
सीमेला लागून असलेले हे दोन जिल्हे दहशतवादमुक्त झाले असून तिथे शांतता प्रस्थापित झाल्याचे अधिकाऱ्यांना वाटत होते, पण ते फोल ठरले आहे.कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी राजौरी आणि पूंछ जिल्ह्याला आपला नवा तळ बनवला आहे. गुरुवारी दहशतवाद्यांनी आणखी पाच जवानांची हत्या केली. या भागांमध्ये गेल्या ३६ महिन्यांत म्हणजेच तीन वर्षांत शहीद झालेल्या जवानांची संख्या ३६च्या वर पोहोचली आहे. याच काळात दहशतवाद्यांनी १२ नागरिकांचीही हत्या केली. या वर्षी २२ नोव्हेंबर आणि आता २१ डिसेंबरला अवघ्या महिनाभरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १० जवान शहीद झाले. या वर्षी ६ मे रोजी तब्बल १० महिन्यांनी दहशतवाद्यांनी दरहालमध्ये जवानांवर हल्ला केला हाेता.त्यात पाच जवान शहीद झाले होते. मात्र, या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना लष्कराने अद्याप पकडलेले नाही.
दहशतवाद्यांच्या शोधासाठी ड्रोनची मदत लष्करी जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलाने लष्करी हेलिकॉप्टर, ड्रोन तसेच लष्करातील श्वान पथकांची मदत घेण्यात आली आहे. या मोहिमेसाठी लष्कराच्या जवानांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राजौरी, पुंछ भागात घातपाती कारवाया करणारे दहशतवादी हे पाकिस्तानी लष्करातील माजी सैनिक असल्याची माहिती मिळाली आहे.
त्यांची संख्या ७ ते १० आहे. गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता दोन लष्करी वाहनांवर ढेरा की गली आणि बुल्फियाझ मार्गावर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद व दोन जण जखमी झाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत