जातीय सलोखा राखण्यासाठी हिंदु व मुस्लीम बांधवानी एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत :- सपोनि सोळुंके

नळदुर्ग मधील अवैध धंदे जळकोट मधील ऑनलाईन चक्रीला बंदी घाला : नागरीक
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात हिंदु धर्माचा पाडवा सण व मुस्लीम बांधवांचा एक प्रमुख न
‘सण म्हणजे रमजान ईद या दोन्ही कार्यक्रमाच्या प्रसन्नते साठी सर्व धर्माच्या नागरिकांनी एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या सहकार्याची भूमिका स्पष्ट करत हे दोन्ही सण
मोठ्या उत्साहात व आनंदात साजरे करण्यात यावेत कारण जातीय सलोखा राखण्यासाठी एकमेकाना गळा भेट घेऊन शुभेच्छा देण्यात महत्व आहे आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊन चांगला संदेश नळदुर्ग शहराचा इतराना जावा आसे प्रतिपादन नळदुर्ग ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांनी केले
नळदुर्ग येथे नुकतीच मुस्लीम बांधवांचा रमजान ईद व हिंदु बांधवाचा गुडी पाडवा हे सण एकत्र आलेच्या निमित्ताने नळदुर्ग ठाण्यात शांतता कमेटीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळेस ते बोलत होते .
नळदुर्ग शहरात चालू आसलेल्या अवैध धंदे बंद करून जळकोट गावात चालू आसलेली ऑनलाईन चक्री तात्काळ बंद करण्यात यावी आणि गोर गरीबाचा संसार उद्धवस्त होणारा थांबवावा या मध्ये मटका , जुगार चक्री , रोड रोमियो , मध्यपान आशा विशयाला अनुसरून कारवाई होणे गरजेचे आहे . अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या माध्यमातून नळदुर्ग नगर परिषदेचा भाग आहे त्यांनी तो नगर परिषदेचे मुख्याधिकारी हा प्रश्न हाताळावा आशा अनेक विषयावर चर्चा करण्यात आली .
सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे माजी नगराध्यक्ष शहबाज काझी , माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शफीभाई शेख , जेष्ठ पत्रकार विलास येडगे , पत्रकार उत्तम बनजगोळे , शिवसेनेचे तालुका उप प्रमुख सरदारसिंग ठाकुर , शहर प्रमुख संतोष पुदाले माजी नगरसेवक विनायक अहंकारी जिवीशाचे अमर जाधव
शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके , माजी उपाध्यक्ष मुन्नाभाई शेख , माजी नगर सेवक बसवराज धरणे , पत्रकार आयुब शेख , सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई गायकवाड , सामाजिक कार्यकर्त्या शाहेदाबी सय्यद पत्रकार दादासाहेब बनसोडे पत्रकार लतीफ शेख ,अजित जुनोदी , सलीम भाई शेख , शाह महम्मद , फारुख हाफीज आदीजन या शांतता कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत