महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक
दि.२४ मार्च २०२४. जागर – ५ वा. …. राजाराम सूर्यवंशी .


जोतिबांचा पाचवा उन्मेष होता.सतीच्या चाली विरोधी प्रखर प्रबोधन व प्रत्यक्ष कार्य .
सती जाण्याची अनिष्ठ चाल हिंदुस्थानात प्रथम बादशाहा अकबराने बंद केली होती . त्यानंतर इंग्रजांचे भारतावर राज्य प्रस्थापित झाल्यावर गव्हर्नर जनरल लाॕर्ड बेंटींग यांनी १८३० मध्ये ती चाल बंद केली होती . त्यावर सनातनी वृत्तीच्या लोकांनी इंग्रजांविरुध्द आक्रोश व्यक्त करुन जनतेची धार्मिक दिशाभूल केली होती . इंग्रजांनी महिलांचा स्वर्ग सुखाचा मार्ग बंद केला आहे , असा अपप्रचार सनातन्यांनी केला होता.
स्वर्गवासाची अनेक वर्णने पुराण ग्रंथात आहेत ,ती सर्व काल्पनिक आहेत याबाबत जोतिबा सांगायचे की , " एकंदर सर्व धर्मग्रंथात स्वर्ग आहे म्हणून लिहितात .परंतु या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एक तरी गृहस्थास स्वतः स्वर्ग पाहिला म्हणून सांगता येईल का ? सर्व काल्पनिक पुराण ! शब्दांच्या अर्थाकडे लक्ष देऊन पौराणिक कथेवर विश्वास न ठेवता एखादा मनुष्य स्वर्ग पाहण्यास गेला व तो परत आला अशी कधीतरी गोष्ट घडून आली आहे काय ? अशा प्रकारचा एखादा मनुष्य तरी भूभागावर सापडेल काय ?"
अशा व असे अनेक प्रकारचे प्रबोधन जोतिबा सतत करीत व जनतेला सतीप्रथेपासून परावृत करीत असत.
जोतिबांचे एक ब्राह्मण मित्र सदाशिवराव गोवंडे यांची एक बहीण सती गेली होती . त्यावेळचे तीचे करुण्यरुदन व कर्मठांची विखारी अट्टाहासी पाहून ते अनेकदिवस खिन्न झाले होते .त्यावेळी जोतिबांच्या विचारकार्य व प्रबौधनाचे सामाजिक महत्व गोवंडेंना पटून ते जोतिबांचे साहाय्यार्थी बनले होते .
जी स्त्री सती जात नसे तीला विद्रुप करुन सारे आयुष्य सासरच्या जाचात व अंधार कोठडीत काढावे लागत असे.तीच्या लिहिण्याच्या ,शिकण़्याच्या , खेळण़्याच्या ,बागाडण़्याच्या वयात तीच्यावर पुरुषसत्ताक गुलामगिरी लादली जात असे .
एकिकडे धर्म ,कर्तव्य व रुढींचे पालन केल्याचे भासवायचे व दुसरीकडे घर-वाड्यातील स्वार्थी व ढोंगी लंपटांनी अंधाराचा गैर फायदा घेऊन तीचे शोषण करायचे .
अशा पीडीतांच्या जीवनात पुन्हा आनंद निर्माण करावयाचा असेल तर व सतीची चालीला पर्याय द्यायचा म्हणजे पुनर्विवाह हा एकच मार्ग हे जोतिबांनी जाणले होते .त्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ८ मार्च १८६४ रोजी एका शेणवी विधवा -विधुरांचा ,हे दोन्ही ब्राह्मण जातीचे होते , यांचा पुनर्विवाह घडवून आणला होता . जे कार्य स्वजातीच्या हितासाठी ब्राह्मणांनी करायला हवे होते ,ते मानवजातीच्या हितासाठी जोतिबांनी करुन सतीप्रथा व विधवाप्रथेला कायमची मुठमाती देण्याचा कृतीशील मार्ग दाखवला आहे.
या सर्व कारणांनी महात्मा जोतिबा फुले हे मला कायमच आपले खरे राष्ट्रपिता वाटत आले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत