मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिमायतनगर तालुक्यातील एका युवकाने केली गळफास घेऊन आत्महत्या

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावात चिंतेत असलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्याने चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिमायतनगर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तर, या बंदला स्थानिक व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत बाजारपेठ बंद ठेवले आहे. तसेच काही लोकांचा जमाव सध्या पोलीस ठाण्याच्या समोर जमा झाला असून, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. सुदर्शन देवराये असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सुदर्शन देवराये या तरुणाने अनेक आंदोलनात सहभाग घेतला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याने गावात साखळी उपोषण देखील सुरु केले होते. मात्र, आरक्षणाचा मुद्दा मार्गे लागत नसल्याने सुदर्शने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुदर्शने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये, “शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही,” असा उल्लेख करण्यात आला आहे. तर ही घटना समोर आल्यावर परिसरात खळबळ उडाली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने सुदर्शन देवराये या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आज सकाळी हिमायतनगर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तर, मोर्चा देखील काढण्यात आला. दरम्यान याचवेळी काही तरुणांनी टायर देखील पेटवून दिला होता. तर काही लोकांचा जमाव सध्या पोलीस ठाण्यात असल्याचे समोर येत आहे. मात्र, सध्या शहरात पूर्णपणे शांतता असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, कोणीही अफवा पसरवू नयेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत