सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली भिडेवाड्यासंदर्भात रहिवाशांची याचिका.

मुलींची पहिली शाळा असलेल्या पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भातील याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. पुणे महापालिकेला भिडे वाडयाचा ताबा देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिला होता. या निकालाविरोधात भाडेकरूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी दरम्यान, तेरा वर्षे या स्मारकासाठी न्यायालयीन संघर्ष करावा लागल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त करत तुम्हाला दंड का करू नये, असा प्रश्न याचिकाकर्त्यांना केला आहे. भिडे वाडयाचं राष्ट्रीय स्मारक करण्याचं काम २००६ पासून रखडलं आहे. भिडे वाडयाची मालकी एका सहकारी बँकेकडे आली होती. या बॅकेच्या २४ भाडेकरूनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत