डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि हरिलाल गांधी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस पक्षाने निवडणुकीत दोन वेळा पराभूत केले सामाजिक अन्यायालय तर सीमाच नव्हती बाबासाहेबांनी हे सगळे अन्याय पचवून त्याबद्दल कधी खंत केलेली नाही त्यांच्या मनात कोणाबद्दलही आकस नव्हता बदल्याची भावना नव्हती. एके दिवशी अचानक बाबासाहेबांच्या घरी महात्मा गांधीचे सुपुत्र हरिलाल गांधी बाबासाहेबांना भेटावयास आले होते त्यांना पाहून बाबासाहेबांना आश्चर्य वाटले. हरिलालना बाबासाहेबांनी माझ्याकडे येण्याचे प्रयोजन काय असे विचारले हरिलाल म्हणाले मी माझ्या बापाविरुद्ध तुमच्याकडे न्याय मागायला आलेला आहे परंतु घायाळ पक्षासारखी माझी अवस्था आहे मी दुर्बल कमजोर त्यांचे विचार अनुसरण्यास अपात्र असमर्थ माझ्या वडिलांनी आम्हाला नेहमीच जर प्रचंड हूकमती खाली आम्ही राहत आहोत कोणतेही प्रोत्साहन नाही बापाचं प्रेम आम्ही पाहिले कुठे मी घर सोडले आणि मी धर्मांतर करणार. बाबासाहेब एक चित्ताने हरिलाल ची कथा ऐकत होते बाबासाहेबांनी शांतपणे हरिलालचे सांत्वन केले ते म्हणाले हरीलाल महात्माजी आणि माझे अनेक बाबतीत मतभेद आहेत त्यांचा हट्टी आणि दुराग्रही स्वाभावही मला माहित आहे तरी महात्माजी तुझे वडील आहे आणि वडिलांच्या विरुद्ध तु जी बदनामीची मोहीम सुरू केली आहे ती मला अजिबात मान्य नाही या वयात महात्माजी तु त्रास देऊन देऊ नये हा सल्ला ऐकून हरिलालच्या डोळ्यात पाणी आले.
दत्ता गायकवाड
सोलापूर
7588266701
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत