अनुसूचित जाति हा वर्ग कोणत्या ही धर्माचा भाग नाहीत:- गोविन्दकुमार जी चिंचोलीकर
अनुसूचित जाति हा कोणत्या ही धर्माचा भाग नाहीत, तर हा एक स्वतंत्र वर्ग आहे. या अनुसूचित जाति च्या वर्गात 1108 जाति समुह येतात. हे ना हिन्दू आहेत, ना हे मुस्लिम आहेत,ना हे ख्रिश्चन आहेत, ना हे पारसी आहेत, ना हे जैन आहेत.
अस्पृश्य जाती निर्मितीचा इतिहास
डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित मुळचे अस्पृश्य कोण या पुस्तकात बाबासाहेब सांगतात कि, हिन्दू च्या प्राचिन स्मृति या ग्रंथात मुळात एकुण 12 प्रकार चे समुह आढळतात. ज्या पुर्विच्या बौद्ध होत्या. हे 12 प्रकार चे समुह म्हणजे आजचे Sc/St/Obc आहेत. जे कलम 340, 341, 342 चे संविधानिक हक्कदार आहेत.
या मुळ 12 समुहामध्ये मध्ये एक चमार समुह आढळतो. या 12 समुहापैकी 11 प्रकारच्या समुहाने गायीचे मांस खायचे सोडले आणि चमार समुहाने गायीचे मांस खायचे सोडले नाही. म्हणुन 11 समुहानी मिळुन चमार समुहाला दूर केले, वाळीत टाकले. हाच एक अस्पृश्य चमार समुह 1108 जातिं समुहाची जननी आहे. ज्याना आज संविधान भाषेत S.C. सेड्युल कास्ट म्हटले जाते.
हिन्दू धर्माचा उदय
हिन्दू धर्माची ही तिसरी अवस्था आहे. बौद्ध धम्माच्या अस्ता नंतर इ.स.पुर्व 190 च्या दरम्यान, सम्राट अशोक च्या कालकिर्द समाप्तीनंतर वैदिक धर्माचा उदय झाला. याच काळात परशुराम सारख्या आर्य ब्राह्मणांनी बौद्ध संस्कृति चा आणि बौद्ध स्तुपांचा नाश करुन बौद्धांना व बौद्ध भिक्कूच्या खुलेआम कतली केल्या गेल्या.त्या काळचे क्षेत्रिय बौद्ध म्हणजे आजचे एससी, एसटी, ओबीसी आहेत. यांना बंदी करुन गुलाम केले गेले. आणि शेती, व्यवसाय ,शिक्षण, नोकरी, मालमता, हत्यार, वापरण्यास बंदी केले, मुळचा बौद्ध म्हणजे आजचा Sc, St, Obc, Minority बहुजन समाज मानुस म्हणुन नाकारला, तो महात्मा फुलेच्या काळा पर्यंत, म्हणजेच 2000 वर्ष.
हिन्दू धर्माची दुसरी अवस्था म्हणजे ब्राह्मण धर्म 7 व्या शतकात मुस्लिम धर्माच्या उदया नंतर ब्राह्मण धर्माचा उदय झाला. ब्राह्मण धर्म 11 व्या शतकापर्यंत अस्तित्वात राहीला. याच काळात रामायण, महाभारत, भगवत गिता, पांडव प्रताप, हरी विजय, सारखे अनेक ग्रंथाची निर्मिती झाली. बुद्ध कालिन बौद्ध शिलालेख व बौद्ध स्तुपांची नाशधुस करुन व बुद्ध मुर्तिचें विद्रुपीकरण करुन 18 पुरान,चार धाम, 12 ज्योतिर्लिंग, तिरुपती बालाजी, पंढरपुरचा विठ्ठल या सारख्या 84 हजार बौद्ध विहारांचे मंदिरात रुपांतर करुन काल्पनिक अवतार घेतलेल्या देवी देवतांची निर्मिती केली. ब्रह्म, विष्णु, महेश, दशरथाचा राम, तिरुपतिचा बालाजी,पंढरीचा विठ्ठल यांचे मुळ रुप गौतमबुद्ध आहे.भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध सोडून बाकी सर्व प्राचिन, पुरातन असल्याचे थोतांड आहे. वाचा प्रबोधनकार केशवराव ठाकरे.
हिन्दू धर्म ही तिसरी अवस्था
12 व्या शतकात मोगल भारतात आले.हिन्दू धर्म हा मोगल कालीन 12 व्या शतकात हिन्दू चा उदय झालेला दिसतो. त्या पुर्वी हिन्दू हा शब्द वैदिक काळातील, ब्राह्मणी काळातील रामायण, महाभारत, स्मृति, मनुस्मृति, भगवत गीता, लिळा चरित्र,पांडव प्रताप, हरी विजय, दासबोध, तुकारामाची गाथा, ज्ञानेश्वरी, 18 पुरान एवढेच नव्हे तर 12 व्या शतकापर्यंत अस्तित्वात असलेल्या कोणत्या ही वैदिक व ब्राह्मणी धर्मग्रंथात हिन्दू शब्द आढळून रेत नाही.मोगल भारतात आल्यानंतर युध्दात हारलेल्या बमण,बनिया, ठाकुर या 15% लोकानां, मोगलानी अपमानास्पद दिलेली दिलेली शिवी असल्याचे दिसुन येते. अर्थात 12 व्या शतकापर्यंत हिन्दू शब्द अस्तित्वात नव्हता. याचाच अर्थ हिन्दू शब्दाचा उदय मोगलानी निर्माण केलेला आहे. हिन्दू ही मोगलांनी युध्दात हारलेल्या भारतीय लोकांना अपमानास्पद ,हिन, तुछ, या अर्थाने दिलेली शिवी आहे. तरी सुध्दा काही लोक स्वत:ला हिन्दू म्हणुन घेण्यास धन्यता मानतात.
आता कोणत्या धर्मांचा उदय कधी झाला ते पाहु
जैन धर्म ई.स.पुर्व 590 मध्ये, बौद्ध धम्म हा ई. स.पुर्व 560 मध्ये, ख्रिश्चन धर्माचा उदय ई.स. सन पहिले शतकात. मुस्लिम धर्माचा उदय 7 व्या शतकात, हिन्दू धर्माचा उदय 12 व्या शतकात, शिख धर्माचा उदय 16 व्या शतकात.
अस्पृश्य जातीं चा इतिहास
स्वातंत्र्य पुर्व ब्रिटीश काळात तत्कालीन प्रधानमंत्री रेम्स मेक्डोनाॅल्ड यांच्या अध्यक्ष ते खाली की डी टंडन आयोग नेमुन 1931 मध्ये जाति जनगणना करण्यात आली होती. त्यात पुर्वी बौद्ध असलेल्या 1108 जाति अशा दिसुन आल्या. आर्य म्हणजे ब्राह्मण आणि अनार्य म्हणजे बौद्ध. यांच्या संघर्षात युध्दात शरण न गेलेल्या या 1108 जातिसमुह बौद्ध असल्या कारणाने कपटाने त्याना बंदिस्त करुन त्यांच्यावर अमर्याद बंदने लादली गेली. एवढेच नन्हे तर त्याना शिक्षण,अर्थ उद्योग, आणी हत्यार वापरण्यावर बंदी करुन 2400 वर्ष मानुस म्हणून नाकारले होते. अशा या 1108 जाती चा विकास करणे व माणुस म्हणुन जगनेसाठी इंग्रज सरकार ने 1934 ला कायदा केला.त्या नंतर डॉ बाबासाहेब b आंबेडकर याना संविधान लिहीन्याची संधी मिळताच बाबासाहेब आंबेडकर ने या 1108 जातिना अनुसूचित जाति मध्ये समाविष्ट करुन संरक्षण, आरक्षण आणि प्रमोशन दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत