देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

संघ-भाजपच्या राजकीय खेळीत दोन नवे पत्ते …!

▪राजकारण जिंकण्यासाठी असते. सरळ लढतीत जिंकणे अवघड बनते. तेव्हा छुप्या चाली चालल्या जातात. त्यात चर्चित वोट कटाऊ चाल. या चाली भाजपच्या अंगवळणी पडल्या. त्या सत्ताबळ आणि धनबळाच्या जोरावर फोफावल्या. निवडणुकीच्या दोन टप्यात किमान चार चाली नक्की असतात. जम्मू काश्मीर निवडणुकीत कॉंग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सची हवा दिसली. त्याबरोबर टेरर फंडच्या आरोपाखाली कारागृहात असलेले इजिनिअर रसीद यांना जामीन मिळाला. स्वत:च्या प्रचारासाठी बाहेर सोडले नव्हते. आता उमेदवारांच्या प्रचारासाठी मोकळे सोडले. त्यांच्या अवामी इत्तेहाद पार्टीने प्रतिबंधित जमाते इस्लामिक पार्टीसोबत आघाडी केली.आतापर्यंत जमाते ए इस्लाम पार्टी निवडणुकांवर बहिस्कार टाकित आली.याशिवाय गुलाम नबी आजाद यांचा डीपीएपी, पिपल कान्फरन्स, पॅथर पार्टी सुध्दा मैदानात आहे. कॉंग्रेस आघाडीचा खेळ बिघडविण्यास त्यांना रसद पुरविली जाते. पहिली चाल निवडणूक पूर्व असते. त्यात माणसं व पक्ष तोडफोडीचे राजकारण चालते.त्या अंतर्गत भाजपने विविध राज्यात अनेक पक्ष फोडलेत. राजकीय घराणी फोडली. बहुचर्चित हरियाणातील चौटाला आणि महाराष्ट्रात पवार घराणे फोडले. उध्दव ठाकरेंचा पक्ष फोडला. राकॉ आणि शिवसेनेत असली, नकलीचा वाद उभा केला. यास लोक विटले.

दुसरी चाल निवडणुकीत वोट कटाऊ उमेदवार देणे. ते लहानमोठ्या पक्षांतील असतील किंवा अपक्ष असतील. त्यांना रसद पुरविणे. त्यांच्या मार्फत न मिळणारी मते प्रतिस्पर्धी उमेदवाराला जाणार नाहीत अशी तजवीज करणे. ही चाल जम्मू-काश्मीर आणि हरियाणात केली. त्या प्रकारांचा भंडाफोड झाला. छुपी गोष्ठ बहुचर्चित झाली. हरियाणात गोपाल कांडा हे प्रभावी राजकारणी. त्यांनी भाजप, कॉग्रेस विरोधात अपक्ष लढण्याची घोषणा केली. दिल्लीतून त्यांच्याकडे युती करण्याचा प्रस्ताव गेला. ते 11 सप्टेंबरला तातडीने दिल्लीला गेले. भाजपच्या चाणक्यांना भेटले. तेव्हा त्यांना सांगण्यात आले. भाजपसोबत युती नाही. तुम्ही हरियाणाला परत जा. अभय चौटला यांचा पक्ष इंडियन नॅशनल लोकदल आणि बसपासोबत युती करा. कांडा 12 सप्टेंबरला अभय चौटाला यांना भेटतात. दोघांच्या दोन दिवस गाठीभेटी चालतात. तिघांच्या युतीची घोषणा होते. गोपाल कांडा एका चॅनेलला मुलाखत देतात. हरियाणात आमच्या मदतीने भाजप सत्तेत येणार. सत्तेची चॉबी आमच्या हातात राहणार. इनोलो, बसपा युतीचे गोपाल कांडा विरूध्द कॉंग्रेस उमेदवार अशा लढतीचे चित्र निर्माण होते. लगेच भाजप आपला उमेदवार वापस घेते. भाजप गोपाल कांडा यांना समर्थन जाहीर करते. या समर्थनाने कांडा युतीच्या अडचणीत भर पडते. आता गोपाल कांडा खूलासे करीत फिरत आहेत. भाजपला समर्थन मागितले नाही. त्यांचे समर्थन नको आहे. ही युती जेजेपीची पोकळी भरून काढणार. कॉंग्रेसच्या काही जागा पाडणार असे वाटत होते. छुपी दोस्ती उघड झाल्याने लढतींचे रंग बदलले. महाराष्ट्रातील गोपाल कांडा आ.बच्चू कडू आहेत. त्यांनी घेतलेला महाशक्ती हा शब्द कोणी दिला असेल. ते लवकरच कळेल.

2019 च्या निवडणुकीत हरियाणात चौटाला घराण्यात फुट पडली. दुष्यंत चौटाला यांनी काका अभय चौटाला विरूध्द दंड थोपाटले. तेव्हा दुष्यंत यांनी भाजपला यमूना पार हटवूची घोषणा केली होती. या जोरावर जेजेपीला दहा जागा मिळाल्या. काका अभय चौटाला यांच्या पक्षाचा दारूण पराभव झाला. दुष्यंत चौटाला यांच्या मदतीने भाजप सत्तेत आली. साडे चार वर्ष सत्ता भोगली. दुष्यंत यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषविले. निवडणुका जवळ येताच पाठिंबा काढाला. आता जेजेपी विरोधात रोष आहे. ती पोकळी भरून काढण्याची संधी इनोलोकडे होती. गोपाल कांडामुळे हे भिंग फुटले. उत्तर प्रदेशातून चंद्रशेखर रावण निवडून आले. बसपाला खाते उघडता आले नाही. त्या राज्यातून ते खासदार बनले. ते जेजेपीच्या जाळ्यात अडकले. त्यांची किंमत मोजावी लागेल. हे घडविणारे छुपे कोण आहेत. हरियाणात जाट आणि दलितांचे पक्ष तीन आघाड्यात विभागलेत. ते बळी पडतात की टाकणाऱ्यांचे फासे उलटे पडतात. ते निकालाअंती दिसेल. आपचे अरविंद केजरीवाल यांची कॉग्रेससोबत आघाडी न होणे. तेव्हाच जमानत मिळणे. या घटना बऱ्याच बोलक्या आहेत.

डंकी आणि गडकरी

हरियाणात किसान,जवान, पहेलवान व बेरोजगारी प्रश्ना भोवती निवडणूक फिरत आहे. नोकरीच्या शोधात चोरमार्गे 15 लाखावर तरूण विदेशात गेलेत. त्यांचा भावनिक प्रश्न असलेला डंकी व्हिडिओ राहुल गांधी यांनी आणला. तो डोळ्यात आसवं आणणारा ठरला.संघाचे भाजपवर नियंत्रण आहे. त्या संघाने देखील नवी खेळी चालली. मोदी मोहरा चालत नाही. हे दिसताच त्यांच्या दौऱ्यांना कात्री लावली. मदतीला आणखी दोन पत्ते टाकले.त्यात ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी आणि संजय जोशी आहेत. मोदी-शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात त्यांना गैरहजर ठेवले. गडकरींना जम्मू काश्मीर, हरियाणात पाठविले. झारखंड व महाराष्ट्रात फिरविणार.तर जोशी यांना मध्यप्रदेशात बसविले. हे दोन पत्ते आणि कांडा व कडू या चार पत्त्यांच्या चालीला काय नाव देणार…! शिवाय काश्मीरात रसीद-नबी आहेत. तर मनसेच्या माध्यमातून उबाठाच्या मतांना गळती लावण्याचा प्रयत्न आहेत.

तिसरी चाल निकाल लागताच पळवापळवी. या तिन्ही चाली चालून देखील यश मिळाले नाहीतर. अंतिम चाल लोटस ऑपरेशन असते. लोक काय म्हणतील. लोकांना काय वाटेल. याकडे पुर्णत: कानाडोळा. ऐनकेन प्रकारे सत्ता हवी. या खेळी जम्मू-काश्मीर, हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रात सुध्दा खेळल्या जात आहेत. त्याची रंगित तालिम सुरू झाली. पडद्याआड एक-दोन पक्षांच्या आघाड्यांचा खेळ सुरू झाला. ज्या आघाड्यांचा फारसा प्रभाव नाही. चार टक्के मते पदरात पाडू शकत नाहीत.ते पक्ष किंगमेकर बनू. सत्तेची चॉबी आपल्या हातात असेल.असे फुसके दावे करतात. त्या माध्यमातून समर्थकांमध्ये किंवा समाजामध्ये उर्जा भरून मते खातात. काही मतदार संघात एकाद्या पक्षाचा चार-दोन हजाराने फरक पडला. तर त्यात धन्यता मानणारे आहेत. आपल्या विध्वसंकतेचे भांडवल करीत असतात. हे राजकारणातील छुटपुट लढाईचे खेळ आता लोकांना कळू लागले. लोकसभेत लोकांनी दाखवून दिले. तरी एक-दोन टक्के भाबडी जनता त्यांच्या आहारी जाते. लोक जसजसे शिकू लागले.तसे राजकारणाचे खेळ ओळखू लागले. राजकारणाऱ्यांचे असलीनकली चेहरे बघू लागले. वोट कटाऊ नेत्यांचे चेहरे कालवडले. तरी हा धंदा थांबत नाही. विधानसभा क्षेत्र लहान असते. त्यामुळे हा धंदा आणखी वाढेल.
▪▪▪▪▪▪▪BG▪▪▪▪▪▪▪

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!