28 ऑगस्ट 1937 च्या मुंबई येथिल ठरावाचे पालन केले पाहिजे.
-अनिल वैद्य✍
धर्मांतरा पूर्वीच 28 ऑगस्ट 1937 ला म्हणजे जेव्हा आपण हिंदू होतो तेव्हाच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला अस्पृश्य वर्गाची जंगी जाहीर सभा झाली त्या सभेत हिंदू धर्माचे सणवार ,व्रत विकल्य,धार्मिक आचार पाळायचे नाही असा पहिलाच ठराव मंजूर करण्यात आला.
त्या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अध्यक्षीय भाषण झाले त्यात ते म्हणाले
“हिंदू धर्मा प्रमाणे आपण जे पाळीत होतो ते सर्व धार्मिक सण वार सोडून दिले पाहिजे “याच भाषणात त्यांनी शंकरजी व गणपती,दत्तात्रय यांच्या कथा कशा विचित्र अहेत तेही सांगितले (संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 18(2) पृष्ठ45 व 46 )
डॉ बाबासाहेब आंबेडकर या सभेत म्हणतात “सभेतील ठराव सर्वांनी पाळावेत .काही थोडे लोक ठरावं मानत नाह असे कळले तेंव्हा त्यांनी बहुमतवाल्या लोकां प्रमाणे वागावे लागेल”. (खंड 13 (2) पृष्ठ 45 व 46) हिंदूंचे सण साजरे करण्यात भूषण मानणाऱ्यानी या उपदेशाचे अवलोकन करावे. पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदीर पूर्वीचे बुद्ध विहार आहे हे माहीत असताना सुद्धा जेव्हा रमाईने पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी इच्छा व्यक्त केली तेव्हा बाबासाहेबांनी त्यांची ती इच्छा पूर्ण केली नाही. कारण ते पूर्वीचे जरी बुद्ध विहार होते परंतु आता ते हिंदूंचे विठ्ठल मंदीर आहे,आणि या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता, त्यांच्या सावलीचाही देवाला विंटाळ होत होता. दुरूनच दर्शन घ्यावे लागत होते. ही वर्तमान परिस्थिती बाबासाहेबांनी स्वीकारली आणि म्हणूनच त्यांनी आपल्या रामाईची इच्छा पूर्ण केली नाही. परंतु त्यांनी रमाईला अश्वासन दिले की ,”आपण नवीन पंढरपूर निर्माण करू, जिथे सर्वांना प्रवेश असेल, कोणाशीही भेदभाव होणार नाही”.
हिंदूंचे सण साजरे करणार नाही असा 28 ऑगस्ट 1937 ला ठराव मंजूर केला असल्याने तो समाजाचा ठराव असतो.
दिवाळी हा हिंदू सण म्हणूनच जगजाहीर आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांना
हिंदू संस्कृती चा पगडा झिडकारून द्यायचा होता
म्हणून हिंदू सण नाकारले पण शाहू महाराज जयंती सना सारखी साजरी करा म्हणाले हे समजून घेणे गरजेचे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक चळवळ केली
व स्वाभिमान जागृत केला.
दिवाळी साजरी करा अशा पोस्ट फिरत आहेत म्हणून माझा प्रश्न आहे की,
दिवाळी ही हिंदूंची म्हणून
भारतात प्रसिद्ध आहे की नाही?
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिवाळी का साजरी केली नाही?
हिंदूनी अस्पृश्यता लादली तेव्हा तुम्हाला इतके लाचार केले होते की तुमची कुठली दिवाळी आणि कुठला दसरा?
हे सर्व अधिकार उच्यवर्णीय लोकांकडे होते.घरात एक दिवा नव्हता कुना मुळे हा अंधकार होता?
सणवार त्यांनी साजरे करायचे व आम्ही फ़क्त बघायचो .
आपली चळवळ ही सामाजिक परिवर्तन व स्वसन्मानाची आहे
दिवाळी हिंदूंची म्हणूनच मान्यताप्राप्त आहे
28 ऑगस्ट 1937 ला हिंदूंचे सण साजरे करू नये असा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथील अस्पृशांच्या सभेत ठराव मंजूर केला व भाषण सुद्धा दिले हे मी आधी लिहले आहे मला हे लक्षात आणून द्यायचे की,
हिंदूंचे सण हा शब्द प्रयोग आहे यात दिवाळी हाच मोठा व मुख्य सण आहे बाकीचे किरकोळ आहेत
तर हिंदू सण असे म्हणतांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतूंन दसरा दिवाळी नक्कीच सुटणार नाही
दिवाळी साजरी
करण्यासाठी आग्रही लोकांनी सामाजिक चळवळ सुद्धा लक्षात घेतली पाहिजे.गुलामी नष्ट करणे व स्वाभिमानि समाज बनविण्यासाठी त्यांची चळवळ होती.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रमाण मानले नाही तर ही चळवळ नेस्तनाबूत होईल हे लक्षात घ्यावे.कुणीही कुणाचे ऐकणार नाही आपण म्हणता तसे सर्व लोक आपापले म्हणणे खरे करतील. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे प्रमाण असणे वर्तमान व भविष्याची गरज आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे प्रमाण मानणे ही बाब डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी विसंगत नसुन सुसंगत आहे.ज्या बाबी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकर्षाने मांडल्या त्यावर वेगळे मत मांडण्या इतके जगात कुणी विद्वान झाले नाही . बाबासाहेबांची सामाजिक चळवळ व त्यातून धम्म क्रांती अशी संलग्न चळवळ आहे ती लक्षात घेणे गरजेचे आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिशा दिली ती पूर्व दिशा न मानणे व दिवाळी साजरी करण्यासाठी अट्टाहास धरणे चळवळीला दिवाळखोरीत नेणे आहे.
डॉ भाऊ लोखंडे आणि विनोद अनावृत्त यांची आवाज इंडिया वर असलेली मुलाखत ऐकली तर हा विषय समजेल .
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या उपदेशाचे विरोधात घेतलेली भूमिका व त्यांचे विचार प्रमाण मानायचे नाही ही भूमिका चळवळीला विसंगत आहे.
संशोधकांनी जरूर अभ्यास करावा पण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खोडण्यापूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व सामाजिक कार्य याला समजून घेतले पाहिजे.
दिवाळी साजरी करा असे आपले म्हणणे मांडणाऱ्या नी उत्तर द्यावे की
1),28 ऑगस्ट 1937 ला हिंदू सण साजरे करायचे नाही असा ठराव का मंजूर केला?
2 ) असा ठराव मंजूर करतांना दिवाळीला अपवाद का केले नाही.
3 ) दिवाळी हा हिंदू चा सण म्हणून ओळखल्या जात नाही काय?
4) धर्मांतरित बौद्धांच्या सामाजिक परिवर्तनासाठी लाचारी हटाव मोहीम
आवश्यक नाही काय?
6 ) 28 ऑगस्ट 1937 चा ठराव आपण का नाकारत आहात अशी कोणती आता नविन परिस्थिती निर्माण झाली?की तुम्हाला दिवाळी साजरी करावीशी वाटते?
7 ) ज्या उच्यवर्णीय लोकांनी शेकडो दिवे लावून फटाक्यांची बरसात केली तेव्हा आमच्या घरात अंधार का होता? कोण लोक जबाबदार आहेत ?याचा विचार करा.
28 ऑगस्ट 1937 च्या ठरावाला बांधील राहा
अनिल वैद्य
✍✍✍✍👍
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत