व्यवस्था परिवर्तन हवे तर सत्ता हस्तगत करणे गरजेचे
अरुण गाडे ः राष्ट्रीय आरक्षण परिषदेतून एल्गार
नागपूर, ता. १५ ः आरक्षण संविधानाने दिले असताना सरकार ते काढून घेण्याची भाषा करत आहे. उपवर्गीकरणासारखी गुंतागुंत निर्माण करून संविधानिक अधिकार नाकारते, हे अन्यायकारक असून संविधानिक नीतिमत्तेचे तत्त्व नाकारणारी कृती आहे. आता आंदोलना सोबतच सर्व दलित बहुजनांनी संविधानाशी एकनिष्ठ राहून परिवर्तनासाठी सत्ता हस्तगत करावी लागणार आहे, असे परखड मत आरक्षण परिषदेचे अध्यक्ष कामगार नेते अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राईब महासंघ यांनी आज येथे व्यक्त केले.
आरक्षण बचाव समन्वय समितीच्या वतीने राष्ट्रीय आरक्षण परिषद आयोजित करण्यात आले. परिषदेच्या अध्यक्षपदावरून कामगार नेते गाडे बोलत होते. यावेळी मंचावर सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता ॲड. श्रेयश गच्चे, प्रा. एन व्ही. ढोके, ॲड. रमेश पिसे, आरोग्य विभागातील सहसचिव अशोक आत्राम, विश्वदीप करंजीकर, उपस्थित होते.
गाडे म्हणाले, दलित आदिवासी बहुजनांनी सांविधानाशी बांधिलकी ठेवून काम करणे, लोक कल्याणासाठी झटणे, समाजाच्या वंचित शोषित वर्गासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज निर्माण झाली असून परिवर्तनाच्या या लढ्यात सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचण्याची वेळ आली आहे. आरक्षण परिषदेचे उद्घाटन करताना माजी मंत्री तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून सर्व मागासवर्गीय जाती जमाती एकत्र येत असताना अचानक अनुसूचित जाती व जमातीच्या उपवर्गीकरणाचा विषय पुढे आणला. या अनुसूचिला अ, ब, क, ड वर्गीकरण करण्यासाठी संविधानात तरतूद नाही. यामुळे येणाऱ्या काळात आरक्षणाची भूमिका समजावून सांगण्यासाठी देशभरात प्रबोधन करण्यासाठी सभा घेण्यात येईल, असे घोलप म्हणाले. संचालन राहुल मुन, भूमिका सुशील तायडे यांनी मांडली
बहुजनांना आरक्षणाला मुकावे लागणार
ॲड . श्रेयश गच्चे यांनी उपवर्गीकरणामुळे येणाऱ्या काळात दलित आदिवासी बहुजनांना आरक्षणाला मुकावे लागणार आहे. प्रा.एन.व्ही.ढोके यांनी देशात प्रबळ विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाची ताकद होती. परंतु रिपब्लिकन पक्षाची ताकद लयास गेली आणि या सत्ताधाऱ्यांना रान मोकळे झाले. विश्वदीप करंदीकर म्हणाले, मागासवर्गीयांचा अनुशेष भरणे, सरळसेवेची आणि पदोन्नतीची पदे १०० टक्के भरली जात नाहीत. संचालन प्रा राहुल मुन, भूमिका -सुशील तायडे यांनी मांडली —-विविध परिसंवादात माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, अशोक कांबळे,भीम आर्मी,डाँ नितीन कोळी,एस के भंडारे,प्रा. जावेद पाशा, प्रा. नामा जाधव, अरविंद गेडाम,वैभव कांबळे, आकाश फुलझेले, अमन कांबळे, उमेश कोर्राम, राहुल सोनपिंपळे यांनी विचार व्यक्त केले. प्रा. रणजित मेश्राम यांच्या उपस्थितीत समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा मधुकर उईके,गोपल भारती, संयुक्त मोर्चा श्याम निलंगेकर नांदेड,राजेंद्र साठे उपस्थित होते. 23 ठराव पारित करण्यात आले त्याचे वाचन रणजित रामटेके यांनी केले.संचालन मीना भागवतकर, आभार डाँ जयप्रकाश बागडे यांनी केले
मान्यवरांचा सत्कार
परिवर्तनाच्या चळवळीत समर्पित भावनेतून कार्य करणाऱ्या माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, धम्म कार्यकर्ता, पुष्पाताई बौद्ध, माजी प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे,प्राचार्य डाँ प्रकाश राठोड गीतकार गायक अनिरुद्ध शेवाळे सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र साळवे या मान्यवरांचा डाँ बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार आरक्षण परिषदेत करण्यात आला. श्यामराव हाडके,रवी पोथारे,विनोद मेश्राम, सिताराम राठोड, लीलाधर कानडे, जयंत इंगळे, यशवंत माटे, सुनंदा गायकवाड, प्रतिभा खोब्रागडे, कविता मडावी,विनोद बनसोड, राजेश ढेंगरे, , मनोहर चव्हाण,सुरेश तामगाडगे व अनेकांनी सहकार्य केले. सुरुवात एम एस जांभुले लिखित व डाँ विना राऊत दिग्दर्शीत मिशन -2024 लघु नाट्य सादर करण्यात आले. *विनीत सीताराम राठोड
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत