महाराष्ट्रमुख्यपानविदर्भसामाजिक / सांस्कृतिक

अंधभक्तांचा देश की कोणाचा?

ज्या देशात,
जोडे खाण्याच्या लायकीचे,
चोर, बदमाश, गुंड
सत्तेत खुर्चीच्या लायकीचे बनतात,
त्या देशात महागाई, बेकारी,
भ्रष्टाचाराचा उन्माद असणार
नाही,
तर काय असणार?

ज्या देशात,
ब्राह्मणवादी,मनुवादी पायपुसीच्या लायकीचे,
सत्तेत अधिकारी पदस्त असेल,
तर सर्व सामान्य, भारतीयांवर,
अन्याय, अत्याचार,उपासमारी,शेतकरी आत्महत्या,
अमानविय लिंचिग,
जातीभेद, बलात्कार होणार नाही,
तर काय होणार ?

ज्या देशातील
निवडणूक आयोग, ईडी ,सीबीआय
लाचार, सत्तेच्या गळ्यातील पट्टा
लाचार
बनलेला असेल,
त्या देशात,
मतदानात हेराफेरी,
व्होटर मशीनीत
गडबडी करून,
नालायक लोक,
सत्तेत बसणार नाही,
तर
कोण बसणार?

ज्या देशात,
धर्म
दैववाद,
मंदिरांचा उदोउदो केला जातो,
शिक्षण संस्था, दवाखान्या
ऐवजी,
मंदीरे सरकारी पैशातून
बांधली जातात,
त्या देशातील सर्वसामान्य, जनता
बिमारी ने,उपासमारीने तडफडून
मरणार नाही ,
तर कोण संघवाले, मरणार?

ज्या देशातील
मानसिकता,
सडक्या मनु डोक्यांची,
गोमूत्र पिणार्या ची,
शेण खाणार्या महात्माची
असेल
तर,
त्या देशातील
परिस्थिती
अंधभक्ताची असणार नाही,
तर कोणाची?

प्रा.मुकुंद दखणे,
यवतमाळ 9373011954

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!