माणसावर वर्चस्व गाजवण्यासाठी….
काल्पनिक देवाची निर्मिती झालेली आहे, फक्त देवाचीच नाही तर भुताची सुद्धा निर्मिती त्यासाठीच केली गेलेली आहे …. भूतबाधा भुताटकी मुंजा ….
हे काही नवीन नवीन प्रकार माणसाच्या अंगवळणी जाणून-बुजून पडले जात आहेत…
टारगेट फक्त एकच माणसाच्या मनात प्रचंड भीती कशाप्रकारे निर्माण होईल ….देवाच्या नावाने किंवा भुताच्या नावाने, या दोन्ही प्रकाराला न जुमानता
धाडसान जीवन जगायला हवं, दिवसा कशाची भीती नाही आणि रात्री सुद्धा कशाची भीती नाही
रात्री फक्त हिंसक पशूंची पक्षांची भीती असू शकते
तरीसुद्धा माणसाच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी ठराविक जागा, ठराविक स्थळ, ठराविक झाड, आणि ठराविक वेळ …. आशा काही गोष्टी सांगून भीती निर्माण केली जाते ….
आणि मग काही काही लोकांच्या मनात एक अनामिक भीती निर्माण होऊन यांच्या मनाचा कळ अध्यात्मिक किंवा धार्मिक तिकडे वळतो …तिथे सुद्धा विशिष्ट देवता देवी विधी ….वेळ ठरलेला असतो ….मनाच्या भीतीच्या कचाट्यात सापडलेला माणूस खूप धोकादायक आहे सामाजिक व्यवस्थेसाठी ….आधुनिक जगात आपण पाहत आहोत अगदी देवासमोरच अन्याय अत्याचार होतो तरीसुद्धा देव रक्षणासाठी येत नाही माणसं मरतात तरीसुद्धा देव येत नाही ….मग भूत कसा येईल ….त्यामुळे पाखंडवादातून माणसाची मुक्ती होणेच अस्सल जागरूकता आहे ….असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही …..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत