प्रश्न सामाजिक ऐक्याचा
भदंत विमलकीर्ती गुणसिरी
बांधवांनो- भारतीय बौद्ध समाज किमान धम्माचे नावाने तरी सुसंगतीत असायला पाहिजे ना?
हा प्रश्न प्रत्येक बौद्ध माणूस स्वतःला कधी ना कधी विचारीत असतो. ही समाजाची आद्य गरज आहे. ही केवळ आजच्या काळाची गरज नाही, तर गेल्या हजारो वर्षाच्या पदीर्घ काळापासूनची गरज आहे. मूळचा बौद्ध असलेला भारतातील बहुजन समाज ब्राह्मणी वर्चस्वाच्या हिंदू धर्मात गणला गेल्यानंतर तो अनेक जाती पोटजातीत विभागला जाऊन त्याचे सर्व सामाजिक सामर्थ्य लयास गेले. ब्राह्मणी हिंदू धर्माने त्याला शिक्षणाची, सुधारण्याची बंदी घातल्यामुळे त्याचा व्यक्तिगत विकासही थंडावला. त्यामुळे सर्व बहुजन समाज दैन्य, दारिद्र्य, अज्ञान आणि मागासनेपणाच्या गर्दीत पडला. या सर्व समाजाची आद्य गरज आहे ती सामाजिक एक्याची आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
या न्यायाने व्यक्तिगत आणि सामाजिक उद्धार करण्याची ऐक्याच्या बळावरच हा समाज आधुनिक लोकशाही युगात सत्ताधारी होऊ शकतो, हे तर एक उघड गुपित आहे. त्यामुळे या बहुजन समाजाचे ऐक्य होऊ नये, म्हणून त्याला प्रचलित देव धर्म आणि संस्कृतीच्या नावाने जातिभेदाच्या कुंपणात अडकवून ठेवण्याचा अटोकाठ प्रयत्न उच्चवर्ग वर्चस्ववादी लोक सतत करीत आहेत. उच्च वर्णीयांचा धर्मांतराला धर्मांतराला विरोध असण्यामागील हे खरे कारण आहे. हे सर्व बारकाईने जाणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बहुजन समाजाला आपल्या वळवण्याची प्रेरणा देण्यासाठी आणि बुद्धधम्मशिवाय जातीभेदासारख्या नरकाचे पारिपत्य होणार नाही, हे त्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी भारतात बुद्ध धम्माचे पुनर्जीवन केले आणि सर्व भारत बौद्धमय करण्याचे ध्येय उराशी बाळगले त्याचबरोबर बौद्ध बनणे म्हणजे धर्मांतर करणे नव्हे, तर आपल्या मूळ धर्मात जाने किंवा स्वगृही परतणे होय, हेही त्यांनी स्पष्ट केले. बुद्ध काही परका नव्हता. त्यांचा धम्म जर आजच्या जगात सर्वश्रेष्ठ मानला जात असेल आणि तो जर एकेकाळी सर्व भारतीयांचा धम्म असेल, तर त्याचा आज सर्व भारतीयांनी स्वीकार का करू नये? असा सरळ विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. मानसिक परिवर्तनाशिवाय कोणतेच व्यक्तीगत आणि सामाजिक परिवर्तन होत नसते, हे सत्यही त्यांनी स्पष्ट केले. डॉक्टर आंबेडकरांच्या पेरणेने अशा या परिवर्तन प्रक्रियेतून जाऊन बौद्ध झालेल्या समाजाने त्यांच्या आदर्शाचा एक नमुना ( Role Model ) म्हणून सुसंघटित बौद्ध समाजाची रचना करून दाखविणे अत्यंत आवश्यक आहे. ही बौद्ध समाजाची केवळ ऐतिहासिकच नव्हे, तर नैतिक जबाबदारी आहे. त्याचबरोबर ती सर्व देशातील नाडलेल्या पिडलेल्या लोकांच्या मुक्तीचा संदेश आहे. परंतु या अत्यंत मूलभूत प्रश्नाचा तथाकथित बौद्ध समाजाने कधीच विचार केलेला नाही. सर्वसामान्य माणसाच्या अंतकरणात मात्र सामाजिक ऐक्याच्या ओढीचा सतत बोच लागलेली आहे. ऐक्याच्या नावाने सर्वसामान्य माणूस फुलकीत होतो आणि मोठ्या आशेने अशा प्रयत्नात सहभागी होत असतो. परंतु आतापर्यंत त्याची सतत फसगतच होत आलेली आहे. राजकीय ऐक्याच्या नावाने अधून मधून ुढार्यांच्या ऐकायच्या ढोलताशे बडविले जातात आणि त्या आवाजाबरोबरच ते ऐक्याचे बोलही हवेत विरून जातात, असा अनुभव आहे. बौद्ध धर्मीय म्हणून सामाजिक ऐक्याचा आवाज मात्र कोणी काढत नाही. धम्म हेच सामाजिक ऐक्याचे महानसूत्र आहे, हे कोणी लक्षातच घेत नाहीत. नेत्यांचे किंवा गटातटांचे किंवा फुटकळ संघटनांचे ऐक्य करण्याचा काही लोक कधी कधी प्रयत्न करतात. नेते गट तट आणि फुटकळ संघटना या संकुचित उद्दिष्टांसाठी आणि आपापल्या स्वार्थासाठी निर्माण झालेल्या असतात. त्यांचे निर्मिती आपापल्या काही ना काही स्वार्थ साधण्याचाच प्रयत्नात मश्गुल असतात. ऐक्य ही त्यांची गरज नसते. त्यांची गरज असते बेकी. कारण त्यांना मानणारे लोक धरून ठेवायचे असतात. ते दूर जातील की काय ही त्यांच्या मनात भीती असते. म्हणून ऐक्य त्यांना नकोच असते परंतु कधी कधी लोक भावना भडकल्या तर त्यांना शांत करण्यासाठी ऐक्याचा आव आणून थोडासा देखावा करावा लागतो. त्यामुळे ऐक्याचे प्रयत्न व्यर्थ जातात आणि समाज आहे तेथेच राहतो. मग समाजाची काही सुधारणा होण्याचे तर सोडाच, परंतु समाज अन्याय अत्याचारालाही तोंड देऊ शकत नाही एवढा दुर्बल बनतो. अक्षरशः लाचार बोलून जातो. कारण शेवटी वेळ काळ कोणतीही असो, सामाजिक ऐक्याशिवाय कोणत्याही समाजाचे संरक्षण आणि धैर्य टिकत नसते. त्याशिवाय व्यक्तिगत आणि सामाजिक विकासही होत नसतो. सामाजिक ऐक्य अशा प्रकारे, सर्व कल्याणाचा मार्ग आहे. हे जाणूनच तथागत बुद्धांनी सर्व मानव जातीला समता स्वातंत्र्य आणि बंधुतत्त्वाच्या शिकवणीने एक सूत्रात बांधून सामाजिक ऐक्याचा आदर्श दिलेला आहे. त्यांच्यापुढे बौद्ध संघाचा नमुना सादर केला आहे. या बौद्ध संघाचा आदर्श गिरविणे हे बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे. म्हणून बौद्ध समाजाचे धम्माच्या माध्यमातून ऐक्य का होत नाही ? आणि ते काय केल्याने होईल ? या प्रश्नाचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
भदंत विमलकीर्ती गुणसिरी
”””””””””””””””””””””””””””””””””””””'”””””””””
विचार प्रचारक बाळासाहेब ननावरे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत