महाराष्ट्रातील मतदारांनी बोध घ्यावा…!
महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीतील कळीचे आणि दखलपात्र मुद्दे असे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, काका पुतण्याची लबाडी सांगतोय तर पुतण्या काकाची बदमाशी रंगवून सांगतोय. भाऊ बहीण नात्यात वितुष्ट कसे आले एवढेच बोलतात, कुणी, कुणाला फसविले त्याचा पाढा वाचतात जनतेच्या प्रश्नांचे काय ?
काका पुतण्याचा सत्ता संघर्ष चाललाय जनतेच्या प्रश्नांवर ,मराठा आरक्षणावर,ओबीसी आरक्षणावर, एस. सी. एस. टी. आरक्षणावर यांना बोलायचेच नाही. शेतमाल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबत यांना काहीच देणेघेणे नाही. तरुणांची बेरोजगारी, जुनी पेन्शन योजना,असंघटीत कामगारांचे जटील प्रश्न समाजाचा अर्ध्या हिस्सा महिला सबलीकरण यावर चकार शब्द बोलतं नाहीत. घराणेशाही शाबूत ठेवणे एवढा एकच उद्देश आहे…!!
महाराष्ट्रातील मतदारांनी ठरवायचे आहे. घराणेशाही हवी की, आपले प्रश्न सोडवायचे आहेत. शिवसेनेमध्ये खरा हिंदुत्ववादी कोण हे दाखविण्याची होळ लागली आहे.. गद्दार हा शब्द परवलीचा झाला आहे. एक दुसऱ्याला गद्दार म्हटल्याशिवाय यांना पाणीही पचतं नाही. उबाठा विरुध्द शिंदे सेना आणि त्यातच भरीस भर मनसे एकमेकांची उणी दुणी काढू लागले आहेत. राज ठाकरे उद्धव यांना टार्गेट करीत आहेत तर संजय राऊत राज ठाकरे वर तोंडसुख घेत आहे….!!
या सगळ्या भाषणांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सुटतील का ? महाराष्ट्रातील मतदारांनी गांभीर्यपुर्वक विचार केला पाहिजे यांच्या घराणेशाही शाबूत ठेवण्याच्या लढाईत हे एकमेकांवर दोषारोप करून जनतेला मुर्ख बनवित आहेत. निवडणुकी नंतर एकत्र येऊन सरकार स्थापन करणार आहेत. ओबीसी,एस.सी.एस.टी.चे आरक्षण संपले तर पुढच्या पिढीच्या भवितव्याचे काय ?
महाराष्ट्रातील मतदार बांधवांनो विचार करणार की नाही ?
भाजपा ने असली रंग दाखवायला सुरुवात केली आहे.बटेंगे तो कटेंग. एक है। तो सेफ है। ओबीसी बांधवांचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थगिती देऊन थांबविले. पुढे तोच आधार लावून शैक्षणिक नोकरी विषयक आणि पदोन्नती मधील आरक्षण सुद्धा संपणार आहे.ओबीसी हा हिंदू मधील सर्वात मोठा ५२% घटक आहे. त्यांच्या राजकीय भवितव्याची आणि अस्तित्वाशी भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही सरंजामी राजकीय पक्षांना फिकीर नाही मात्र मतांच्या धृर्वीकरणाचा खेळ खेळला जातो आहे. एकत्र येण्याची हाक दिली जाते आहे.त्यांची जातिनिहाय जनगणना का करीत नाही.? त्यांचे आरक्षण वाचविण्याचा प्रयत्न का केला जात नाही.?इम्पेरिकल डेटा का दिला नाही.?
ओबीसी बांधवांनो गांभीर्य पुर्वक विचार करा. तुमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा प्रश्न आहे….!!
कॉंग्रेस पक्ष दलित आणि मुस्लिम मतांसाठी धडपडत आहे. नवे नवे सोंग करीत आहे. संविधान बचाव असा बनाव रंगवत आहे. आरक्षण हा संविधानाचा आत्मा आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाने ओबीसी, एस. सी. एस. टी. चे आरक्षण धोक्यात आले आहे यावर कॉंग्रेस पक्ष चकार शब्द बोलतं नाही. तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये एस. सी. एस. टी. च्या ऊपवर्गीकरण आणि क्रिमीलेअर ला लागू करीत आहे हा सवर्ण मानसिकचा राजकीय पक्ष आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे. एका बाजूला दलित, मुस्लिम मते हवीत मात्र दलित, मुस्लिम नेतृत्व ऊभं राहूच नये म्हणून कॉंग्रेस पक्ष खबरदारी घेतोय, दलित मुस्लिम समूहाला प्रतिनिधित्व मिळूच नये म्हणून तिकिटे नाकारतोय हे कशाचे लक्षणं आहे.??
महाराष्ट्रातील मतदारांनो….
घराणेशाही मजबूत करणा-या घराणेशाही मध्ये सत्ता राहिली पाहिजे म्हणून धडपडणाऱ्या या बहूरुपी सोंगाड्या राजकीय पक्षांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे हे लक्षात घ्या…!!
तुमच्या प्रश्नांशी, समस्यांशी आणि भवितव्याशी यांना काहीही देणेघेणे नाही हे स्पष्ट दिसत आहे….!!
ओबीसी+एससी+एसटी+ मुस्लिम= सत्ता हे समीकरण आपलं आरक्षण वाचवू शकते हे लक्षात घ्या….!!
घराणेशाही थांबवा आणि आपले प्रश्न सोडवा….!!!
: भास्कर भोजने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत