आपल्या पूर्वजांनी केलेल्या महान पराक्रमाचे व त्यागाचे प्रतीक

आपल्या शूरवीर महार पूर्वज बहादूर सैनिकांनी.१ जानेवारी १८१८ मध्ये.पेशवाई नष्ट करणाऱ्या महारवीरांना प्रज्ञासूर्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी,भीमा कोरेगाव विजयस्तंभाला १ जानेवारी १९२७.ला भेट देऊन सलामी दिली,त्यावेळी तेथे केलेल्या भाषणात ते म्हणाले,माझ्या महार सैनिक बांधूनो.हा विजयीस्तंभ आपल्या पूर्वजांनी केलेल्या महान पराक्रमाचे व त्यागाचे प्रतीक आहे. महारवीरांनी आपल्या प्राणांची कुर्बानी करून विजय मिळवून दिला,याच ठिकाणी पेशवाई नष्ट केली,याच मातीमध्ये ब्राह्मण शाही नष्ट केली,या स्वराज्य मध्ये इंग्रज पुण्यावर हल्ला करणार आहेत.ही बातमी महारांचा सरदार सिदनाकला समजली तेव्हा सिदनाक पेशव्याला भेटाला आणी म्हणाला,पेशवे महाराज इंग्रज आपल्या पुण्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्या लढाईत आम्ही आपणाला विजय मिळवून देऊ.लढाईत विजयी झाल्यानंतर आपण आम्हाला, मानसन्मानाने वागविणार की,अस्पृश्य म्हणूनच वागविणार आहात ते सांगा.? ते महार सरदार सिदनाकचे बोल ऐकून, ब्राह्मण्याचा गर्व व अहंकार असलेल्या.पेशव्याने डोळे वटारून रागाने तो म्हणाला, आमच्या ब्राह्मण धर्माने आजवर जसे वागविले तसेच वागवू.तुम्ह महारांना आमच्या मानाच्या पंगतीत बसवून घेणार नाही. तुम्ही आमच्या बाजूने लढलात किंवा इंग्रजाच्या बाजूने लढलात आमचे त्याच्याशी काहीही देणे घेणे नाही. तुम्ही काय करायचे ते ठरवा.त्याची आम्हाला पर्वा नाही.आम्ही लढण्यास समर्थ आहोत,अशी मग्रुरीची भाषा वापरून.पेशव्यांने स्वाभिमानी सरदार. सिदनाकचा अपमान केला,तेव्हा तो स्वतःहून इंग्रजांच्या सौन्याचा.कॅप्टन स्टाॉस्टनला भेटला.महार सरदार सिदनाकचे स्वागत केले आणि हातमिळवणी केली,इंग्रजांचे आपल्यावर चालून येत असलेली.बातमी पेशव्यांना समजली.तेव्हा ते आपले सैन्य घेऊन.भीमा गोरेगावच्या रणमैदानात दबा धरून बसला.इंग्रजी सौन्याच कॅप्टन आपले इंग्रज सैनिक व ५०० बहादूर महार सैनिक आणि लढाईचे साहित्य घेऊन रात्रभर प्रवास करून पहाटे भीमागोरेगावला पोहोचला.एक बाजूला पेशव्यांचे तीस हजार सैन्य आमने सामने युद्धाला उभे ठाकलेले होते.इंग्रज सैन्यावर हल्ला करण्याचा पेशव्यांचा आपल्या सैन्याला हुकुम केले.घनघोर लढाईला सुरुवात ३१ डिसेंबर १८१७ रोजी सकाळी युद्धाला सुरुवात झाली. दोन्ही बाजूने बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला.तोफा धडधडू लागल्या.दोन्ही बाजूचे सैनिक तलवारीने एकमेकाला.कापून काढू काढले.रणमैदानात सैनिकांच्या मुडद्दांचा खच पडला.मैदानात रक्ताचे पाट वाहू लागले.ते नदीच्या पाण्यात मिसळून भीमा नदीचे पाणी लाल झाले.पेशव्यांचे सैन्य बिथरले थरकाप उडाली.ते हादरून व बेदरुन गेले.महापराक्रमी महार सैनिकांपुढे त्यांचे काही चालले नाही.पेशव्यांचे सैन्य घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी मैदानातून सैरावैरा वारा धावतो पळू लागले.महार आणि इंग्रज सैनिक आपल्या जीवाची बाजी लावून लढत होते.३१डिसेंबर रोजी सुरू झालेल्या तो रणसंग्राम १ जानेवारी १८१८ संपला.महार सैनिक व इंग्रजांचा विजय झाला पेशव्यांच्या शनिवारवातड्यावरील,ब्राह्मणांचा ध्वज उतरवून तेथे इंग्रजांचा,युनियन जॅक झेंडा लावला.शूरवीर महार सैनिकांच्या सहकार्यामुळे आता इंग्रजांचा झेंडा.पुण्यातच नाही संपूर्ण देशात पडकू लागला.१ जानेवारी १८१८ रोजी पेशव्यांची पेशवाई महावीर बहाद्दरांनी भीमा नदीत बुडवली.राष्ट्रद्रोही गद्दार ब्राह्मण छत्रपती संभाजी राजा यांचा घात केला.आपल्या राजाच्या हत्येचा बदला.५०० शूरविरांनी घेतला.त्या लढाईत ज्या महावीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी कुर्बानी दिली.ज्यांनी एक नवा इतिहास घडविला,त्यांच्या शौर्य भावी पिड्यांना आठवण रहावी महारवीरांची किर्ती अमर रहावी म्हणून ब्रिटिश सरकारने भीमा गोरेगाव रणमैदानावर एक विजयीस्तंभ १८२२ साली उभारलेला आहे.त्या क्रांतीस्तंभावर लढाईत शहीद झालेल्या महापराक्रमी महारवीरांची नावे लिहिलेली आहेत.ज्या महारवीरांनी महान पराक्रम केला देशाचा इतिहास बदलला.अस्पृश्यतानष्ट केली पेशवाई संपवली ब्राह्मणांची शेंडी कापली.हजारो वर्षे या देशात नंगानाच घालवणाऱ्या.जातीवादी,मनुवादी,आणि ब्राह्मण प्रवृत्तीच्या हीन संस्कृतीचा तो एक विद्रोह होता.तो भीमा कोरेगावच्या
लढाईत उफाळूनआला.भीमा गोरेगावची लढाईत वीरबहाद्दर
महार सैनिकांनी केलेल्या महापराक्रमाला जगात तोड नाही.
आज २०७ व्या शौर्य दिन त्या वीरबहाद्दर शूरवीर ५०० महार सैनिकांना व आम्हाला या गुलामीतून मुक्त करणाऱ्या आमच्या पूर्वजांना.मानाचा मुजरा करतो व त्रिवार वंदन करतो.!!
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
आकाश दादा शिरसाट
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत