12 जानेवारी जिजाऊ माँसाहेबांचा जन्मदिन

आज 12 जानेवारी जिजाऊ माँसाहेबांचा जन्मदिन मां जिजाऊचा जन्म 12 जानेवारी 1598 साली भुईकोट राजवाड्यांमधे झाला. जिजाऊ माता अगदी स्वतंत्र विचाराच्या होत्या त्यांना आपल्या देशाबद्दल आणि धर्माबद्दल नेहमीच प्रेम वाटायचं महणुंनच त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या वीर छत्रपती शिवाजी महाराजांना देखील त्यांनी लहानपणापासूनच देशप्रेम, धर्मप्रेम एकनिष्ठेचे धडे दिले जिजाऊमाता यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शन आणि शिक्षणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. मराठा साम्राज्य स्थापन करण्यामध्ये जिजाऊ आईच खुप मोठं श्रेय आहे . त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी त्यांचं प्रत्येक पाऊल उचललं आई जिजाऊ यांची विर माता अशी ओडख आहे.त्या फक्त एक स्त्री नव्हत्या तर त्या एक शुर आई, एक धाडसी पत्नी आणि एक योद्धा देखील होत्या.गरीब रयतेच्या सुखासाठी स्वंतत्र स्वराज्य बनवावे ही राजमाता जिजाऊची इच्छा होती.ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाहीतर ते सत्यात देखील उतरविले त्या म्हणजे आपल्या आईसाहेब जिजाऊ???? अशी हिंदवी स्वराज्याची संस्थापक तेजस्वी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त मानाचा मुजरा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत