देशदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

बांगलादेशचा अदाणी-अंबानी:सैफुल आलम आणि आलम ग्रुप

समाज माध्यमातून साभार

बांगलादेशातील आर्थिक आणि राजकीय सत्तेच्या समीकरणांवर प्रचंड प्रभाव टाकणारे नाव म्हणजे सैफुल आलम आणि त्याचा आलम ग्रुप. सैफुल आलम यांना “बांगलादेशचा अदाणी/अंबानी” म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. तसेच, शेख हसीना यांची तुलना बांगलादेशातील नरेंद्र मोदींशी केली जाते. हे दोघेही एकमेकांचे “विशेष” सहकारी मानले जातात.

एस. आलम ग्रुप हा बांगलादेशातील सर्वात मोठा व्यापारी गट असून, याचा प्रभाव फक्त आर्थिक क्षेत्रापुरता मर्यादित नाही तर राजकीय सत्तेतही आहे. बांगलादेशातील जवळपास प्रत्येक व्यवसायात आलम ग्रुपचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप होता. जेव्हा कोणी त्यांच्याविरुद्ध आवाज उठवायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यावर “विदेशी कट” असल्याचा आरोप केला जाई.

शेख हसीना यांची सत्ता आलम ग्रुपच्या पाठिंब्याशिवाय अशक्य होती. आलम ग्रुपच्या पैशावर शेख हसीना आपला राजकीय प्रभाव प्रस्थापित करत होत्या. बांगलादेशातील कोणत्याही तपास यंत्रणेला आलम ग्रुपविरोधात कारवाई करण्याचे धाडस होत नव्हते. आलम ग्रुपची राजकीय सत्तेशी जवळीक ही देशातील आर्थिक व्यवस्थेच्या लुटीचे मुख्य कारण ठरली.

आलम ग्रुपने बांगलादेशातील बँकांकडून जवळपास 2 लाख कोटी टाका कर्ज घेतले. मात्र, हा पैसा मनी लॉन्ड्रिंगद्वारे परदेशात पाठवण्यात आला. आलम ग्रुपने बांगलादेशातील 8 मोठ्या बँकांवर नियंत्रण मिळवले होते, ज्यामुळे या बँकांना अक्षरशः कफल्लक करण्यात आले. आज या बँकांकडे एक टाकाही शिल्लक नाही.

सैफुल आलम बांगलादेश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होता, परंतु तो पळू शकला नाही. त्याच्या कंपन्यांच्या लिलावातून कर्जाचा 10% सुद्धा वसूल होऊ शकलेला नाही.

बांगलादेश सरकारने आलम ग्रुपविरोधात जागतिक तपास सुरू केली आहे. सिंगापूरमध्ये आलम ग्रुपची 1 अब्ज डॉलर्सची संपत्ती सापडली आहे. मात्र, देशातील बँकांना आणि अर्थव्यवस्थेला झालेल्या हानीची भरपाई होणे कठीण दिसत आहे.

भारतासारखेच बांगलादेशातील निवडणुकांमध्येही धांधली झाल्याचे आरोप झाले आहेत. विरोधकांवर छापे टाकणे, आमदार-खासदारांची खरेदी, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप अशा सर्व प्रकारांमध्ये आलम ग्रुपचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून आले.

सैफुल आलम आणि आलम ग्रुपवर बांगलादेशातील लोकांचा रोष वाढत आहे. अनेकांचा असा आरोप आहे की, शेख हसीना आणि आलम ग्रुप यांनी मोदी-अदाणी यांच्या साहाय्याने बांगलादेशातील बँकांची लूट केली. माध्यमे यावर मौन धारण करत असल्याने याबाबत पुरावे समोर आलेले नाहीत.

बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा “बेनामी चेहरा” आणि देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारा सैफुल आलम आता कफल्लक झाला आहे. शेख हसीना स्वतः देशा बाहेर फरार झाल्याचे वृत्त आहे.

सैफुल आलम आणि आलम ग्रुपची कहाणी भारतासाठी महत्त्वाचा धडा आहे. ज्या पद्धतीने बांगलादेशात आर्थिक आणि राजकीय लूट झाली, तीच परिस्थिती भारतात अदाणी-अंबानी यांच्यामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी जनतेने जागृत राहून लोकशाही मूल्ये जपली पाहिजेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!