आणि तीला मुलगा मिळाला- दत्ता गायकवाड सोलापूर
दत्ता गायकवाड, सोलापूर.
स्वतंत्र मजूर पक्षाचे सोलापूरातून निवडले गेलेले आमदार जिवप्पा सुभाना ऐदाळे हे बाबासाहेबांचे एकनिष्ट अनुयायी होते. दिर्घकाळ आमदारकी भोगूनही त्यांनी स्वतःसाठी किंवा कुटुंबीयांसाठी कुठलीही स्थावर किंवा जंगम प्रॉपटी जमवीली नाही. आयुष्यभर ते आणि त्यांचे कुटुंब किरायाच्या (भाड्याच्या) घरात रहात होते.
त्यांची भावजय बंगारेवाबाई निळकंठ एदाळे या जुन्या जमान्यातील शिक्षिका होत्या. १९२५ साली त्या पुण्यातून ट्रेंड शिक्षिका म्हणून रूजु झाल्या. सोलापूरातील अस्पृश्य मुलींना घरोघरी जाऊन त्यांनी विद्यार्थी घडविले. त्यांना एकच मुलगी होती, तिचे नाव गंगुबाई होते ती ही पुढे शिक्षिका झाली. त्यांना दुसरे मुल नव्हते. पती अकालीच निधन पावल्यामुळे त्या पूर्ण निराधार झाल्या होत्या. आमदार जिवप्पा सुभाना ऐदाळे यांचेही देहात्वासन झाले जिवाप्पा ऐदाळे यांना दोन मुले होती विश्वनाथ ऐदाळे विठाबाई, विश्वनाथ ऐदाळे यांना तिन मुले दोन मुली झाल्या.मुलगी विठाबाईचाही वंशवेल पुढे वाढला.
परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर निष्ठा ठेवून ज्या कार्यकर्त्यांनी समाजासाठी आपलं आयुष्य सर्पित केलं त्या निष्ठावान कार्यकर्त्यांची किंवा त्यांच्या कुटुंबियांची समाजात दखल घेतली नाही. असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.
जिवप्पा सुभाना ऐदाळे यांच्या भावजयी बंगारव्वाचे वृध्दापकाळाने निधन झाले. आणि गंगूबाई ह्या एकट्या पडल्या. आईचा मृत्यु झाला त्या वेळेस त्यांना सहकार्य करावयास कोणी नव्हते. बंगारव्वाच्या निष्प्राण देहास कवटाळून त्या ओक्साबोक्सी रडत होत्या. त्यांच सांत्वन करण्यास त्या वेळी कुणीही नव्हते. त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी त्यांच्या घरी पोहचले.
गंगूबाईच आकाश पोरके झाले. त्यांना पुढील आयुष्य एकटेपणाने जगावयाचे होते. सारं आयुष्यापुढे अंधार होता.कुणाचा तरी आधार मिळेल या विचाराने धम्म कार्यात झोकून दिले, तसेच त्यांनी बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कांबळे गटाच्या त्या महिला जिल्हाध्यक्ष होत्या. अनेकांची कामे केली. अनेकांना आधार दिला. निराधार मुलांना दत्तक घेतले. पण तेथील वातावरणात त्यांना समाधान मिळाले नाही. आंबेडकरी चळवळीतील सोलापूरचे आरंभीचे जेष्ठ नेते आमदार जिवप्पा सुभाना ऐदाळे यांच्या पुतणीला सोलापूरात कुणाचाही आधार मिळाला नाही.
त्यानंतर काही वर्षांनी त्यांना एक आशेचा किरण दिसला. रेल्वेच्या बँकेत डी. एस. सावंत नावाचे मॅनेजर आल्याचे त्यांना समजले. त्यांचा पत्ता शोधीत सावंत साहेबांच्या घरी त्या पोहचल्या. दार ठोठावताच एक उंचापूरा तरूणाने हसतमुखाने त्यांनी दार उघडले आणि माझी आस्थेवाईकपणे चौकशी केली. माझा जीवन प्रवास ऐकून सावंत साहेबांना माझी जीवन कहाणी ऐकून ते अस्वस्थ झाले. आईच्या मागोमाग माझेही डोळे भगवंताने बंद केले असते तर माझी वणवण थांबली असती. त्यांनी अश्रृंनी आपले डोळे पुसले.
पुढे सावंतांकडे येणे जाणे वाढले. कधी कधी डीआरएम ऑफिस मधील सावंतांच्या कार्यालयात ही येत असत. येण्या-जाण्यामुळे आणि बोलण्यामुळे ऋणानुबंध अधिकच घट्ट झाले. सोलापुरमध्येच असताना, हा मुलगा तरी सुसंस्कारी दिसतोय परंतु यांच्या गावी जाऊन आई-वडील कसे आहेत, ते काय करतात आणि एकूणच त्यांची स्थिती कशी आहे. हे पाहण्यासाठी सावंतांना न सांगताच आटपाडी ला पोहोचल्या.
त्यांचा शोध घेत त्या आटपाडी या प्रसिध्द लेखक शंकरराव खरात यांच्या गावी पोहचल्या. तिथे त्यांनी सावंत साहेबांची चौकशी केली. पण इथे कुणी सावंत राहत नाही असे आटपाडीकरांनी गंगूबाईंना सांगितले. शेवटी निराश होऊन सोलापूरची एसटी पकडावी म्हणून त्या एसटी स्टँड जवळ आल्या. तिथे काही मुले सायकलीवरून फिरत होती. एक सुभाष नावाचा चुणचुनीत मुलगा त्यांना दिसला. त्याला विचारले की डी. एस. सावंत यांना तुम्ही ओळखता का तो म्हणाला हो तो माझा वर्गमित्रच आहे आणि तो इथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कौठुळी या गावांमध्ये राहतो तुम्हाला यायचं असेल तर चला मी सायकलीवर बसा तुम्हाला सोडतो म्हणून त्यांना सायकलीवर घेऊन कौठुळीला आले.
आयुष्याच्या संध्याकाळी जगण्यासाठी गंगूबाईंची केविलवाणी धडपड आणि त्यासाठी
सावंताना भेटण्याची ओढ घेऊन कौठुळी गावात सावंताचे घर शोधीत त्यांच्या घरी पोहचल्या.
त्यांच्या आई वडीलाने ममत्वाने त्यांची चौकशी केली. सोलापूरात उपहासाने, तुच्छतेनेवागणारे शेजारी, सगेसोयरे आणि इथे मायेने आनंदाने स्वागत करणारे सावंताचे आई वडील व या संस्कारामुळे सावंतामध्ये करूणेचा, स्नेहांचा प्रभाव पडलेला आहे.
ज्ञान संपादून बँकेचे प्रबंधक या पदापर्यंत पोहचणारे सावंतानी शिल संवर्धन जपले आहे. बाबासाहेबांनी उच्च पदावर आरूढ झालेल्या लोकांना समाजाप्रती तुमची आस्था असली पाहिजे. आपल्या प्राप्तीचा वीसावा हिस्सा तुम्ही समाजासाठी दिला पाहिजे. बाबासाहेबांच्या या विचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.सावंत हे त्याला अपवाद आहेत. सुरुवातीला गंगुबाई ला थोडेसे अवघडल्यासारखे वाटत होते. पण परत तिला सावंतची आणि सावंतला तिची अशी सवय झाली की, ते एकमेकायचे आई आणि मुलगाच बनले “आणि गंगुबाईला मुलगा मिळाला” गंगूबाईचा त्यांनी आई म्हणून स्विकार केला. त्यांना मुंबईतील आपल्या घरी नेले. सावंताची पत्नी डॉक्टर आहे, तिच्या दवाखान्याचे उद्घाटन गंगूबाईच्या शुभहस्ते पार पडले. गंगूबाईच्या आयुष्यातील हा परमोच्च आनंदाचा क्षण होता. माणसामधील मांगल्याचा अनुभव मुलाच्या रूपाने सावंतानी त्यांना दिला. काही वर्षांतच गंगुबाई यांचं निधन होईल असे वाटत असताना सावंतानी त्यांना आईच्या मायेने सांभाळले पुढे ती दहा वर्ष जगली. मी दत्ता गायकवाड या वरील सर्व घटनेचा साक्षीदार आहे. काळाच्या ओघांमध्ये गंगुबाई चे कार्यकर्तृत्व विस्मृतीत जात असताना तिच्या कार्यकर्तुत्वाला दिलेला हा उजाळा…. आणि तिच्या स्मृतीला विनम्र अभिवादन….. आणि मानाचा जय भीम!!!!
दत्ता गायकवाड, सोलापूर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत