
संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हेअधिवेशन २२ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणारआहे. लोकसभेचे हे अधिवेशन १३ वे तर राज्यसभेचे २६१वे अधिवेशनअसून या अधिवेशनासाठी सरकार सज्ज झाले आहे. तर विरोधक देखील सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. या अधिवेशात कोणते विधेयक मांडले जाणार या कडे देखील सर्व देशाचे लक्ष लागून आहे.
२२ सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशात विविध विधेयक सादर केले जाणार आहे.
सोमवारपासून संसदेचे पाच दिवसीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाआधी सरकार कोणते विधेयक मांडणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या अधिवेशनात संसदेच्या ७५ वर्षांच्या प्रवासावर चर्चा होणार आहे. आजचे अधिवेशन हे नव्या संसद भवनात होणार आहे. या बाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली की, या अधिवेशनात एकूण ८ विधेयके चर्चेसाठी आणि मंजूर करण्यासाठी मांडले जाणार आहेत. रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित विधेयक आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आदेशाशी संबंधित ३ विधेयके सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
यापूर्वी सूचीबद्ध केलेल्या विधेयकांमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयकाचाही समावेश करण्यात आला होता. मात्र, सरकार कोणते विधेयक सांभागृहात मांडणार या बाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, महिलांना आरक्षण देणारे विधेयक लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्येही मांडले जाण्याची शक्यता आहे.
महिला आरक्षण विधेयक पाच दिवसांच्या अधिवेशनात मांडण्याच्या विविध पक्षांच्या मागणीवर सरकारच्या भूमिकेबाबत जोशी म्हणाले की, याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी रविवारी सकाळी नवीन संसद भवनाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावला. सेंट्रल हॉलमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमानंतर विद्यमान संसदेचे नवीन इमारतीत स्थलांतर करण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत