परभणी घटनेतील सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी या तरुणाचा पोलीसांनी केलेल्या मारहाणीत खून झाला आहे का ? –

राजेंद्र पातोडे.
अकोला, दि. १५ –
परभणी घटनेतील सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी या तरूणाचा न्यायालयीन कोठडी मध्ये मृत्यू झाला आहे.गेली पाच सहा दिवस पासून अटक केलेल्या सोमनाथ चे अटकेची माहिती देखील त्याचे कुटुंबाला देण्यात आली नव्हती.परभणी मध्ये लॉ चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी जाणीवपूर्वक उचलण्यात आला होता.ह्या मध्ये वादग्रस्त पोलीस निरीक्षक घोरबांड ह्याचें नाव येत आहे.त्यामुळे
पोलीसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला आहे का? हा प्रश्न उपस्थित होत असून व्हिडिओ रेकॉर्ड करीत त्याचे शव विच्छेदन जिल्हा बाहेरील निष्णात डॉक्टर ह्यांचे कडून झाले पाहिजे, तसेच त्याचे बरोबर अटक केलेल्या इतरांचे बयान न्यायाधीश ह्याचे समोर घेण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी पोलीस महासंचालक ह्यांना पाठविलेल्या ई मेल वर केली आहे.
सोमनाथ ह्याचें भावा सोबत संवाद साधला असता गेले ५ दिवस त्याचे भावाचे अटकेची माहिती दिली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.ज्या दिवशी संविधान विटंबना झाली त्यावेळी त्याने व्हॉट्स ॲप वर निषेध स्टेटस ठेवले होते.असेही त्याचे बंधू सांगत होते.अचानक आज पोलीस स्टेशन कडून भाऊ सिरियस असून सिव्हील हॉस्पिटलमध्ये या असा कॉल करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
सोमनाथ ह्यांचे मृत्यू प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.त्यामुळे पोलीस कोठडी मध्ये झालेल्या
पीसीआर दरम्यान लोकल क्राईम ब्रांच आणि वादग्रस्त इन्स्पेक्टर घोरबांड कडे अटक केलेले मुलाचा ताबा होता असे सांगितले जात आहे.सोमनाथ सोबत अटक केलेले इतर सर्व ह्या घटनेचे साक्षीदार आहेत.त्यामुळे त्याचे जीवाला देखील पोलिसा कडून धोका होऊ शकतो.त्यांचे बयाण हे न्यायाधीश ह्याचें समोर होणे गरजेचे आहे.त्या बाबत वंचिततचे वतीने वकिलाची टीम काम करत आहे.स्वतः बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी सकाळी ह्या घटने बाबत कायदेशीर मार्गदर्शन केले आहे.सूर्यवंशी कुटंबाला पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे.
मुख्य म्हणजे शव विच्छेदन जिल्हा बाहेरील निष्णात डॉक्टर च्या चमूने केले पाहिजे.ह्या मृत्यूचे सत्य बाहेर आले पाहिजे.हा मृत्यू आहे की व्यवस्थेने केलेला खून आहे.परभणी पोलीसांनी ज्या पद्धतीने कॉम्बिग ऑपरेशन करीत वस्तीत जावून मारहाण केली आहे.तेच पोलिसा ताब्यात असलेल्या तरुण ह्यांचे सोबत कसे वागले असतील हे जगजाहीर आहे.त्यामुळे हा पोलिसांनी केलेला खून आहे का अशी शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे.
ह्याची तातडीने चौकशी होवून संबंधीत दोषी पोलीस ह्याचे वर कार्यवाही होणे गरजेचे आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत