देश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

हा तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अगोदर होऊन गेलेल्या तीन बुद्धांचा प्रमाणित पुरावा आहे.

सप्त बुद्धांच्या टीम पेक्षा छोटी टीम त्रिबुद्धांची आहे. दीपवंस, आणि महाबोधीवंस नुसार ककूसंध बुद्ध , कोणागमन बुद्ध आणि कस्सप बुद्ध लंका गेले होते आणि आणि तेथे त्यांचे बोधी वृक्षांचे रोपण झाले होते. यांनाच त्रीत बुद्ध म्हटल्या जाते.

बर्मा च्या अभिलेखामध्ये त्रिबुद्धाचे वर्णन आहे. (द ग्लास पॅलेस क्रोनिकल, अनुवादक मेंग तीन एवं लुईस पृष्ठ.6- 7) फाह्यान ने त्रिबुद्धाचा उल्लेख करून लिहिले आहे की देवदत्ताचे अनुयायी शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विषयी श्रद्धाभाव ठेवीत नाही परंतु ते लोक अगोदरच्या तीन बुद्धांविषयी आदरभाव ठेवीत होते.

देवदत्ताचा संघ तथागत भगवान बुद्धाचा तिरस्कार जरी करत होते तरी तथागत भगवान बुद्धाच्या अगोदर होऊन गेलेले तीन बुद्ध ककूसंध बुद्ध, कोणागमन बुद्ध आणि कस्सप बुद्ध यांचा ते सन्मान करीत होते. त्यांची पूजा करीत होते. याच तीन बुद्धांना त्रि बुद्ध म्हटल्या जात होते.

फाह्यान याने आपल्या प्रवास वर्णनामध्ये 21 व्या खंडात कस्सप बुद्ध, ककूसंध बुद्ध आणि कोणागमन बुद्ध यांच्या जन्मस्थानाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या अगोदर तीन बुद्ध अस्तित्वात होते याचा हा प्रमाणित पुरावा होय.

या तीनही जन्म ठिकाणी फाह्यान गेले होते. आपल्या डोळ्याने पाहून त्यांनी त्या तीन बुद्धांच्या जन्मस्थानाची दिशा आणि अंतर लिहून ठेवलेले आहे.”नगराच्या पश्चिम 25 मैल अंतरावर ‘ टू – वीइ ‘; नावाचे गाव होते. हे कस्सप बुद्धाचे जन्मस्थान होय. तिथे त्यांच्या परीनिर्वाणानंतर तूप बनविल्या गेले होते. कस्सप बुद्धाच्या शरीर धातूवर एक मोठा बांधला गेला होता.

श्रावस्ती नगराच्या दक्षिण पश्चिम दिशेला 12 योजन अंतरावर “नपीइ किया” नावाच्या गावी ककूसंध बुद्ध यांचा जन्म झाला होता. तेथे सुद्धा ककुसंध बुद्ध यांच्या परिनिर्वाणा नंतर स्तूप बांधण्यात आला होता. तिथून उत्तर दिशेला एक योजन पेक्षाही कमी अंतरावर एका गावी कोणागमन बुद्ध यांचा जन्म झाला होता. तिथे सुद्धा कोणा गमन बुद्ध यांच्या परिनिर्वाणानंतर स्तूप बांधण्यात आला होता”.

या तीनही बुद्धांच्या जन्म गावी जाऊन त्यांचे स्तूप फाह्यानने स्वतः आपल्या डोळ्याने पाहिले होते. अशा प्रकारची नोंद आजही त्याच्या प्रवास वर्णनाच्या पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे. अर्थातच हा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या अगोदर बुद्ध होऊन गेलेले आहेत याचा हा खात्रीशीर पुरावा आहे.
प्रा. गंगाधर नाखले
,01/12/2024
7972722081,9764688712

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!