महाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

न्यायाधीशाच्या परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी न्यायाधीश सुबोधचे उपयुक्त पुस्तक.

सुबोध अशोक भैसारे हे जानेवारी २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोगाने जाहीर केलेल्या दिवाणी न्यायाधीश (क स्थर) व न्यायदंडाधिकारी (प्र.वर्ग) चा अंतिम निकाला प्रमाणे त्यांनी एकूण १७८ गुण मिळवून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाने यशस्वी झाले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर ते शांत बसून न राहता त्यांच्या प्रमाणेच इतर इच्छुकांनी सुद्धा या क्षेत्रात यावे या प्रेमळ इच्छेने न्यायिक सेवा परीक्षेची तयारी कशी केली, चाळणी परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत याचा अभ्यास कसा केला व कसा करावा, तसेच त्यांना त्यांच्या पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर त्यांना त्यांच्या दुसऱ्या प्रयत्नात कशामुळे यश मिळाले त्याचा लाभ होतकरू उमेदवारासाठी व्हावा या दृष्टीने व इच्छेने HOW TO PREPARE FOR JUDICIAL SERVICE EXAMINATION (Prelims Main and Interview) नावाचे अंदाजे ३३० पानाचे ८ इंच × ११ इंच आकाराचे २२ पाठ असलेले , निबंध आणि निकाल पत्र लेखनासह अतिशय सुंदर, देखणे, सुबक , मुद्देसुद, परीक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण असे पुस्तक प्रसिद्ध केले आहे .ते नवोदित उमेदवारांना नक्कीच आवडेल. स्पर्धा परीक्षा म्हटले की प्रथम डोळ्यासमोर येते ती एम.पी.एस.सी. किंवा यु.पी.एस.सी.परीक्षा. त्या व्यतिरिक्त इतर महत्वाच्या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा सुद्धा आहेत हे अनेकांना माहीत असूनही ते त्याकडे पाठ फिरवून असतात. त्यापैकी एक अशी न्यायिक सेवा परीक्षा. स्पर्धा आली की मार्गदर्शन, त्या त्या विषयावरील उपलब्ध पुस्तके याचा प्रामुख्याने विचार केला जातो. एम.पी.एस. सी.किंवा यू.पी. एस. सी. च्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेक पुस्तके तथा मार्गदर्शन केंद्र शासन पुरस्कृत आणि खाजगी शिकवणी वर्ग सेवेत आहेत.तसेच या सारख्या परीक्षेत यश संपादन करून जिल्हाधिकारी (आय. ए .एस.) आय.पी.एस.,आय. आर.एस. किंवा इतर वर्ग १ झालेल्या विविध अधिकाऱ्यांनी त्यांच्या यशस्वी कथा, त्यांचे कष्ट स्वकथनावर आधारित मार्गदर्शनपर अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध करून दिलेले आहेत . तसेच न्यायिक सेवा क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या साठी खाजगी मार्गदर्शन वर्ग, सिल्याबस वर आधारित प्रश्न व त्याची उत्तरे, मागीलवर्षी चे प्रश्न पत्रिका अशा एक ना अनेक पुस्तके सुद्धा बाजारात उपलब्ध नाहीत असे नाही. परंतु एम. पी .एस. सी. द्वारे घेण्यात आलेल्या न्यायिक सेवा परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराने स्व: कथाना बरोबरच मार्गदर्शनपर लेखन करण्याची ही कदाचित पहिलीच इतिहासिक घटना असावी असे आकर्षणाने जाणवते. होतकरू उमेदवारांना प्रिलीमस, मैन, आणि इंटरव्ह्यू या तिन्ही टप्प्यावर तसेच निबंध लेखन आणि निकाल पत्र कसे लिहावेत या वर त्वरित, तत्काळ व योग्य मार्गदर्शन व्हावे व स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक होऊन कसे यश संपादन करावे यांचे मूलमंत्र घेऊन आले आहेत सुबोध…

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!