वंचित बहुजन आघाडी व प्रणिती शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक

सोलापूर : ताई, नवीन पक्षाचा मुहूर्त कधी? अशी पोस्ट सोशल मिडियावर शेअर करत वंचितनं प्रणिती शिंदे यांना थेट सवाल करत डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
काल सोलापूर येथे कॉर्नर सभेत प्रणिती शिंदे यांनी मतांच गणित मांडत भाजपा ला कसा फायदा होतो ते सांगितल होत.
इतके दिवस पक्षात थांबल्यानंतरही तुमचं तुमच्या पक्षासोबत का जमत नाही? अशीही विचारणा वंचितनं केलीय.
सोलापूर येथील कार्यक्रमात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी टीका केली. या टीकेला वंचित बहुजन आघाडीनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही ठीक आहात? आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही. नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे? असा सवाल वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या एक्स हॅण्डलवरून आमदार प्रणिती शिंदे यांना केला आहे.
ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक. आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही, असेही यामध्ये म्हटले आहे.
आम्ही महाराष्ट्रातील वंचित – बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो. असो, या सर्व गोष्टी बंद करा, असा सल्लाही वंचित बहुजन आघाडीने या ट्विटमधून दिलेला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत