टीम इंडियाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वुमन्स टीम इंडियाने वुमन्स इंग्लंड महिला संघावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात भारताच्या महिला ब्रिगेडने 347 धावांनी दिमाखदार विजय मिळवला आहे. पहिल्या डावात भारतीय महिला संघाने 428 धावांचा डोंगर उभारला होता. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ गडगडला, त्यांना फक्त 136 धावा करता आल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात 186 धावा करत भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 478 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावातही अवघ्या 131 धावांवर ऑल आऊट झाला होता. भारताकडून दीप्ती शर्माच्या फिरकीसमोर इंग्लंडचे खेळाडू फेल ठरले अन् महिला ब्रिगेडने ऐतिहासिक विजय मिळवला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत