“लाडकी बहिण” योजनेचा महायुतीला फायदा झाला” असा दावा” जेते” करतात.. ते अर्धसत्य आहे.
“लाडकी बहिण” योजनेचा महायुतीला फायदा झाला” असा दावा” जेते” करतात.. ते अर्धसत्य आहे.. पाच – दहा टक्के फरक पडला असेल नाही असं नाही पण मिळालेलं यश केवळ या योजनेचं फलित आहे हे मानायला मी तयार नाही..
महिलांच्या निर्णय क्षमतेला कमी लेखण्याचा माझा उद्देश नाही मात्र ग्रामीण भागात आजही 90 टक्के कुटुंबात, कुटुंब प्रमुख सांगेल त्यालाच घरातील महिला आणि अन्य सदस्य मतदान करतात..
हे वास्तव आहे. .
हे वास्तव नाकारणारे सत्य दडपविणयाचा प्रयत्न करतात असं मी म्हणू शकतो.. गावातील सरपंच महिला असेल तर तिचा पतीच सरपंच म्हणून गावभर मिरवतो, कार्यक्रम, बैठकांना हजेरी लावतो, गावचे निर्णय घेतो हे सत्य सर्वज्ञात आहे.. अशा व्यवस्थेत 1500 रूपये मिळाले म्हणून महिला कुटुंब प्रमुखांच्या विरोधात जाऊन किंवा त्याला न विचारता स्वतःच्या मर्जीनुसार मतदान करतील किंवा करतात हे कथन पचणी पडत नाही..शहरी भागात काही अंशी महिला आपला निर्णय घेतात हे खरं आहे, पण तो टक्का नगण्य आहे..
मग लाडकी बहिण मुळे हे यश मिळाले असा गवगवा का केला जातोय? असा प्रश्न पडू शकतो..?
याचं कारण म्हणजे विजयासाठी जे “तंत्र” वापरले गेले आहे त्यावर फोकस येऊ नये अशी यामागे चलाखी आहे..
बघा,
कोणतीही लाट नाही,
कोणतीही सहानुभूती नाही
आणि कोणाला अपेक्षा देखील नाही
मग एवढे मोठे यश कसे मिळाले? एक्झीट पोलवर माझा विश्वास नाही तरीही विजयाचे आकडे बघता असा अंदाज एकाही एक्झीट पोलने व्यक्त केला नव्हता..
मग हे कसं घडलं?
काही विरोधक म्हणतात हा धनशक्तीचा विजय आहे.
काही जण EVM च्या माथी खापर फोडतात..
काही जण “बटेंगे तो कटेंगे” या घोषणेला श्रेय देतात,
काही जण “परिवार” बाहेर पडल्याचं सांगतात..
हे सारे अंदाज आहेत..
पुरावे कोणाकडेच नाहीत..
पण एका गोष्टीवर सारयाचं एकमत आहे,ते म्हणजे,
कुछ तो गडबड है!
ही गडबड नेमकी काय आहे?
याचा शोध घेण्याची गरज आहे..
EVM बद्दल नुसती शंका घेऊन उपयोग नाही.. ही व्यवस्था कशी दिशाभूल करणारी आहे हे सप्रमाण सिध्द करावं लागेल..
“नाही तर झारखंडमध्ये EVM बरोबर आणि इकडे तुम्ही पराभूत झालात म्हणून EVM च्या माथी अपयश मारता” असा नेरेटिव्ह भाजप आणि भक्तांनी पसरवायला सुरूवात केली आहेच ..
मग लोकांनाही हे खरं वाटायला लागतं..
त्यामुळे EVM बद्दल आपली शंका असेल तर त्याच्या मुळाशी जाऊन पुरावे शोधावे लागतील..त्या विषयातलया तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल..
हवेत बोलण्याला अर्थ नाही..
बोललं तरी ते कोणी गांभीर्यानं घेणार नाही..
घेतही नाही..
आणखी एक गोष्ट अशी की, हरियाणात मोदी प्रचार अर्धवट सोडून गेले,
तिकडे भाजप जिंकली,
महाराष्ट्रातही मोदी अर्धवट प्रचार सोडून गयाना सारख्या 8-10 लाख लोकसंख्या असलेल्या देशाला निघून गेले.. शेवटच्या टप्प्यात अमित शहा देखील गायब झाले..
भाजपनं महाराष्ट्र जिंकला..
हा खरंच केवळ योगायोग आहे की, त्यामागे काही “नियोजन” आहे याचाही शोध घ्यावा लागेल..
प्रश्न कोण घेणार हा शोध ? हा आहे..
आपण फक्त एकमेकांना सल्ले देतो,
असं व्हायला हवं, तसं व्हायला हवं
म्हणत सोशल मिडियावर व्यक्त होत राहतो..
पुढं?
पुढं काहीच होत नाही..
पुढाकार घेऊन हे कोणाला तरी करावं लागेल..
कोण घेणार पुढाकार?
“निर्भय बनो” नं लोकजागृतीच्या दृष्टीनं गेल्या अठरा महिन्यात मोठं योगदान दिलं आहे..
विश्वंभर चौधरी, असिम सरोदे
आणि त्यांच्या टीमवर लोकांचा विश्वास देखील आहे.. त्यामुळं निर्भय बनोला माझी विनंती आहे, त्यांनी एक टीम तयार करून सत्याचा शोध घेत, नेमकं काय घडलं याचा एक अहवाल तयार करावा आणि तो जनतेसमोर मांडावा..खरंच EVM चा दोष असेल तर याविरोधात जनमत संघटीत करण्याबरोबरच न्यायालयात जाता येईल काय याचाही विचार करता येऊ शकेल..
आज वेळ गेलीय,
पण मिळालेलं यश पाहून पुढील काही दिवसात अनेक वर्षे रखडविलेलया मुंबई महापालिका किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील ..
आज शोधलेले निष्कर्ष तेव्हा नक्की कामी येतील..
मी फुकटचे सल्ले देणारयांपैकी नाही..
या “सत्य शोध” मोहिमेत माझं आणि माझ्या संघटनेचं योगदान द्यायला मी तयार आहे..
कारण प्रश्न फक्त कोण जिंकलं, कोण हरलं एवढयापुरता मर्यादित नाही, तर प्रश्न गैरमार्गाने सत्ता हस्तगत करण्याचा आणि त्यानिमित्तानं लोकशाहीला निर्माण होणारया धोक्याचा आहे..
संविधान प्रेमींना काळजी तर घ्यावीच लागेल..
S. M. Deshmukh
🌹🌹🌹
विकृतांचासुकाळ #सुमारांचीसद्दी #धंदाधर्माचा #धर्मांधविकास #भांडवलशाहीगुलामी #लोकशाहीचेधिंडवडे #संपवलेली_लोकशाही
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत