IND vs PAK | टीम इंडियाचा आशिया कपमध्ये पाकिस्तानवर विजय

Asia Cup 2023 India vs Pakistan | टीम इंडियाने पाकिस्तानवर अखेरच्या क्षणी थरारक विजय मिळवला आहे.
पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील आशिया कप 2023 स्पर्धेतील तिसरा सामना हा पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आलाय. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 पॉइंट देण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाने चिर प्रतिद्ंवदी पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय. टीम इंडियाने या विजयासह मेन्स हॉकी 5 आशिया कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. मेन्स हॉकी 5 आशिया कपमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने होते. या सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी झुंज दिली. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी 4-4 गोल केले.
सामना बरोबरीत पोहचला अन्
पाकिस्तान आणि टीम इंडिया दोन्ही संघांचे 4-4 गोल झाले. त्यामुळे सामना बरोबरीत पोहचला. त्यामुळे सामन्याचा निकाल हा शूटआऊटमध्ये लागला. टीम इंडियाने शूटआऊटमध्ये पाकिस्तानवर मात केली. टीम इंडियाने पाकिस्तानला नमवत हॉकी 5 वर्ल्ड कप 2024 मध्ये धडक मारली. टीम इंडियाकडून मोहम्मद राहिल याने (19 आणि 26) जुगराज सिंह (7) आणि मनिंदर सिंह याने 10 व्या मिनिटाला निर्धारित वेळेत गोल ठोकला. तर गुरजोत सिंह आणि मनिंदर सिंह या दोघांनी शूटआऊटमध्ये निर्णायक क्षणी गोल केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत