उठा उठा निवडणूक आली,जोडे उचलण्याची वेळ झाली…
समाज माध्यमातून साभार
लाज-शरम खुंटीला टांगून ठेवूयात,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
कोणी पार्थ घ्या,
कोणी रणजित घ्या..
कोणी आदित्य घ्या
अमित घ्या,
अरे कोणी विख्यांचा सुजय घ्या…
घराणेशाही बळकट करूयात,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
दत्तांची प्रिया अन महाजनांची पूनम,
सुळ्यांची सुप्रिया अन मुंड्यांची प्रीतम…
महिलाशक्तीचा जागर करूयात,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
ठाकरे, पवार, मुंडे, गांधी,
हीच तर देशाची खरी संपत्ती…
घराणेशाहीचा वारसा बळकट करूयात…
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
चपटीतला पेग, अन मटणाचं हाडुक,
आपापल्या साहेबांच्या कथा, अन भक्तीच्या गाथा…
चवीने पोटभर चघळूयात,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
प्रपंचाची होळी, साहेबांची राजकीय पोळी,
बकाल आयुष्याचा तांडा, पण झेंड्याचा दांडा…
झुंडीने उंच उंच मिरवूयात,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
करतल, पादुका अन चरणस्पर्श,
हेच आपुले कर्म, अन हाच आपुला चरितार्थ…
जयजयकार अन गर्जनांनी साहेबांना वंदुयात,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
देशभक्त तोच.. जो सीमेवर मरे,
तुम्हा रोजच्या कार्यकर्त्यांच्या कुत्र्यागत मरण्यावर कोण रडे…❓
साहेबांच्या राष्ट्रभक्तीच्या मार्गावर चालूयात,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
नेता झाला, नेत्याचा मुलगा -पुतण्या आमदार, खासदार झाला, आता नातू आला,
कार्यकर्ता मात्र पुन्हा सतरंजी उचलण्यास तयार झाला..
अरे येडयांनो…
आपली परंपरा कायम राखुयात,
लाज-शरम खुंटीला टांगून ठेवूयात,
चला कार्यकर्ते हो ….आपण कायमच सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
हे लक्षात घेऊन आजपासून प्रारंभ करुया,
खूपच सुंदर लिहिलं आहे..ही राजकीय पोस्ट नाही, तर सत्य परिस्थिती सांगितलेली आहे. आवडल्याने जशास-तसे पुढे पाठवत राहावे अशी अपेक्षा….., जेणेकरून हे वाचल्यानंतर किमान एक तरी कार्यकर्ता घराणेशाहीच्या जीवावरील भाई – दादा- भाऊंचे जोडे उचलायचे बंद करेल…!!!】
सर्वांनी यातून बोध घेणे गरजेचे आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत