दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

धन्याचा बैलपोळा–रवी दलाल


‌‌‌‌‌‌बैलपोळा म्हणजे ग्रामिण भागातील शेतकरी माणसाचा एकदम जिव्हाळयाचा उत्सव—- पोळ्याच्या आधल्या दिवसा पासुनच बैलाच जुपंनीच कठिण काम बंद व्हायच- —-फक्त बैल चारण्यासाठी म्हणुन शिवार‌ात न्यायची प्रथा हिरव्या चाराॅने बैल फुगवुन घरी आणायचे किवा दोन तीन दिवसाआधी पासुन बैलानां ढेप सरकीचा कडबा कुटार गव्हाचा ऊंडा अालप लावला कि त्याला आराम असायचा दुसराॅ दिवसी नदी नाला विहीरीवर बैलजोडी पाण्यात पौहनी घातली कि रात्री हळद तुप गरम करुन बैलाची खांदमर्दन
खांद शेकुन झाले कि घरची संवाशीन बाई जोडीची पुजा बांधायची -पळसाच्या पानाच्या फादया (बेगड) दरवाजात उभ्या,ठेवुन बैल औवाळनी व्हायची आणि मग रात्री घरचा धनी दोन्ही तळहाताचा पोगा करुन बैलानां आमंत्रण दयायचा हा आवाज रात्री घराघरातुन निघायचा

उपाशी पोटाचा पोशिंदा म्हणजे बैल त्याला पोळ्याला आमंत्रित करण्याचा प्राचिन रिवाज

आज आवतन आहे ऊदया जेवन कराले येजा हो नंदीबैल हौ

जो पर्यत बैल मान हालवुन होकार भरत नाही तो पर्यत धनी बैलाच्या कानाजवळ जावुन आवाज दयायचा या आवाजाने गाव मोहल्ला घरदार पिजांरुन निघायच—-मग पुरणपोळीचा घास चारुन पुजन व्हायचे बैलाला दंडवत करुन उपकार मानायचे—– मग बैलाची रंगरोटी धमाक्यात सुरु व्हायची– तसी रंगरोटी सकाळ पर्यत चालायची टोकदार शिंगावर रंगीत बेगड लावले कि बेैलजोडी एकदम उठुन टवटवीत दिसायची – जुन्या वैसना टाटे मंढाटे घुंघुर बाजनी काढुन नवा दोर, नवी वैसन, नवा गळपट्टा, नवे घुंघरु, नवा मुस्का, बांधुन बैलजोडी तयार व्हायची– बैलाच्या पाठिवर गेरवाने हाताचे पंजे- तर कधी ग्लास वाटी गेरवात भिजवुन पाठिवर ठप्पे सिंगा वर रंगीबेरंगी बेगळी चढवुन टिवटी त्याला गोल चकोर आरसे तर मोरपिसाचे झुबके गळयात कवळयाची माळ—– मग पाठी वर नवी झुल घातली कि जोडी नवरदेवा सारखी तोरणी जायला तयार— वषेॅभर बैलाची जीवेभावे सेवा करणारा कामदार- घरगडयाला नवे पाढंरे कपडे मिळायचे आणि मग वाजत गाजत बैल गाववैशीवर तोरणी जायचे आमच्या तिवस्यात बैलपोळा अगदी पोलिस स्टेशनच्या समोर हायवे रोडला लागुन भरायचा तो आजही भरतो फक्त बैलजोडया कमी झाल्या तोरणाखाली बैल रांगेत उभे करण्याची लगभग माना- दानाची बैलजोडी येई पर्यत पोळा फुटत नसे मग पाटलाची बैलजोडी वाजत आली कि मग पुजा व्हायची तो पर्यत– सभ्य भारतीय संस्कुती आणि संस्कार पुराणातील कभंरेखालचे दर्शन व्हायचे —दोन्ही बाजु कडुन अस्सल रंडेबाज दारुबाजं माणसाची टोळी झडत्या देण्याच्या तयारीत असायचे मग झडत्या सुरु व्हायच्या एकमेकाच्या माय बहिनी निघायच्या
अश्या रंगीत सदाबहार खमखमीत शिव्या ऐकुन कान धन्य व्हायचे– दोन्ही बाजुने शिव्याची मेजवानी अांग चढुन झोबायची कधी मारामारी ठोकाठोकी व्हायची पण हे भाडंण दिघेॅ काळासाठी टिकत नसायचे आता बैलपोळा फक्त ग्रामिण भागातच पाहायला मिळतो —-बैलजोडया कमी झाल्या असल्या तरी बैला विषयी आदराची भावना अजुन जनमनात कायम आहे पण पुढच्या पिढीत बैलाला घरचा सदश्य म्हणुन जौपासण्याची पंरपरा बंद होणार हे मात्र नक्की— टैक्टर ने बैलाची जागा घेतली पण सध्यातरी टेैक्टर चा पोळा भरत नाही. आपण आणखी मागे जावुन पाहु —–मानवी जीवन उत्क्रांतीचा आरंभ कसा झाला
अग्नीचा शोध जितका महत्वाचा होता त्याही पेक्षा महत्वाचा शोध चाकाचा होता. आदीम काळात जंगला मध्ये राहणाऱ्या मानवाला शतकानु शतके टोळया करुन रहावे लागले पण चाकाचा हा शोध लागला आणि मानवाच आयुष्य स्थिरावल— त्याच सुमारास बैलांच्या सहाय्याने शेती करण्याचे तंत्र मानवाला गवसले आणि कृषीसंपन्न संस्कृतीचा झपाट्याने उगम झाला.
आज यंत्रांच्या सहाय्याने शेतीचे तंत्र गवसले असले तरी शतकानु- शतके बैलांच्या सहाय्यानेच शेती होत आली आहे म्हणुन बैलाला एक आगळ वेगळ महत्व आहे.
सण – उत्सवाची परंपरां देशात आजही कायम आहे श्रावणी आमावस्येला होणारा बैलपोळा हा भारतीय सण परंपरेतील एक महत्वाचा दुआ ठरतो.
अन्नधान्य पिकविण्यात ज्याची मदत होत असते त्या बैला बाबत कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण महाराष्ट्राची खास ओळख आहे———– बघा–ना किती कित्ती विवीधता पुर्ण आहे– आदल्या दिवशी बैलानां आवतन त्यानंतर पाणवठयावर नेवुन अंघोळ मग त्याच्या खांद्याला तूप -हळदीने खांदेमळणी यानंतर पाठीवर नक्षीकाम असणारी झूल शिंगाना बेगड गळयात घुंगरांच्या माळा तर कधी घंटा सजलेल्या बैलांना मग पुरण पोळीच नैवेद्य…मग सहा वाजता गावातील सर्व बैलजोडया वेशीजवळ तोरणाखाली एकत्र आणली जातात आणि मग सुरु होतात. खतरनाक झडत्या—- मानकाऱ्यांचा बैल समोर ठेवून ‘पोळा’ फुटतो मग चालू होते ती वाजंत्री, ढोल-ताशे, सनई मिरवणूक.————–जो बैलानं सगौपन करतो चारापाणी करतो वर्षभर बैलाचा सांभाळ करतो म्हणजे बैलाचा बोजा उचलतो म्हणून त्याला पोळ्याच्या दिवसी सन्मानाने पैसे दिल्या जाते त्याला बोजारा म्हणतात मग घरची बाई दारात येवुन बैलाचे पाय धुवुन टिका पुजा करते आरती ओवाळली जाते पुरणपोळी चा गोड घास भरविल्या जातो कारण घरच वैभव बैला मुळच असत आरती करुन माणुस गडयाला पैसे (बोजारा ) देण्याची पध्दत ग्रामीण भागात आजही सुरु आहे. राज्यात सर्वच गावांमध्ये हा बैलपोळा साजरा होतो ज्यांच्या घरी बैल नाहीत अशा घरात मातीचे बैल बनवुन पूजेसाठी वापरली जातात पोळयाच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्हा पोळा भरतो लहान मुलांच्या हाती लाकडी बैल मातीचे बैल– सांस्कृतिक जलसा जोपासल्या जातो काही ठिकाणी स्पर्धा होते याला बाळपोळा तर कुठे तान्हा म्हणतात. यात उत्तमसजावटीसाठी बक्षीसे देखील दिली जातात. बैलपोळा म्हणजे निसर्ग आणि मानवाचा पक्का ऋुणाणुबंध
काही वर्षांपूर्वी शेतीची कामे बैलांच्या मदतीने व्हायची शेताला पाणी देण्यासाठी बैलांचा वापर व्हायचा. चामडयापासून तयार केलेल्या पखालीने विहिरीतून पाणी खेचण्याचे काम बैलांच्या मदतीने केले जाई .हे पर्यावरण पूरक होते. यातून भूजल साठा*मर्यादीत प्रमाणातच वापरला जायचा.
बदलल्या काळा नंतर विंधन विहीरी आणि शेती पंपांनी उपसा सुरु झाला आणि भूजल साठा रिता होत गेला. आजही बैलांच्या माध्यमातून शेतीचा पर्याय वापरला गेला तर सर्वांचेच भले होणार यात शंका नाही पण यंत्रशक्ती हि विकसित करावी लागेल पण शेतकऱ्याचा हा सखा बैल आजही मोलाचा आहे म्हणुन पोळयाचा सण शेतकराॅसाठीच नाही तर जगासाठी श्रमाच महत्व पटवुन देणारा सण आहे.

✍️ रवी दलाल
9960627818
आय यु डि पी काॅलनी ‌‌
काटोल

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!