रिपब्लिकन चळवळ पोटार्थी करणाऱ्यांना धडा शिकवा – डॉ. डी.एस. सावंत
विश्वाला दुःख मुक्तीचा मार्ग दाखवणारे तसेच शांतीचा, करुणेचा, कृतिशील संदेश देणारे तथागत बुद्ध… रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,
ज्या दांपत्याने शिक्षणाची गंगा आपल्या दारात आणली असे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले… बहुजनांच्या सामाजिक आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि हे सगळे महापुरुष आम्हाला ज्यांनी खऱ्या अर्थाने समजून सांगितले ते भारतीय घटनेचे शिल्पकार, राष्ट्रनिर्माते, बोधिसत्व प.पू.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार कार्याला मी प्रथम अभिवादन करतो… परिवर्तनाच्या चळवळीतील सर्व महामाता आणि महापुरुषांना मी अभिवादन करतो… आज जो, इथे व्याख्यानाचा विषय आहे, तो तुम्हा आम्हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच “रिपब्लिकन पक्ष” आणि त्या पक्षाच्या वाटचालीबद्दल आणि भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. तीन तारखेला या पक्षाचा वर्धापन दिन सुद्धा आहे त्या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षा च्या वाटचाली बद्दल मंथन व्हावे हा सुद्धा उद्देश आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्ष… विचार पिठावर उपस्थित असलेले मान्यवर बंधू आणि भगिनींनो..
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण मानव मुक्तीच्या लढ्याचा आढावा घेताना असे दिसून येते की, बाबासाहेबांनी समाज उत्कर्षासाठी अनेक अनेक प्रयोग केलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी सामाजिक प्रयोग केले, त्यामध्ये त्यांनी सांस्कृतिक प्रयोग केले, त्यामध्ये त्यांनी आर्थिक प्रयोग केले, शैक्षणिक प्रयोग केले आणि राजकीय सुद्धा अनेक प्रयोग केलेले आहेत. आपण त्यामधील समाज उत्कर्षासाठी निर्माण केलेल्या राजकीय प्रयोगासंदर्भात इथे चर्चा करणार आहोत. तो म्हणजे रिपब्लिकन पक्ष आणि त्याचे भवितव्य..
साधारणपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजकार्याला सुरुवात 1919 पासून झाली त्यावेळेला ते सिडनहम कॉलेज ऑफ कॉमर्स इकॉनॉमिक्स चर्चगेट मुंबई येथे पॉलिटिकल इकॉनॉमीचे प्रोफेसर होते आणि 1919 साली भारतातील राज्यव्यवस्था कशी असावी या संदर्भामध्ये अभ्यास करण्यासाठी साऊथ बरो कमिशन भारतात आले होते आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 28 व्या वर्षी त्यांना निवेदन दिले होते आणि त्या वेळेला अस्पृश्यांच्या सामाजिक आणि राजकीय हक्कांची मागणी केली होती. तिथून साधारणपणे त्यांच्या सामाजिक राजकीय चळवळीचे सुरुवात होते त्यानंतर 1924 झाली त्यांनी बहिष्कृत समाजाच्या हितासाठी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली तसेच 1928 स* समता सैनिक दलाची स्थापना बाबासाहेबांनी केली होती 1930 स* डिप्रेस्ड क्लास नावाची संघटना स्थापन केली 1930 ते 32 ला ते राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये होते त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की सामाजिक संघटन महत्त्वाचे आहे त्याचबरोबर आपण राजकीय संघटने ही तयार केलं पाहिजे आणि म्हणून 15 ऑगस्ट 1936 स* स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा त्याची घटना म्हणजे सामाजिक संघर्षाच्या संदर्भात आपण काय केले पाहिजे याचे एक उत्तम अशा प्रकारचा दस्तऐवज आहे स्वतंत्र मजूर पक्षाने त्यावेळेला एवढे चांगले काम केले की 1937 ला इलेक्शन मध्ये 17 पैकी 14 जागा स्वतंत्र मजूर पक्षाने जिंकल्या होत्या परंतु ज्या वेळेला स्टॅफोर्ड क्रिप्स मिशन भारतात आले आणि बाबासाहेबांना म्हणाले की तुम्ही मजूर पक्षाचे नेते आहात त्यामुळे शेड्युल कास्ट बद्दल तुम्हाला काही मांडणी करता येणार नाही त्या वेळेला बाबासाहेबांच्या लक्षात आलं की आपण शेड्युल कास्ट संघटन तयार केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी 1942 साली शेड्युल कास्ट फेडरेशन ची स्थापना करण्यात आली शेड्युल्ड कास्ट फेडरेशन द्वारे बाबासाहेबांना अनेक महत्त्वाची कामे करता आली काही काळानंतर बाबासाहेबांना धम्मदीक्षा घ्यायची होती त्यामुळे त्यांना एका व्यापक परिघांमध्ये यायचं होतं त्यामुळे शेड्युल कास्ट फेडरेशनच्याही मर्यादा लक्षात आल्या 1952 साली बाबासाहेबांना मुंबईमधून निवडणूक मध्ये सेटबॅक बसला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणुका कशा असाव्यात लोकशाही कशी असावी लोकशाहीची मूल्य कशी असावी याचा वस्तू पाठ घालून देणाऱ्या बाबासाहेबांना हे पराभव पत्करावा लागला काँग्रेसची राक्षसी बहुमत, हुकूमशाही, एकाधिकारकशाही आणि निवडणुकीतील कुर घोडीच्या राजकारणामुळे पुढे 1954 साली भंडारा मतदार संघातून शेखाफे आणि समाजवादी पक्षाची युती असतानाही बाबासाहेबांच्या पुढे अवकात नसलेल्या सुमार दर्जाच्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे बाबासाहेबांनी ठरवले की, लोकशाही जर वाचवायची असेल, तर ती अधिक लोकाभिमुख केली पाहिजे. संविधानाला अभिप्रेत समाजाची रचना करावी लागेल. अन्यथा लोकशाही शिल्लक राहणार नाही. आणि त्यासाठी एक सक्षम विरोधी पक्ष असावा अशी भूमिका घेतली. त्यानुसार त्यांनी राम मनोहर लोहिया, एस एम जोशी, प्र के अत्रे अशा विविध क्षेत्रातील लोकांशी पत्रव्यवहार केला आणि त्यानुसार त्यांनी भारतीय जनतेसाठी एक खुले पत्र लिहिले. अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन यांच्या रिपब्लिकन पक्षाने मोठ्या ध्येयनिश्टेने निग्रोंची गुलामी नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. रिपब्लिकन म्हणजे प्रजासत्ताक, प्रजाची सत्ता असणारा पक्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता. परंतु आपल्या सगळ्यांचा दुर्दैव बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण सहा डिसेंबर 1956 ला झाले पुढे
3 ऑक्टोबर 1957 ला नागपूरला जे शेकाफेचे अधिवेशन भरले होते त्यामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी शेकापे बरखास्त केली अशी घोषणा करून, आरपीआयची स्थापना होत आहे अशी घोषणा केली. त्यामध्ये एन शिवराज्जना अध्यक्ष बनवण्यात आले.
बीसी कांबळे यांना त्याची घटना बनवण्यासाठी सांगितले. परंतु बीसीने घटना बनवली नाही. 14 मे 1959 रोजी बीसी कांबळे यांनी पक्षाचे अधिवेशन बोलवून दुरुस्त नावाचा गट स्थापन केला. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया कांबळे गट त्यानंतर 1962 साली
आर डी भंडारे निवडणुकीला उभे होते ते पडले दादासाहेबांबरोबर मतभेद झाले आणि त्यामुळे 1964 साली त्यांनी भंडारे गट स्थापन केला 1967 ला दादासाहेबांनी काँग्रेसची युती सर्वश्रुत आहे आणि त्यानंतर 1968 ला गवईंचे प्राबल्य वाढले.
रिपब्लिकन पक्ष फुटण्यामागे नेतृत्वाची प्रचंड लालसा, प्रचंड स्वार्थ, बेशिस्तपणा आणि दिशा देणाऱ्या नेतृत्वाचा अभाव तसेच नेत्यातील कलह कारणीभूत ठरतात..
आता तर जवळजवळ 60 ते 70 गट झालेले आहेत त्यामध्ये सगळे अ ब क ड अशी बाराखडी पूर्ण झालेली आहे. या अ ब कडणे ही चळवळ बहिष्कृत हितकारणी सभेच्याही पाठीमागे नेऊन ठेवलेली आहे की काय अशी शंका यावी. त्याचं कारण असं की, ज्या उद्देशाने बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. त्या खुल्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी अनेक मुद्दे चर्चिले आहेत त्या पत्रानुसार रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली नाही त्या खुल्या पत्रामध्ये त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे
1.चळवळीला ….राजकीय पक्षाचे स्वरूप कसे प्राप्त होते ? याबाबत विवेचन केलेलं आहे.
- संसदीय लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक गोष्टी… त्यामध्ये त्यांनी समाज व्यवस्थेत विषमता नसणे, विरोधी पक्षाचे अस्तित्व असणे, राज्यकारभार करताना पाळावयाची समता, संविधानिक नीतिमत्तेचे पालन, लोकशाहीच्या नावाने बहुमतवाल्यांकडून अल्पमताची केलेली गळ्चेपी, नीतिमान समाज व्यवस्थेची गरज, विचारी विवेक लोकांचे लोकमत आवश्यक आहे…
त्यानंतर त्यांनी पक्ष म्हणजे काय? पक्ष सैन्यासारखा असतो, पुढारी सेनापती सारखा असतो, संघटनेसाठी सभासद मूलभूत योजना आणि शिस्तीची आवश्यकता असते. पक्षाला ध्येय धोरणाची तत्त्वज्ञानाची गरज असते. कार्यक्रम हवा असतो. राजकीय डावपेच व मुसदीगिरी हवे असते. त्याच्या तत्त्वज्ञानाचे आणि ध्येयधोरणाचा प्रचार आणि प्रसार करावा लागतो. विचारसरणीचा प्रचार प्रसार, वृत्तपत्रे सभा संमेलने, व्याख्याने ,वांग्मय, लेखन इत्यादी मार्गाने केला पाहिजे आणि संयुक्त राजकीय चळवळीसाठी आणि कृतीसाठी निवडणुका लढवणे गरजेचे आहे. भारताच्या संविधानाचे प्रियबल हेच रिपब्लिकन पक्षाच् ध्येय आणि उद्दिष्टे आहेत..
त्यामध्ये त्यांनी स्वतंत्रता, समता, बंधुता न न्याय ही तत्वे साधली पाहिजे.. सर्व भारतीयांना समान न्याय मिळाला पाहिजे.. समता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे..व्यक्तीचे सुख हा केंद्रबिंदू असला पाहिजे.. समान संधी मिळाली पाहिजे, राज्याने देश बांधवांच्या आर्थिक सामाजिक राजकीय हक्काचे संरक्षण केले पाहिजे.. ते होत नसेल तर आमचा पक्ष राजाला तसे करावे करायला लागेल.. समान संधी पक्ष मान्य करेल भयमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे अशी पक्षाची भूमिका आहे आणि त्यासाठी पार्लमेंटरी सिस्टम ऑफ डेमोक्रसी ही सर्वोत्तम आहे अशी मांडणी बाबासाहेबांनी खुलापात्रात केली होती..
त्यासाठी खुले पत्र लिहिले त्यावर मात्र तशी रिपब्लिकन पक्षाची उभारणी झाली नाही शेड्युल कास्ट मधल्या 59 जातील ना सुद्धा आम्ही एकत्र करू शकलो नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्ष हा स्थापन झाला का? हा खरा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी की 59 जातींना सुद्धा आम्ही एकत्र करून न शकल्यामुळे तो शेड्युल्ड कास्ट फेडरेशन सुद्धा झाला नाही. त्याच्याही मागे आमच्या नेत्यांना स्वतंत्र मजूर पक्ष सुद्धा बनवता आलेला नाही. त्यामध्येही 18 पगड जातील चा समावेश झाला असता. पण तिथूनही आम्हाला पाठीमागे जावे लागते आहे. त्यामध्ये बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या सामाजिक संघटना तिथेही आम्ही एक नाहीत. असेच म्हणजे आम्ही चळवळ पुढे नेली की पाठीमागे नेली? हा खरा प्रश्न आहे? आणि वरून बाबासाहेबांचे नेहमी कोटेशन वापरायचे की चळवळीचा हा रथ मी इथपर्यंत आणलेला आहे तो पुढे घेऊन जाता येत नसेल तर त्याला मागे तरी जाऊ देऊ नका… आम्ही बाबासाहेबांच्या ऐकले का हा खरा प्रश्न आहे? आजचा रिपब्लिकन पक्ष मागे आहे का पुढे आहे हे मी सांगण्याची गरज आहे का? हे आजचे विदारक चित्र आहे याला कोण जबाबदार आहे? हे आपण सुज्ञान नागरिक ठरवालच. .
पक्ष हा समूहाच्या उत्कर्षाचा विचार असतो तो संस्थात्मक असतो
तर गट हा स्वतःच्या उत्कर्षाचाच विचार करतो
आज समाजामध्ये प्रस्थापित पक्षाने प्लांट केलेले काही नेते आपणाला दिसत आहेत, ते नेते म्हणजे त्या प्रस्थापित पक्षांची गरज बनलेली आहे. त्यामुळे आंबेडकरी वैचारिकतेचा निकष या नेत्यांना लावता येणार नाही व त्याची गरज ही नाही.
त्यामुळे निष्कर्ष नंबर
1.बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला नाही. - जो रिपब्लिक पक्ष स्थापन झाला तो एक संघ ठेवता आला नाही त्याचे अनेक शकले केली गेली.
- रिपब्लिकन चळवळ पोटार्थी केली ती करणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची गरज आहे
- एक तर नेत्यांनी समाजाला कार्यक्रम दिला पाहिजे किंवा समाजाने नेत्याला कार्यक्रम दिला पाहिजे आणि वर्षातून एकदा त्याच ऑडिट झाल पाहिजे
- शेड्युल कास्ट मधल्या 59 जातींना एकत्र आणले पाहिजे तसेच एसटी आणि ओबीसींना आणि मायनॉरिटीज ना सुद्धा एकत्र आणण्याचे काम झाले पाहिजे त्यामध्ये पदाधिकारी नेमताना सुद्धा 15 एस सी चे आठ एसटीचे आणि किमान ते 25 ओबीसीचे जे धर्मनिरपेक्ष संविधानाला मानतात असे आणि त्याचबरोबर दहा टक्के मायनॉरिटीज आणि दहा टक्के महिला अशी नेतृत्वाची विभागणी झाली पाहिजे
- तसेच राजकीय स्टेजवर धम्म आणावाकी न आणावा याचा पण विचार केला पाहिजे
- काहींचे म्हणणे असे आहे की बौद्धांचे संघटन बांधावे आणि एक संघपणे राहुन बॅलन्सग पावर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तेव्हा आपला वाटा आपणाला योग्य प्रकारे मिळेल
- या फाटा फुटी ला याला नेते जेवढे जबाबदार आहेत तेवढेच इथले प्रस्थापित पक्षही जबाबदार आहेत असे म्हणणे वावगे ठरवू नये.
भारतातील सर्व राजकीय पक्षांची आर्थिक धोरणे एकच आहेत
बाबासाहेबांनी निर्माण केलेली पोलादी संघटना चळवळ सर्वार्थाने थंडावली आहे सरकारांनी खाजगीकरणाचा सरकारने सपाटा लावला आहे त्याचा देश पातळीवर विरोध होत नाही त्याचबरोबर जे काही रिझर्वेशन आहे तेही पूर्ण भरलेले नसताना त्यामध्ये पण उपवर्गीकरण क्रिमी लेयर आरक्षणाचा लाभ एका व्यक्तीला एकदाच मिळेल अशा प्रकारच्या वल्गना केल्या जात आहेत आणि म्हणून आज रात्र आणि दिवस वैऱ्याचा आहे असं समजून आंबेडकरी जनतेने या धोरणांचा विरोध केला पाहिजे तसेच आपले प्रतिनिधी विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पाठवले पाहिजेत त्यासाठी फक्त इलेक्शनच्या वेळेला उभा राहून काम होणार नाही तर जे काही मतदारसंघ आहेत मी माझ्या एका लेखांमध्ये आम्हीही राजकीय इतिहास घडवू शकतो त्या लेखांमध्ये 70 ते 80 मतदार संघ महाराष्ट्रामध्ये असे दाखवलेत की त्यामध्ये बौद्धांची निर्विवाद संख्या आहे आणि तिथं फटाफुटीचे राजकारण झाले नाही तर आपला कॅंडिडेट सहज निवडून येऊ शकतो अशा मतदारसंघाची बांधणी आपणाला करावी लागेल..
लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म ध्येय ठेवावे लागतील..
पुढे पाच वर्ष मतदार संघात सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक राजकीय सगळी काम करावे लागतील आरोग्य विषयी काम करावे लागतील रस्ते रोड सेनिटेशन वॉटर सप्लाय इलेक्ट्रिसिटी या सगळ्या गोष्टींवरती सतर्क राहून काम करावे लागेल अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज बुलंद करावा लागेल आता आपण प्रतिक्रियावादी न राहता अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर आपले मत नोंदवून चुकीच्या गोष्टीला विरोध केला पाहिजे जसे की कॉलेजएम सिस्टम ती नष्ट झाली पाहिजे आणि त्या जागी जुडीशियल अपॉइंटमेंट कमिशन सारख्या संस्था तयार करून त्याद्वारे जजेसची रिक्रुटमेंट झाली पाहिजे कारण ब्राह्मनामध्ये न्यायिक चरित्र नाही हे इंग्रजांनीच सांगितलेला आहे तरीही जुडीशरी पूर्ण त्यांच्या हातामध्ये आहे.
सर्व राजकीय समीकरणांचा योग्य अभ्यास करून मतदार संघ निवडून त्या मतदार संघामध्ये किमान पाच वर्ष तरी काम केले तरच त्या मतदारसंघांमध्ये आपल्याला यश मिळू शकतं तसेच प्रत्येक मतदारसंघांमध्ये आताही फटाफुटीचं राजकारणाला आपण पूर्णविराम देऊया आता आपण भाऊ भाऊ भांडण्यापेक्षा लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत राज्यसभा विधान परिषद अशा सर्व गोष्टी आपण आता वाटून घेतल्या पाहिजेत आर्थिक बाबतीत ही आपण दूध संघ को-ऑपरेटिव्ह सोसायटी या सूतगिरण्या सहकारी शेती याच्यावर भर द्यायला पाहिजे विविध अंगाने आपण काम केलं पाहिजे शैक्षणिक गोष्टीकडे आपण खूप दुर्लक्ष करू लागलो आहोत त्यामुळे आपल्याला मागचे दिवस पुढे येण्यासाठी वेळ लागणार नाही त्यासाठी निष्ठेने काम करावे लागेल आणि काम केले तरच भावी पिढी सुरक्षित राहील यामध्ये जो फुटेल त्याला बाबासाहेबांनी जसं सांगितलं होतं की आम्ही त्यांना बहिष्कृत करू तसे आदेश द्यावे लागतील
यापुढे आपला नेता एकच तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच त्यांनी दिलेले खुले पत्र
एवढे करूनही जर इप्सित साध्य होत नसेल तर - निवडणूक पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल झाले पाहिजेत लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे मग निवडण्याची पद्धत कोणतीही असो त्यामुळे आपल्याला ते प्रतिनिधी मिळू शकतात म्हणजेच प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन असेंबली आणि पार्लमेंट मध्ये मिळाले पाहिजे यासाठी लढा उभारायला पाहिजे तरच आपण या जीवन मरणाच्या लढा मध्ये यशस्वी होतो अन्यथा येणारा
भावी पिढीसाठी अत्यंत कष्टमय आणि दुखत होईल त्यामध्ये दुमत नाही
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत