संविधानावर आघात होणे, लोकशाही हद्दपार होणे आणि गुलाम बनण्यासाठी आपणच सर्वस्वी जबाबदार आहोत – प्रा. देविदास इंगळे
महामानव महापुरुष मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील की डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील असे सर्वच माणसासाठी माणसांच्या अधिकारासाठी त्यांच्या हक्कासाठी यांनी आपल्या जीवाची बाजी लावून मानवतेचं रक्षण केलं.
मग आम्ही काय करायला हवं? तेच ना?
आम्ही जयंती, पुण्यतिथी साजरी करतो त्यांना अपेक्षित नसलेल्या गोष्टींनी साजरी करतो धर्माचे व जातींचे स्वरूप देवून व्यसनाधीन होवून म्हणजे आपण त्यांच्या नावाचा मौज मजा करण्यासाठीच
उपयोग करतोय असा त्याचा अर्थ.
राजकारणी असोत अथवा कर्मचारी किंवा व्यापारी, शेतकरी वा शेतमजूर सर्वानी आपले कर्तव्य चोख पारपाडावीत
म्हणजे राजकीय लोक हजारो करोड रुपयांची संपत्ती गोळा करतात.
कर्मचारी त्यांना सरकार पगार देतंय मग फाईल पुढं जाण्यास पैसा कशाला लागतो बरं त्यांनी घेतले म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, व्यापारी का पैसा देतो.
होऊद्यांना नियमांनी काम आज ऐकाचे तर उद्या दुसऱ्याचे होणारच ना.
पण नाही माझे काम अगोदर झाले पाहिजे कितीही पैसा लागला तरी चालेल सरकार व कर्मचारी जनतेचे काम करतात तेव्हा ते मालक झाल्याचा आव आणतात आणि आपण पण गुलाम असल्याची दाद देतोय आणि सर्व गोष्टींचा स्वीकार करतोय मग जबाबदार कर्मचारी का जनता?
कॉलेज, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेज, नर्सिंग कॉलेज काढण्यासाठी करोडो रुपये दयावे लागतात मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान सर्वांच्याच वाटण्या होतात कॉलेज मंत्र्यांचे का? मुख्यमंत्र्याचे का? पंतप्रधानांचे यांच्या घरी तयार झालेले कॉलेज आहे का?
या ठिकाणी आपण डोकं गहान ठेवतो का? हे करोडो देणारे करोडो चे डोनेशन घेतात
जनतेनी का म्हणून सहन करावं? म्हणजे सरळ आपणास दिलेला मताचा अधिकार 500, मटण, दारूत विकून आपण त्यांना करोडोंचे दरवाजे खुले करून देतोय.
मग हे गबर संविधानावर आघात करतील, लोकशाही विकत घेवून हुकूमशाही आणतील आणि मग योगायोनाणे ऑटोमॅटिक आपण गुलाम बनू आहे की नाही सोपं.
आज आम्ही पैशासाठी आज आम्ही सोन्यासाठी पक्ष विकतोय, इज्जत विकतोय, पक्षांची तिकिटं विकतोय ज्यांच्या हातात पाळण्याची दोरी तो जगाला उद्धारी किती सोपं आहे.
निसर्गानी दिलेली संपत्ती आपला अधिकार आहे हे आपल्या डोक्यातच नाही म्हणून हे सर्व घडतंय.
आज गावोगावी करोडो रुपयांची मंदिरे, मस्जिद, चर्च,बौध्द विहारं आपण बांधलोत पण कोणी शाळेला कोणत्या गावांनी ऐखादा फॅन दिल्याचं दिसत नाही किंवा दवाखाना बांधण्यासाठी रुपया दिला जात नाही तिथे रोजगार निर्माण होतील हे विसरलोच आणि देशाचा दर्जा शिक्षणाने उंचावतो हे आपल्या लक्षात अजूनही आले नाही आपण जे जगतोय ते विज्ञानाने याचा विसर पडलाय.
म्हणून प्रत्येक नागरिकांनी स्मरण करावं महापुरुषयांच्या माणसांच्या सेवेचं मोल करावं त्यांच्या त्यागचं म्हणजे आपण गुलाम होणार नाहीत, संविधान वाचेल, लोकशाही वाचेल यावर लक्ष केंद्रित करावं दलाल नेत्यांना सबक शिकवावी पक्ष बदलू, कोट्यावधी रक्कमा घेवून समाजाला विकणाऱ्यांना ओळखून काम करावं आणि लोकशाही, राजेशाही जीवन सर्वानी जगावं.
धन्यवाद
आपला स्नेही
प्रा. देविदास इंगळे
राष्ट्रीय अध्यक्ष
राष्ट्रीय संविधान बचाव अभियान.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत