डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाटावर पडून पाच प्रवासी किरकोळ जखमी.

आज सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात पाच महिला प्रवासी फलाटावर पडून जखमी झाल्या आहेत. कसाऱ्याहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या अति जलद लोकलमधून उतरताना हा प्रकार घडला आहे. सुरक्षा बळाच्या महिला हवालदारांनी त्यांच्यावर प्राथमिक वैद्यकीय उपचार केले.
कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणारी सकाळची अति जलद लोकलने मुंबईत कामानिमित्त जाण्यासाठी नोकरदारांची धावपळ असते. ही लोकल डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा याच रेल्वे स्थानकांवर थांबते. कसाऱ्याकडून येणारी ही लोकल टिटवाळा, कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत प्रवाशांनी भरलेली असते. डोंबिवली रेल्वे स्थानकातून काही प्रवाशी ही लोकल पकडतात. या लोकलमधून डोंंबिवली स्थानकात उतरताना गाडी थांबण्यापूर्वीच फलाटावर उडी मारावी लागते. अन्यथा चढणारे प्रवासी उतरू देत नाहीत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत