महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

आगामी विधानसभा निवडणूक आणि बौद्ध – आंबेडकरी विधिमंडळात प्रतिनिधीत्व, राज्याच्या सत्तेत सहभाग.

राज्यातील बौद्ध समाजासाठी

आंबेडकरवादी भारत मिशनने शिवसेना पक्ष प्रमुख मान. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मान. शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मान. मल्लिकार्जुन खारगे यांना आज लिहिलेले अनावृत्त पत्र.

||#आंबेडकरवादी #भारत #मिशन ||
AMBEDKARITE INDIA MISSION

दिनांक: २२ सप्टेंबर २०२४

प्रति,
१) मान. उद्धवजी ठाकरे साहेब,
पक्षप्रमुख, शिवसेना
२) मान. शरद पवार साहेब,
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
३) मान. मल्लिकार्जुन खारगे साहेब,
अध्यक्ष, इंडियन नॅशनल काँग्रेस

विषय: आगामी विधानसभा निवडणूक आणि बौद्ध – आंबेडकरी विधिमंडळात प्रतिनिधीत्व, राज्याच्या सत्तेत सहभाग.

महोदय,
सविनय जयभीम! जय महाराष्ट्र!!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने भाजपला ३०३ जागांवरून २४० जागांपर्यंत खाली खेचले आहे. त्यात महाविकास आघाडीने तर महाराष्ट्रात भाजपच्या ३० जागांचा लचका तोडला आहे. त्या निवडणुकीत संविधानाच्या अस्तित्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आला होता. त्यामुळे ती लढाई ‘ भाजप विरुद्ध भारतीय ‘ अशी झाली होती. त्यातून मुस्लिम आणि बौद्ध या दोन्ही समाजांनी पुरेशा जागांवर त्यांना उमेदवारी दिली नसतानाही महाविकास आघाडीला भरघोस मतदान करत साथ दिली आहे . अखेर भाजपला बहुमतासाठी नेमक्या ३०- ३२ जागाच कमी पडल्या. त्यावरून महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातील विजयाचे महत्व अधोरेखित झाले आहे.

पण आता येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय होणार? बौद्ध आणि मुस्लिम या निर्णायक घटक असलेल्या समाजांना योग्य प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी महाविकास आघाडी संधी देणार की नाही?

या प्रश्नावर प्रतिसादाची, समाधानकारक उत्तराची प्रतीक्षा ते दोन्ही समाज सध्या करत आहेत. त्या अनुषंगाने बौद्ध – आंबेडकरी समाजाची न्याय्य आणि रास्त अपेक्षा आपल्यासमोर ठेवण्यासाठी हे अनावृत ( खुलेआम) पत्र आम्ही आपणांस पाठवत आहोत.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या प्रांतांतील प्रतिनिधींचा समावेश असलेले बौद्ध समाजाचे एक शिष्टमंडळ या मुद्द्यावर आपल्या भेटीसाठी लवकरच येत आहे.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना हातची सत्ता टिकवण्यासाठी झुंजावे लागणार आहे. तर, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीसमोर राज्यात सत्तांतर/ परिवर्तन घडवण्याचे आव्हान मोठे आहे.

हे आव्हान एकट्या महाविकास आघाडी पुरते मर्यादित आहे,असे मुळीच नाही. महाराष्ट्र हितासाठी समस्त लोकशाहीप्रेमी जनतेसमोरील ते आव्हान आहे, असे आम्ही मानतो. राज्यात गेले दोन वर्ष भाजपप्रणीत घटनाबाह्य सरकार आहे. न्यायसंस्थेच्या
‘ कासव छाप ‘ गतीमुळे त्या सरकारने अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्याची नोंद इतिहासात होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपने सध्याचे सरकार स्थापन करण्यापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांना सुरुंग लावून क्षीण केले आहे. असो.

#बौद्ध #समाजाची #ताकद #निर्णायक

राज्यात विधानसभेच्या २९ जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. त्यापैकी फक्त ८ जागांवर सध्या बौद्ध समाजातील आमदार आहेत. खरे तर, बौद्ध समाजाची ताकद ही राज्यातील सत्तेच्या राजकारणात निर्णायक आहे. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदार संघापैकी १८९ मतदारसंघात बौद्धांची निर्णायक मतदारसंख्या आहे. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांतही हे सिद्ध झालेले आहे. १९९० च्या निवडणुकीत बौद्ध समाजाच्या पाठिंब्यामुळेच काँग्रेसला हातची सत्ता राखण्यात यश आले होते. तर, घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीतील दलित हत्याकांडानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत युती सरकारला बौद्ध समाजाने सत्तेतून हद्दपार केले होते.

२०११ च्या जनगणनेत राज्यात जात नोंदवलेल्या आणि न नोंदवलेल्या बौद्धांची एकत्रित लोकसंख्या १ कोटी इतकी आहे. अनुसूचित जातींमध्ये तोच सर्वात मोठा घटक ( ८० टक्के) आहे. मात्र त्या समाजाला पुरेसे प्रतिनिधीत्व आणि सत्तेत योग्य वाटा आजवर कधीच मिळालेला नाही.

#बौद्धांचा २० #जागांवर #हक्क

लोकसंख्येच्या प्रमाणात बौद्ध समाजाला विधानसभेच्या २० जागांवर प्रतिनिधीत्व मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार,
विधानसभेच्या १२ जागांवर शिवसेना ( उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी ( शरद पवार) आणि काँग्रेस यांनी त्यांच्या पक्षातील प्रत्येकी ४ सक्षम बौध्द कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी. ८ जागा आघाडीसोबत असलेल्या आंबेडकरवादी पक्ष – संघटनांकडील विजयाची क्षमता असलेल्या उमेदवारांसाठी सोडाव्यात. तसेच विधान परिषदेच्या ३ जागांवर बौध्द समाजातील साहित्यिक, पत्रकार, कलावंत, माजी सनदी अधिकारी यांना संधी द्यावी, असा आमचा आग्रह आहे.

आंबेडकरी #समाजाची

#जनभावना #काय?

आपणांस कल्पना आहेच की,
१) जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ‘ इबीसी ‘ आणि ‘ ओबीसी ‘ या वर्गांना दिलेली सहा महिन्यांची मुदत अनुसूचित जातींना भाजप आणि मित्र पक्षांनी जाणूनबुजून नाकारली आहे. त्यामुळे सुमारे २ लाख दलित विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला मुकावे लागले आहे.
२) शिष्यवृत्ती, फेलोशीपअभावी एससी विद्यार्थ्यांची , संशोधकांची तर नेहमीच ससेहोलपट सुरू आहे. त्यांना घरदार, अभ्यास वाऱ्यावर सोडून देत न्यायासाठी वारंवार रस्त्यावर उतरावे लागत आहे.
३) भीमा – कोरेगाव येथे आंबेडकरी समाजाला लक्ष्य करत घेरून करण्यात आलेले हल्ले आणि माजवलेल्या हिंसाचारानंतर फडणवीस सरकारने खोटे गुन्हे दाखल करून आंबेडकरी बांधवांनाच खटल्यांमध्ये अडकवले आहे. ते खटले त्वरित काढून घेण्याची नितांत गरज आहे.
४) राज्यात महाविकासआघाडी सरकारच्या काळात ( ७ मे २०२१ पासून) अनुसूचित जाती – जमातींचे बढती ( प्रमोशन) मधील आरक्षण बंद करण्यात आलेले आहे. ते पूर्ववत सुरू करण्याची गरज आहे.
५) भूमिहीनांना जमीन वाटपासाठी राज्यात असलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना कागदोपत्री अस्तित्वात आहे. तिची प्रभावी अंमलबावणी करून जमिनींचे वाटप होणे आवश्यक आहे.
६) गायरान जमीन धारकांच्या अतिक्रमणाचे दावे अनेक वर्षे प्रलंबित आहेत. ते तातडीने निकाली काढण्याची गरज आहे.
७) महाराष्ट्राच्या एकूण बजेटपैकी अनुसूचित जातींच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मंजूर करून त्याचा १०० टक्के विनियोग करणे राज्य सरकारला बंधनकारक करण्यात आले पाहिजे. त्यासाठी विधिमंडळात कायदा संमत करण्याची आवश्यकता आहे.

बौद्ध – दलित समाजात या आणि अशाच अनेक ज्वलंत प्रश्नांवरून कमालीचा असंतोष आहे. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सध्याचे भाजपप्रणीत सरकार हटविण्याशिवाय तरणोपाय नाही, असे आमचे मत बनले आहे.

#राज्यात #परिवर्तनाचे #उद्दिष्ट

राज्यातील बौद्ध – आंबेडकरी समाजातही तीच जनभावना प्रखर आणि प्रबळ झालेली आहे. त्यातून भाजपला सत्तेवरून हटवून राज्यात ‘ परिवर्तन ‘ घडवण्याचे उद्दिष्ट साधण्यासाठी आंबेडकरी समाजातील काही छोट्या – मोठ्या पक्ष संघटना या महाविकास आघाडीसोबत राहण्याच्या भूमिकेत आहेत.

मात्र, विधानसभा निवडणुकीत तरी बौद्ध समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य आणि पुरेसे प्रतिनिधीत्व मिळणे अनिवार्य आहे. पुरेसे प्रतिनिधीत्व आणि सत्तेच्या लाभाच्या ठोस आंबेडकरवादी नेते आणि कार्यकर्त्यांनासुद्धा निवडणुकीत आपल्या समाजाला सामोरे कसे जायचे, हा प्रश्न भेडसावू शकतो. त्याला महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांतील बौद्ध समाजातील नेते, कार्यकर्तेही अपवाद नाहीत.

महाविकास आघाडीला मतदान करण्याच्या आणि पाठिंबा देण्याच्या भूमिकेचे नैतिक, व्यावहारिक आणि सामाजिक पातळीवर समर्थन करणे त्या सर्वांना शक्य झाले पाहिजे. याचे गांभीर्य शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या प्रमुखांनी लक्षात घेवून आवश्यक तो सकारात्मक निर्णय त्वरेने घ्यायला हवा.

आपण महाविकास आघाडीचे अध्वर्यू आणि आधारस्तंभ आहात. आपल्या पक्षाने आणि सोबतच्या मित्र पक्षांनी राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी या परिस्थितीची गंभीरपणे आणि तातडीने नोंद घेण्याची गरज आहे. राज्यात परिवर्तन घडवण्याची हाताशी असलेली संधी महाविकास आघाडीने म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांनी गमावता कामा नये, असे आम्हाला तीव्रतेने वाटते.

आपल्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने तीनही पक्षांतील पक्षांतील बौद्धांना विधानसभेच्या १२ ( प्रत्येकी ४) , आघाडी सोबतच्या आंबेडकरवादी पक्ष – संघटनांकडील सक्षम उमेदवारांसाठी ८ जागा आणि विधान परिषदेच्या ३ जागा देण्याबाबतचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी आमची रास्त अपेक्षा आणि नम्र विनंती आहे.

आपले विनीत.

१) दलित पँथर नेते सुरेश केदारे
२) प्राचार्य रमेश जाधव
३) ज्येष्ठ पत्रकार सुनील खोबरागडे
४) ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ
५) शिक्षण तज्ज्ञ डॉ.जी.के. डोंगरगावकर
६) माजी प्राचार्य ॲड. जयमंगल धनराज
७) बँक कर्मचारी नेते सतीश डोंगरे
८) प्रा. एकनाथ जाधव
७) पत्रकार प्रशांत रूपवते
८) पत्रकार जयवंत हिरे
९) माजी उप नगराध्यक्ष प्रकाश कांबळे पूर्णा, परभणी
१०) छाया खोब्रागडे, नागपूर
११) प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे, लातूर
१२) ॲड. हर्षल शाक्य
१३) प्रा.गौतम निकम, जळगाव
१४) सतीश गायकवाड, पुणे
१५) यु.डी.गायकवाड
१६ ) डाॅ.प्रा. अशोक नारनवरे
१७) श्रीहरी कांबळे
१८) प्रा. डॉ. सतीश वाघमारे
१९) डॅा प्रज्ञावंत देवळेकर
२०) डॅा सुदाम राठोड
२१) प्रा तुषार भोसले
२२) डॅा गौतम बनसोडे
२३) प्रा जगदीश गाणार
२४) प्रा विजय गायकवाड
२५) सिद्धार्थ जगदेव
२६) डॅा निळकंठ शेरे.
२७) मयुर लंकेश्वर
२८) डॅा अनिल सपकाळ
२९) प्रा. जयसिंग वाघ, जळगाव
३०) प्रकाश हिवाळे
३१) राहुल साळवे, छत्रपती संभाजी नगर
३२) सुरेश साबळे, बुलढाणा
३३ ) प्रा. प्रतिभा अहिरे, कन्नड
३५) पत्रकार महेश गायकवाड, सोलापूर

३६) पत्रकार संदेश पवार, चिपळूण

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!