महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

दलित महासंघ कार्यकर्ते आणि भटजी मध्ये बाचाबाची हिंदू राष्ट्र विषयक मंगलाष्टका वरून वाद

प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे

सांगली – दिनांक 14/06/ 2024

  सांगली - इस्लामपूर रोड वरील टोल नाक्याजवळील फल्ले मंगल कार्यालयामध्ये शुक्रवार, दिनांक 14/ 6 /2024 रोजी एका विवाहप्रसंगी अनंत लक्ष्मण कुलकर्णी (कवठेपिरान) येथील भटजीने एक नवीनच मंगलाष्टका म्हटली. ज्या मंगलाष्टका मध्ये "हिंदू राष्ट्र निर्मितीचा" उल्लेख केला होता. त्यावरून दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी सदर भटजीला जाब विचारला. यावेळी कुलकर्णी भटाला  स्पष्टीकरण देताना कापरे भरले होते. शेवटी वरमालकाकडून दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर कार्यकर्ते गप्प बसले. 
   महापुरे - मोरे कुटुंबीयांच्या या लग्न समारंभामध्ये अनंत लक्ष्मण कुलकर्णी या भटजीने ..

“मी हिंदू , मम हिंदू राष्ट्र अवघे, राष्ट्रात हिंदू पण,
त्यासाठी जगणे, तयास्तव जिणे,
त्यासाठी हे जीवन, ते हे नित्य करा, नियोजित करा,
उभा चेतना अंतरी, तेणे होईल हिंदुराष्ट्र अवघे, ऐसी प्रतिज्ञा करी….
बोला शुभमंगल सावधान..”
अशा प्रकारची वादग्रस्त मंगलाष्टका या भटजीने म्हटल्यानंतर दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी त्याला जाब विचारला की, “अशा प्रकारची मंगलाष्टका कुठल्याही लग्न समारंभात म्हटली जात नाही, हे आपण कशासाठी करत आहात? कोणाचा आणि कोणता अजेंडा तुम्ही अशा पद्धतीने राबवत आहात ?” अशाप्रकारे विचारणा करून त्या भटजीला दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी धारेवर धरले.
एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे संविधान कपाळाला लावतात, संविधानापुढे नतमस्तक होतात आणि इकडे गाव भटजी मात्र मंगलाष्टकाच्या निमित्ताने “हिंदू राष्ट्राची” संकल्पना धर्म भोळ्या आणि अज्ञानी अशा दलित, बहुजन समाजाच्या सांस्कृतिक समारंभामध्ये रुजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही गोष्ट निश्चितच संविधान विरोधी आहे आणि जातीय व धार्मिक तेढ वाढवणारी आहे. म्हणूनच दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित भटजीला याचा जाब विचारला. तो वाद इतका वाढला की, वरपक्षाकडील लोकांनी मध्यस्थी करून तो वाद संपवला.
असे असले तरी, दलित बहुजन समाजातील जागरूक कार्यकर्त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक अण्णा भाऊ साठे, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे.. अशा अनेकांनी हिंदू धर्मातील या भटसंस्थेबद्दल सातत्याने लिहिले आहे.
“भटाला दिली ओसरी, तो हातपाय पसरी” अशा पद्धतीची एक म्हण ही ग्रामीण भागामध्ये आजही बोलली जाते. गेल्या दहा वर्षांमध्ये फुले,शाहू, आंबेडकर यांनी बनविलेल्या पुरोगामी महाराष्ट्राला अत्यंत शांतपणे एका वेगळ्या वळणावर नेण्याचे कटकारस्थान काही मंडळी करीत आहेत. यापासून बहुजन समाजाने सावध राहावे आणि अशा प्रकारे धर्मांध विचारांच्या लोकांचा अजेंडा राबविणार्‍या भटजीपासून सावध राहावे.
गेल्या दहा वर्षांमध्ये या भटजी लोकांचा व्यवसाय इतका तेजीत आहे की, अक्षरशः महिन्याला कमीत कमी 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत हे भटजी पैसे कमवत आहेत. ज्या श्रद्धेतून भटजींना बोलवलं जातं, त्या श्रद्धेला सुरुंग लावून हे भटजी एक विशिष्ट अजेंडा खेड्यापाड्यामध्ये राबवत आहेत. यासाठी बहुजन समाजाने सावध राहावे आणि भटमुक्त विधी समारंभ करण्यासाठी लक्ष द्यावे. एवढेच नाही तर, दलित बहुजन समाजाने आपल्या कार्यक्रमांमध्ये भटांना बोलवण्याचे जाणीवपूर्वक टाळले पाहिजे… असे आवाहन दलित महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.

“सावधान, सावधान,
भटजी पासून सावधान…”

प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!