋतू होता. तहाणेने कंठ सुकलेला होता. विहिरीजवळ ह्या मुलीला पाणी भरतांना पाहून तिला पिण्यासाठी पाणी मागितले अस्पृश्य कन्या घाबरते. ही व्यक्ती भिक्षू असतांनाही स्पष्टपणे उच्च वर्णाचीच आहे. परंतु हा जाणत नाही की मी अस्पृश्य परिवाराची युवती आहे आणि ही विहीरही अस्पृश्यांची आहे. त्यामुळे ती आनंदांना सांगते की मी नीच जातीची मुलगी आहे आणि हे अस्पृश्यांचे पाणी मी एखाद्या उच्च कुळातील व्यक्तीला पिण्यासाठी देऊ शकत नाही.

आनंद त्या अस्पृश्य मुलीला म्हणतात “ताई, मी तुला पाणी मागितले आहे, जाती विचारली नाही.”

भिक्षु आनंदांच्या आग्रहामुळे संकोचित त्या अस्पृश्य कन्येने त्यांना जल दिले. प्रसन्नतापूर्वक आपली तहाण मागवून भिक्षु तेथून निघून गेले.

अचानक त्या अस्पृश्य कन्येच्या मनात विचार आला की हा उच्चजातीच्या युवापुरुष माझ्या हाताचे पाणी प्याला, तर तो मला आपली अर्धांगिनी बनविणेही अवश्य स्वीकारेल. ती घाईघाईने भिक्षु आनंदांजवळ गेली आणि आपले म्हणणे त्यांना सांगितले. भिक्षूने ते त्वरित नाकारले. ती खूप निराश झाली. तेव्हा आनंदानी त्या अस्पृश्य कन्येला सांगितले की मी जात-पातीच्या भेदभावामुळे तुझा प्रस्ताव अस्वीकार करीत नाही. परंतु आजन्म ब्रम्हचर्याचे व्रत घेतले असल्यामुळे मी असमर्थ आहे. त्यानंतर त्यांनी तिला सांगितले की आमच्या महाकारुणिक भगवान बुद्धांनी मनुष्यांना शरण दिलेली आहे. तू ही त्यांच्याजवळ जाऊन शरण घे. ज्यांना समाज हीनजातीचे मानतो. भगवान त्या सर्वांना शरण देतात. त्यांच्याजवळ जाती-जन्माचा भेदभाव नाही. त्यांच्या शरणात येऊन साधना करीत अनार्याचे आर्य बनतात. जे आज समाजात दुत्कारले जातात, लोक त्यांचाच सन्मान-सत्कार करू लागतात. तू न संकोचता भगवानांना शरण जा. तेथे अनेक साध्वी आहेत आणि माता प्रजापती तुझी उचित देखभाल करेल.

हे ऐकून अस्पृश्यकन्या प्रकृती अत्यंत प्रसन्न होऊन भगवानांना शरण आली, तिला साधना मिळाली आणि पुढे जाऊन ती साध्वी झाली.

एकदा भगवान बुद्ध आपल्या भिक्षू-संघासह मगधची राजधानी राजगिरीत धर्मचारिकेसाठी नगराच्या राजमार्गावरून जात होते. तेव्हा नगराचा भंगी सुनीत हातात झाडू घेऊन रस्ता झाडत होता. अत्यंत हीन कुळात उत्पन्न अस्पृश्य असल्यामुळे त्याच्या मनात भाव आला की माझी छायाही ह्यांच्यावर पडू नये. त्यामुळे संकोचाने हात बांधून एका बाजूला उभा झाला. भगवानांनी त्याच्या मनाचे भाव ओळखले. निर्मम, निर्दयी समाजाच्या दुषित व्यवस्थेचा शिकार भंगी सुनीतला पाहून त्यांचे हृदय करुणेने भरून गेले. त्यांनी त्याला आपल्याजवळ बोलाविले आणि भिक्षू-संघासोबत राजगिरीच्या वेणुवण विहारात घेऊन गेले. त्याला विपश्यना साधनेची ध्यान-विधी शिकविली. भंगी सुनीत संघात प्रव्रजित होऊन अरण्यात तप करू लागला आणि अनार्यापासून आर्य अवस्था प्राप्त करून अरहंत बनता, खर्या अर्थाने भंगीपासून ब्राम्हण बनला.

ह्याच प्रकारे चांडाळ कुळात जन्मलेला एक बालक सोपाक जेव्हा चार वर्षाचा झाला तेव्हा अनाथ झाला. गरीबीमुळे भार समजून सात वर्षाच्या अवस्थेत त्याच्या काकाने त्याच्यावर क्रोधित होऊन स्मशानात एका शकासोबत त्याला पक्के बांधले ज्यामुळे जंगली पशू त्याला चिरून-फाडून खातील. महाकारुणिक भगवानांनी ही घटना पाहिली तेव्हा एका भिक्षुला पाठवून सोपाकला सोडविले व विहारात आणविले. तेथेच त्याची प्रव्रज्या आणि उपसंपदा झाली. पुढे जाऊन चांडाळाच्या घरी जन्मलेला सोपाक साधनेत करून अरहंत झाला.

इतिहासात एक अजून फार मोठे पाऊल डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी उचलेले, जेव्हा त्यांनी असे संविधान रचले ज्याच्यात उच्च-नीचला कोणतेही स्थानच नाही. मनुष्य, मनुष्य आहे. त्यांनी नीच जाती मानल्या जाणार्या लोकांना शिकण्याची सुविधा दिली. उच्चातील उच्च अभ्यास करून नीच जातीचे लोक सरकारमध्ये सेक्रेटरी सुद्धा बनले. आता त्यांना कोण नीच म्हणेल? ह्या प्रकारे उच्च नीचच्या भेद-भावाला तोडण्याचे खूप मोठे काम डॉ बाबासाहेव आंबडेकरांनी केले.

परंतु तरीही गावात आजपर्यंत जात-पात, उच्च-नीच, आणि शिवाशीवची प्रथा काही मात्रेत कायमच आहे. ती दूर झाली नाही.

मला आठवते, बर्मा (म्यंमा) त राहात असतांना अश्या कट्टर सनातनी घरात जन्मलो आणि वाढलो. तेथे पाहिले की भंगी आणि चांभारच नाही तर नीच जाती म्हणविणारे अनेक लोक असे होते, ज्यांचे स्पर्शलेले आम्ही पिऊ शकत नव्हतो. बाबासाहेबांनी यात खूप मोठी सुधारणा घडविली. तरीही समाजात नीच कुळ असणारे नीचच मानले गेले आणि उच्च कुळातील उच्चच मानले गेले.

जशी मोठी क्रांती भगवान बुद्धांनी नीच जातींना संघात सामावून केल्, तशीच बाबासाहेबांनी शिक्षणाचा प्रसार करून त्यांना सन्मानित केले. तरीही देशाचे हे दुर्दैव पूर्णपणे समाप्त झाले नाही.

आता विपश्यनेने एक पाऊल अजून समोर वाढविले आहे. त्याच्या शिबिरात सर्व जातीचे लोक सामील होतात. न कोणी नीच, न कोणी उच्च सर्व बरोबरीने सोबत राहून साधना करतात. सर्व सोबत बसून भोजन करतात, सोबत राहातात. आता तर स्थिती इथपर्यंत आली आहे ई मोठ्या संख्येने दलित म्हणविणार्यांना विपश्यनेत पुढे प्रशिक्षित करून आचार्य पदावर स्थापित केले गेले आहे. आता एक दलित वर्गाची व्यक्ती जेव्हा आचार्य-आसनावर बसते तेव्हा ती दलित नाही तर धर्माची शिक्षक आहे. जे साधनेत सामील होतात. ते सर्व जरी ब्राम्हण असोत, क्षत्रिय असोत अथवा वैश्य असोत, सर्व विपश्यनेच्या त्या आचार्यासमोर शिर नमवितात, नमन करतात आणि त्याच्याकडून धर्म शिकतात. भगवानांच्या विद्येत जात-पातीचा भेदभाव नाही, विपश्यना विद्या व आचरणच प्रमुख आहे, जी सर्वांना उपलब्ध आहे. आपसातील भेद-भावांना तोडण्याचे एक महत्वपूर्ण कार्य विपश्यना करीत आहे. पाहुया, याचा किती प्रभाव सार्या समाजावर होतो. समाजाचे आणि देशाचे हे दुर्दैव दूर होईल, तेव्हाच मंगल होईल! तेव्हाच कल्याण होईल !!

टिप:- हा लेख फाल्गुन पौर्णिमा, २७/०३/२०१३ मधील आहे त्यामुळे कृपया कोणीही “दलित” या शब्दावर आक्षेप घेऊ नये.

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

लेखक :- कल्याणमित्र सत्यनारायण गोयन्का

संकलन :- महेश कांबळे

दिनांक :- ३१/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!