राज्यातील ठेवीदारांना सुरक्षिततेची खात्री व अडचणीतील पतसंस्थांना पाठबळ : राधेश्याम चांडक

देशातील आघाडीची पतसंस्था असलेल्या बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी माहिती दिली की, राज्यातील बहुराज्यीय सहकारी पतसंस्थांच्या स्थैर्यासाठी ‘ॲसेट रिकन्स्ट्रक्शन को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ स्थापन करण्यात आली आहे. यासाठी मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनने पुढाकार घेतला असून १०० कोटींचे भागभांडवल उभारण्यात आले आहे. यामुळे ठेवीदारांना सुरक्षिततेची खात्री व अडचणीतील पतसंस्थांना पाठबळ मिळणार आहे.
यासंदर्भात नुकतीच मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनची निर्णायक ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेऊन ‘एआरसी’ची आचारसंहिताही निश्चित करण्यात आली आहे. बैठकीस फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उपाख्य काका कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीचे संचालक जितेंद्र जैन, आदी उपस्थित होते. बैठकीअंती एआरसी अर्थात ॲसेट रिकन्स्ट्रक्शन को-ऑप. सोसायटीची सहकारी तत्त्वावर स्थापना करण्यात आली आहे. देशातील राष्ट्रीयीकृत सहकारी व खासगी बँकांकरिता ॲसेट रिकन्स्ट्रक्शन को-आप. सोसायटी कंपनीची संकल्पना आहे. त्याच पद्धतीने ही संस्था कार्यरत राहणार आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांचे भाग भांडवल जमा करण्यात आले असल्याची माहितीही चांडक यांनी दिली. एआरसीची येत्या सहा महिन्यात केंद्रीय निबंधकांकडून नोंदणी करण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत