विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८ जुलै २९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली

बाबासाहेबांनी बहिष्कृत वर्गाच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला.त्यांनी २९ मे १९२८ रोजी ब्रिटिश सरकारला केलेल्या निवेदनात १७७२ च्या ब्रिटिश सरकारच्या कायद्याने मागासवर्गीयांना शिक्षणाचा हक्क नाकारण्याचा प्राचीन व मध्ययुगीन वारसा चालू ठेवला होता हे निदर्शनास आणून दिले.परिणामी १७७२ ते १८५५ या ८३ वर्षाच्या काळात बहिष्कृत वर्गाला शिक्षणाची दारे बंद होती.ब्रिटिशांनी शेवटी १८५५ ला गरीब बहिष्कृत वर्गासाठी शिक्षण खुले केले मात्र उच्च जातीच्या प्रखर विरोधामुळे इतर जातीसाठी वेगळ्या शाळा काढल्या तरीही शैक्षणिक प्रवेशदरात फारशी सुधारणा झाली नाही.१९२३ ला प्रवेशदर जवळपास नगन्य होता
म्हणून १९२० ते १९४४ पर्यंत बाबासाहेबांनी बहिष्कृत वर्गाच्या शैक्षणिक विकासाच्या धोरणासाठी सतत संघर्ष केला. बाबासाहेबांच्या सातत्याने केलेल्या संघर्षामुळे शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण आणि शिष्यवृत्ती मिळण्यात बाबासाहेब यशस्वी झाले.७८ वर्षे जुन्या असलेल्या या दोन्ही शिष्यवृत्ती आत्तापर्यंत सुरू आहेत. मात्र बाबासाहेब तिथे थांबले नाहीत. त्यांनी शैक्षणिक संस्था स्थापन केली. १९४५ मध्ये मुंबईत पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. १९४६ मध्ये प्रथम मुंबईला आणि नंतर १९५० ला औरंगाबादला महाविद्यालय स्थापन केली. आता पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुंबई, औरंगाबाद, पुणे, नांदेड, बिहार, बंगलोर, कोल्हापूर, पंढरपूर व महाड येथे कला, विज्ञान,वाणिज्य, अर्थशास्त्र, कायदा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, कॉम्प्युटर, फिजिकल एज्युकेशन अशा ३१ संस्था व बारा वसतिगृहे आहेत. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमुळे मागील ७७ वर्षात लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले. मासिक शिष्यवृत्ती, पुस्तके, भत्ते व वसतिगृहे ही अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील यशाचे गमक ठरले.
बाबासाहेबांनी त्यांच्या संस्थेसमोर शिक्षणाची विशिष्ट उद्दिष्टे सुद्धा निश्चित केली. त्यांच्या दृष्टिक्षेपात शिक्षणाचे तिहेरी ध्येय: वैज्ञानिक,व्यावसायिक व नैतिक शिक्षण देणे हे होते. वैज्ञानिक शिक्षण हे व्यक्तीची दृष्टी वृद्ध करेल तर व्यवसायिक शिक्षण रोजगार क्षमता वाढवेल आणि नैतिक शिक्षणाला सुद्धा लोकशाही मूल्ये रुजवण्याच्या दृष्टीने समान महत्त्व दिले.
बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाने दिलेल्या शिक्षणामुळे वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली, त्यांची आर्थिक प्रगती झाली व जातीवर आधारित असमान समाजात सामाजिक परिवर्तन आणणारी पिढी निर्माण केली उभी केली, पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या शिक्षणाने मिळवली ही सर्वोच्च व उदात्त राष्ट्रीय कामगिरी आहे.
बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला सक्षम बनवण्याची जबाबदारी आपणा सर्वांचे आहे कारण बाबासाहेबांनी तिला लोकांची संस्था म्हणून उभे केले आहे. Pay back to society.. “समाजाला परतावा” या धोरणाच्या उद्दिष्टासाठी आणि बाबासाहेबांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी आपणास सक्रिय भाग घ्यावा लागेल.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या ७७ वर्षाच्या अमूल्य योगदानाला कोटी कोटी नमन !!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत