देशदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

मथुरा कृष्णाची धरती नसून बुद्धाची धरती ?

विदेशी प्रवासी फाह्यान चौथ्या शतकामध्ये भारतात आला होता. त्याने संपूर्ण भारताचा प्रवास केल्यानंतर तो मथुरेला सुद्धा गेला होता. त्याच्या प्रवास वर्णनावरून मथुरा ही त्यावेळी संपूर्ण बौद्धमय होती,असे त्याला दिसून आले होते.

फाह्यांनला मथुरेमध्ये एकही कृष्णाचे मंदिर दिसलेले नव्हते. त्यानंतर ब्रिटिश अधिकारी मेजर जनरल कनिंघम हा पुरातत्त्व विभागाचा पहिला महानिर्देशक होता. तो 20 व्या शतकामध्ये जेव्हा मथुरेला गेला तेव्हा त्याला सुद्धा तेथे उत्खननामध्ये दोन मोठे बौद्ध मठ, अनेक शिलालेख आणि मुर्त्या सापडलेल्या होत्या. त्या मुर्त्यांमध्ये एकही मूर्ती कृष्णाची नव्हती.

म्हणजेच फाह्यांन आणि कनिंघम या या दोघांनीही दिलेल्या पुराव्यावरून सिद्ध होते की मथुराही कृष्णाची नसून बुद्धाची नगरी होती.

हेनसांग हा विदेशी प्रवासी 7व्या शतकामध्ये भारतामध्ये आला होता. त्याने संपूर्ण भारताचा दौरा केला त्यानंतर तो सुद्धा मथुरेला गेला. त्याला मथुरेमध्ये काय दिसले ते त्याने त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेले आहे. ती डायरी आज पुस्तक रूपाने आपल्याला उपलब्ध झालेली आहे.

हेनसांगला मथुरेमध्ये जे दिसले ते खाली देत आहे:

सातव्या शतकात मथुरेचे नाव मोटउला होते. या राज्याचे क्षेत्रफळ 5000 ली आणि राजधानीचे क्षेत्रफळ 20 ली होते. जमीन अतिशय सुपीक आणि भरपूर अन्नधान्य पिकविणारी होती. उत्तम दर्जाच्या कापसाचे उत्पादन सुद्धा होत होते.

नैसर्गिक वातावरण थोडे गरम आणि मनुष्यांचा व्यवहार कोमल आणि आदरणीय होता. हे लोक धार्मिक ज्ञान गुप्त रूपाने घेणे अधिक पसंत करीत होते. त्याची वृत्ती परोपकारी आणि विद्येचा आदर करणारे होती.

जवळपास 20 संघाराम (बुद्ध विहार) आणि 2000 भिक्खु होते की जे समान रूपाने हीनयान आणि महायान पंथाचे अनुयायी होते. पाच देव मंदिर सुद्धा होते.(महायान पंथाच्या बुद्ध विहाराला देव मंदिर म्हटल्या जात होते. देव मंदिर म्हणजे राम ,कृष्ण, दुर्गा, काली यांचे मंदिर नव्हे). या देव मंदिरामध्ये सर्व प्रकारचे साधू अर्थात भिक्खू उपासना करीत होते.

सम्राट अशोक यांनी बांधलेले तीन स्तूप सुद्धा तेथे होते. मागील चारही प्रत्येक बुद्धांचे सुद्धा अनेक चिन्ह त्यांना दिसून आले होते. तथागत भगवान सम्यक समुद्र यांचे पुनीत (पवित्र) सहकाऱ्यांच्या शरीर धातूवर म्हणजेच त्यांच्या अस्थी वर स्मारक म्हणून अनेक स्तूप तेथे बांधले असल्याचे त्याला आढळून आले होते. उदाहरणार्थ सारीपुत्र, मुदगलपुत्र, पूर्णमैत्रेयानिपुत्र, उपाली, आनंद, राहुल, मंजुश्री असे इतर बोधिसत्व इत्यादी.

प्रत्येक वर्षी तीनही धार्मिक महिन्यांमध्ये आणि प्रत्येक मासाच्या उपोसथ व्रताच्या उत्सवानिमित्ताने भिक्खुगण या स्तूपांच्या दर्शनासाठी येत होते आणि अभिवादन पूजन करून बहुमूल्य वस्तूं भेट देत होते.

येणारे लोक आप आपल्या संप्रदायानुसार (हीनयान, महायान) वेगवेगळ्या पवित्र स्थळांचे दर्शन आणि पूजन करीत होते. जे लोक अभी lधर्माचा अभ्यास करत होते ते सारीपुत्राला , जे समाधीमध्ये मग्न असणारे मुदगलपुत्राला,जे सूत्रांचे पठण करीत होते त्या पूर्णमैत्रेयानिपुत्राला, श्रमण राहुलला आणि महायान पंथाच्या बोधिसत्वांना सन्मान देऊन अनेक प्रकारची भेट देऊन पूजा करीत होते.

रत्नजडित झेंडे आणि बहुमूल्य छत्र जाळ्याप्रमाणे सर्वत्र पसरविला जात होते. सुगंधित द्रव्यांची धूम सर्वत्र ढगाप्रमाणे पसरत असे. त्या देशाचा राजा आणि मोठमोठे अमात्य म्हणजेच मंत्री लोक मोठ्या उत्साहाने येथे येऊन धार्मिक उत्सव उपोसथ साजरा करीत होते.

या नगराच्या पूर्व दिशेला जवळपास पाच किंवा सहा ली च्या अंतरावर ते एका उंच अशा संघारामां मध्ये गेले. या संघारामाच्या बाजूला त्यांना गुफा आढळून आल्या. ते त्या गुफेच्या अंदर सुरंगाद्वारे आत गेले.ही गुफा उपगुप्त राजाने बनविली होती. सतरा वर्षाच्या वयात तो श्रमण झाला होता. त्यामध्ये एक स्तूप होता. त्यास स्तूपामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची नखे ठेवलेली होती.

या संघारामाच्या उत्तरेमध्ये एका गुफे मध्ये दगडाची एक कोटी वीस फूट उंच आणि तीस फूट रुंद होती. या कोठी मध्ये छोटे छोटे लाकडाचे तुकडे चार इंच लांब भरलेले होते. भिक्खू उपगुप्त आपल्या धर्मोपदेशाने जेव्हा कोणत्याही स्त्री-पुरुषाला शिष्य करीत होता, त्याला आरहत प्राप्त झाल्यानंतर एक लाकडाचा तुकडा त्या कोठरीमध्ये टाकत होता.

ज्याही लोकांना तो शिष्य बनवत होता त्याचा काही हिशोब त्याच्याजवळ राहत नव्हता की ते लोक कोणत्या जातीचे आणि वंशाचे होते. या स्थळाच्या 24 – 25 ली दक्षिण पूर्व दिशेला एक सुखलेल्या तलावाच्या काठाला एक स्तूप होता.

जवळच अनेक स्तूप सारीपुत्र, मुद्गगलपुत्र इत्यादी 1250 अहरतांचे स्मारक त्या ठिकाणी होते. या स्मारकावर जाऊन लोक योग समाधी इत्यादीचा अभ्यास करीत असताना त्याने पाहिले होते.

तथागत भगवान बुद्ध धम्म प्रचारासाठी अनेकदा या प्रदेशांमध्ये येत होते. ज्या ज्या ठिकाणी ते थांबले होते, स्मारक बनविण्यात आले असल्याचे त्याने पाहिले होते. (संदर्भ: व्हेनसॉंग की भारत यात्रा, लेखक व्हेनसॉंग, हिंदी अनुवाद: ठाकूर प्रसाद शर्मा, संपादक : शांतीस्वरूप बौद्ध, प्राक्कथन: डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह, मराठी अनुवादक: प्रा. गंगाधर राखले, पृ. क्र.149-152)

व्हेन सॉंग याला कुठेही श्रीकृष्णाच्या मूर्तीचे मंदिर ,रामाच्या मूर्तीचे मंदिर, विष्णूचे, काली, दुर्गा या देवी देवतांचे मंदिरे दिसले नाही. जर दिसले असते तर त्याने त्याच्या डायरीमध्ये नक्की नमूद केले असते. त्यामुळे वरील सर्व व्हेनसॉंग यांच्या नोट्स वरून स्पष्ट होते की मथुराही कृष्णाची नसून बुद्धाची नगरी होती.

मथुरेच्या उत्खननामध्ये ज्या बुद्धाच्या मुर्त्या सापडलेल्या आहेत, त्या मुर्त्यांची फोटोकॉपी खाली दिलेली आहे.

प्रा.गंगाधर नाखले
02/11/2024
7972722081,9764688712

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!