आरक्षण इसलीए नही है की, एकलव्य कमजोर है |आरक्षण इसलीए है की, द्रोणाचार्य धोकेबाज है ||
प्रा. डॉ.आर.जे. इंगोले
आज आपल्या देशात आणि राज्यात एक विषय फार जोरात चर्चेत आहे आणि तो म्हणजे आरक्षण किंवा राखीव जागा आता हा विषय राज्यात अनेक जाती समूहाचे लोक पुढे घेऊन येत आहेत. जे आपल्या देशात ओबीसी आहेत त्यांचे म्हणणे आहे की, मराठा समाजाला ओबीसीत राखीव जागा देऊ नका तर मराठा म्हणतात की, आम्हाला ओबीसीत आरक्षण पाहिजे तर दुसर्या बाजूला सुप्रीम कोर्टाने आताच 2024 ला एक निर्णय दिला आहे की, एस.सी. या प्रवर्गात उपविभाग निर्माण केले आहेत तर तिकडे आदिवासी म्हणतात की, आमच्याकडे कांही जाती या आदिवासी नाहीत पण त्या अनुसूचीत जमाती (ST) या प्रवर्गाचे फायदे घेत आहेत त्यांचा शोध घ्या असे अनेक प्रश्न आज आरक्षण संदर्भात आहेत. पण यात मूळ बाब आरक्षण किंवा राखीव जागा निर्माण करण्याचा घटनाकारांचा मूळ उद्देश काय होता, याचा विचार मात्र मुळात कोणी करायला तयार नाही. मी कांही कायद्याचा अभ्यासक नाही पण जेंव्हा या मागण्या पाहतो आणि लोकांचे आरक्षण संदर्भात विचार ऐकल्यावर असे वाटले की, आरक्षण बाबत साधारण माहिती सुद्धा बर्याच लोकांना नाही. आज शिक्षित लोक सुद्धा आज म्हणतात की, “ आमचा जास्त मार्क असणारा मुलगा आरक्षण नसल्यामुळे नौकरीला लागला नाही आणि दूसरा मागासवर्गीय मुलगा कमी मार्क असतांना लागला. आता यात एक आहे की, सत्य बाब कमी लोकांना माहीत आहे की, ओपन आणि राखीव यात किती गुणांचे अंतर आहे हे जर आपण सत्य पाहिले तर फरक फार कमी आहे पण जाती जातीत तेढ निर्माण करण्यासाठी हे एक षडयंत्र अनेक वर्षापासून निर्माण केले आहे. आणि जो कांही फरक असेल तर त्याचे मूळ कारण जे आहे ते या ओपन प्रवर्गात असणार्या लोकांना माहीत नाही आणि वर वरचा अभ्यास किंवा समज घेऊन हे विश्लेषण करतात. राखीव जागा असल्यामुळे रोजगार मिळतो आणि आम्हाला का मिळत नाही ही समज मुळात चुकीची आहे. कारण आरक्षण हा रोजगार निर्मिती करणारा कार्यक्रम नाही हे पहिले या लोकांनी समजून घेतले पाहिजे. आता हे आपल्या महाराष्ट्रातील अनेक अभ्यासक आणि विद्वान लोकांनी सांगितले आहे पण आता ते वाचणार आणि ऐकणार कोण ? हा प्रश्न आहे. आपल्याला फक्त कोणीतरी एक अफवा सोडतो आणि त्यावर चर्चा करण्याची सवय आहे. आणि अशा अफवा सोडणारे लोक हे पूर्वग्रहदूषित असतात हे आपणास समजले पाहिजे. अनेक वर्षापासून एक अफवा समाजात पसरली आहे की, भारताची राज्यघटना तयार करताना अनेक सदस्य होते आणि त्यामुळे एकटया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान निर्माण केले आहे हे यांना मान्य नाही. आता हे सुद्धा समाजात फुट पडणारे षडयंत्र आहे हेच यांना माहीत नाही. एक तर मूळ मुद्दा असा आहे की, अशा लोकांना घटना समिती आणि मसुदा समिती यातला फरक माहीत नाही दूसरा मसुदा समितीत किती सदस्य होते आणि प्रत्यक्ष किती लोकांनी काम केले आहे आणि इतर लोक का येत नव्हते याची काहीच माहिती नाही. आता पुन्हा एक जरा स्पष्टच बोलायचे तर जे लोक असे म्हणतात की, भारताचे संविधान एकटया डॉ. बाबासाहेबांनी लिहले नाही परंतु त्यांना हे माहीत नाही की, हे टीका करणारे लोक ज्या जाती आणि धर्मातून ते येतात त्याचा जाती आणि धर्माचे विद्वान लोक हे मान्य करतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच भारताचे संविधान लिहले आहे आणि ते आज जगातील सर्व संविधानात प्रथम दर्जाचे आहे. जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांना असे वाटते की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या देशात जन्माला यायला पाहिजे होते. पण आपल्या देशातील अनेक जातीयवादी लोकांना वाटते की, डॉ. बाबासाहेब आपल्या देशात जन्माला येऊन त्यांनी आपले नुकसान केले. विशेष म्हणजे यात असे सुद्धा लोक आहेत की, बाबासाहेबांनी यांचा उद्धार केला आहे पण त्यांना याचा अभ्यास नाही याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आपल्या देशातील ओबीसी आहेत. म्हणजे ज्या समाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मले त्या समाजाच्या अगोदर 340 हे कलम बाबासाहेबांनी ओबीसीसाठी आणि मग एस.सी साठी 341 टाकले. याचा अर्थ त्यांना किती काळजी होती या ओबीसी वर्गाची जो भारतातील एक मोठा वर्ग आहे म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या 50%पेक्षा जास्त आहे पण आज तोच वर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारा विरोधी गटात काम करतो आहे आणि सत्य महितीचा अभ्यास करीत नाहीत. आता आपण राखीव जागा संविधानात निर्माण करण्यामागचा खरा घटनाकरांचा उद्देश काय होता आणि आज आपल्या समाजात याबद्दल द्वेष का निर्माण झाला ? याचा विचार करणार आहोत जो या लेखाचा मुख्य उद्देश आहे. भारतीय संविधानाने एका गांवकुसाबाहेर असणार्या मोठया समूहाला शिक्षण आणि नौकर्यामध्ये संधी मिळाली तसेच समाजात समानतेने राहण्याची एक माणूस म्हणून समान संधी मिळाली आणि मग आपल्या समाजातील कांही लोकांना हे सहन झाले नाही. म्हणजे ही एक मनूवादी मानसिकता आहे. आणि त्यामुळे हे कसे पुढे जातात मग आम्हाला सुद्धा आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी पुढे आली. आज तर देशात सर्वत मोठा विषय राखीव जागा आणि त्या या सर्वांना कशा दिल्या पाहिजे हा सरकार समोरचा सर्वत मोठा प्रश्न आहे. राखीव जागा या आपल्या समाजात पिढया न पिढया ज्या एका वंचित समाजघटकाला विकासापासून जाणीवपूर्वक दूर ठेवल्या गेले त्यांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती मग जो एक मोठा प्रगतीचा मूल-मंत्र आहे तोच घेण्याची परवानगी नव्हती तर मग हा समाज कसा पुढे जाणार आहे ? मग अशा समाजघटकांना पुढे जाण्यासाठी त्यांना शिक्षण आणि नौकर्यात राखीव जागा मिळाल्या पाहिजेत अशी तरतूद घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. आणि मग 1950 ला भारतात संविधान लागू झाले आणि मग हा पिढया न पिढया मागे असलेला समहू शिक्षण आणि नौकर्यामुळे प्रगती करू लागला. 60-70 च्या दशकातील पहिली पिढी शिक्षण घेऊ लागली आणि एक अनुसूचीत जाती आणि मग अनुसूचीत जमाती आणि इतर मागासवर्ग हे अधिकारी पदावर जाऊ लागले आणि नेमके हेच या उच्च वर्णीय लोकांना सहन झाले नाही. तसे भारतीय संविधानानुसार यांना उच्च वर्णीय म्हणता येत नाही पण आता ते समजतात यामुळे आपण तसा उल्लेख करतो आहोत. याचे मूळ मनुस्मृतीत आहे. 1870 ते 1880 मध्ये मनूस्मृती जाळून टाकावी असे मत राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी व्यक्त केले होते आणि पुढे त्यांचे शिष्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही मनूस्मृती 1927 ला जाळली त्या प्रसंगी माहमानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “ मनूस्मृती हा देशातल्या शूद्र –अतिशूद्र समाजाला गुणवान व्हायला बंदी घालणारा दस्तऐवज आहे.” आणि त्यामुळे तो जाळणे आवश्यक होता. आणि पुढे एका पेनाच्या झटक्यात 1950 ला इथून पुढे मागील सर्व कायदे रद्द होतील असे स्पष्ट केले. आणि हा हजारो व्होल्टचा झटका इथल्या मनुवादी मानसिकता असणार्या लोकांना लागला. आणि मनुवादी मानसिकतेचे बळी मग आपल्या समाजातील अनेक बहूजन झाले आहेत. आर.एस.एस. ला मनूस्मृती वंदनीय आहे आणि त्यांचे मुखपत्र विचारधन यामध्ये गोलवलकर गुरुजी म्हणतात की, “ चातुर्वर्ण्य व्यवस्था ही ईश्वर निर्मित आहे.” आणि नेमका हाच अर्थ घेऊन अनेक बहुजन तेच मान्य करायला लागले. पण ही एक भटांची धूर्त चाल आहे ही मात्र यांना आजपर्यंत समजले नाही. वर्णव्यवस्थेचा एक मोठा दोष आहे की, यामध्ये कोणीतरी कोणापेक्षा मोठा असतो आणि त्यामुळे एक वर्ण आपल्या खाली आहे याचेच त्याला समाधान वाटते. पण आपण कोणापेक्षा वर आहोत याच भ्रमात तो एक वर्ण जगत असतो, पण सर्वात वर जो ब्राम्हण वर्ग आहे त्याने हे सर्व निर्माण केले आहे आणि त्या ब्राम्हण वर्गाला सुरक्षित राहण्यासाठी हे सर्व चालले आहे हे मात्र आमच्याच बहुजन वर्गाला माहीत नाही. आणि त्यामुळे आज सुद्धा ब्राम्हण वर्गाचे वर्चस्व इतर वर्गाला मान्य आहे. त्यामुळे यांचे कोणतेच विधी ब्राम्हणाशिवाय आज सुद्धा होत नाहीत. 2005 ला सिंधखेड राजा येथे राष्ट्रमता जिजाऊ जन्मउत्सव साजरा केला आणि त्यामध्ये मराठा समाजाला आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब , डॉ. आ. ह. साळुंखे साहेब आणि इतर अनेक पुरोगामी कार्यकर्ते होते यांनी शिवधर्म हा एक नविन विचारधारा असणारा धर्म स्थापन केला. पण आपल्या बहुजन मराठा बांधवांना तो पटला नाही. यात सर्व धार्मिक आणि वयक्तिक विधी कसे करावे याचे मार्गदर्शन शिवधर्मात आहे . महाराष्ट्रत ते एक मोठे क्रांतिकारी पाऊल होते. पण आपल्या बहुजन समाजाच्या डोक्यातून मनूस्मृती जात नाही आणि त्यामुळे जातीयव्यस्था असणारी मानसिकता तोपर्यंत जाणार नाही. आणि हेच राखीव जागांना विरोध करण्याचे कारण आहे.
“ वर्णव्यवस्था ही जिना नसलेली इमारत आहे.” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे. आणि मग या व्यवस्थेत आपल्यापेक्षा खाली असणारा आपल्या बरोबर येऊ नये अशी मानसिकता असते. कारण ही व्यवस्था कर्मावर किंवा बुद्धीवर आधारित नाही तर जन्मावर आधारित आहे. मनुवादी मानसिकता असणार्या लोकांना मग ते आपल्या जाती व्यवस्थेत कोणी असू द्या त्यांना आपल्यापेक्षा पुढे किंवा आपल्या बरोबर कोणी आलेला चालणार नाही. “ जातींनिर्मूलन ” या महत्वपूर्ण ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “ खरं म्हणजे शंकराचार्य ही व्यवस्थाच मुळात नष्ट केली पाहिजे. कारण एखाद्या व्यक्तीला इंजिनीअर व्हायचे असेल तर त्याला विशिष्ट प्रकारचे शिक्षण घ्यावे लागते. डॉक्टर किंवा इंजिनीअर यांच्या व्यवसायाची नीती असते,मूल्य असतात ,व्यवसायाची काही बांधिलकी असते ती पाळावी लागते. परंतु बाबासाहेब म्हणतात शंकराचार्याच्या बाबतीत मात्र अशी कोणतीही परिक्षा नाही. किंवा गुणवत्तेची अशी कुठलीही अट नाही, कुठलाही अभ्यासक्रम नाही. पुढे बाबासाहेब म्हणतात. शंकराचार्य होण्यासाठी एकच मेरीट लागतं तो म्हणजे तो माणूस ब्राम्हण असला पाहिजे. ब्राम्हण आणि ब्राम्हण्य याबाबत एक गोष्ट कधीही विसरता कामा नये, ती अशी की मराठा ब्राम्हण्याग्रस्त असू शकतो , धनगर ,माळी ,तेली ,कुणबी हे सुद्धा ब्राम्हण्यग्रस्त असू शकतात म्हणून त्यांना शंकराचार्य होण्याचा मान मिळू शकत नाही. तो अधिकार कोणत्या वृत्तीचा आहे यावर अवलंबून नसून कोणत्या जातीचा आहे यावर अवलंबून आहे. मनूस्मृतीचा आदेश आहे की, या देशातील ब्राम्हणाची नांवे सन्मानदर्शक असली पाहिजे तर दुसरीकडे हीच मनूस्मृती सांगते की, शुद्रांची नांवे निंदादर्शक असली पाहिजे. जातीव्यवस्था असे सांगते की, जर मराठा असेल तर त्यांना इतर कोणी कितीही बुद्धिमान असला तरी बौद्ध ,मातंग , चांभार ,कुंभार ,तेली ,धनगर ,माळी ,आदिवासी हे आपल्या समान नको आहेत तर आपल्या पुढे गेले तर मग तर यांना डोळ्यात खडयासारखे खुपतात. आणि हे त्यांच्या मानसिकतेत असल्यामुळे मग ते म्हणतात की, राखीव जागामुळे गुणवत्ता कमी होते. मग आता मराठा जर ओबीसीत आला तर गुणवत्ता कमी होणार नाही का ? पण आरक्षण हे रोजगार मिळविण्याचे साधन नाही तर समानता प्रस्थापित करण्याचा एक संवैधानिक मार्ग आहे. आणि यावर घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना निर्माण होण्यापूर्वीच सायमन कमिशन पुढे साक्ष देतांना हा मुद्दा स्पष्ट केला होता. सायमन कमिशनला साक्ष देतांना त्याकाळात काही लोकांनी जातीसाठी प्रतींनिधीची मागणी करणे हे विषमता निर्माण करणे आहे असा आक्षेप घेतला होता त्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की, “ समतावाद्यांचे ध्येय हे काय आहे हेच विरोधकांना समजले नाही असे मला वाटते, आणि पुढे ते म्हणतात की, समतावादयांचे ध्येय हे सर्वांना समानतेने वागवणे नसून समता प्रस्थापित करणे हे आहे.” आता या डॉ. बाबासाहेबांच्या वाक्यात सर्व काही आले की, आरक्षण काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा आरक्षण धोरण दुसरे कोण समजू शकते ? आता यातील अर्थ समजून घेताना जो कोणी अभ्यासक आहे त्याला एक तर यावर जास्त चिंतन करावे लागेल आणि दुसरे म्हणजे तो व्यक्ती समानता मानणारा असला पाहिजे. जर त्याच्या डोक्यात मनुवादी विचार असतील तर मग त्याला हे पटणार नाही. आणि आपल्या देशात आज तेच होत आहे सर्व लोकांच्या डोक्यात मनुवाद आहे आणि ते आरक्षण समजून घ्यायला निघाले आहेत ते त्यांना कधीच समजणार नाही. कारण एखाद्याला संधी दिली तर तो त्यांच्या बुद्धीच्या जोरावर पुढे जाऊ शकतो आणि सर्वात मोठया पदावर जाऊन काम करू शकतो हे मान्य करावे लागेल आणि याचे उदाहरण स्वत: संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. जेंव्हा भारताचे संविधान तयार करण्याची वेळ आली तेंव्हा त्याकाळातील अनेक नेत्यांची इच्छा नसतांना सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्षपद द्यावे लागले. आणि मसुदा समितीतील इतर 6 सदस्य सतत काहीतरी कारणामुळे गैरहजर राहत असत. आणि डॉ. बाबासाहेबांनी काही शारीरिक व्याधी असतांना सुद्धा 18-18 तास बसून हे काम पूर्ण केले आहे आणि त्यामुळे त्यांना भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणतात. पण ज्यांना घटनेच्या निर्मितीचा इतिहास माहीत नाही आणि त्यामुळे त्यांना हे आज सुद्धा मान्य होत नाही आणि यावर कहर म्हणजे ज्यांच्यासाठी 340 कलम पहिले घटनेत टाकले त्या ओबीसीत असणार्या अनेक जातींना हे मान्य होत नाही. आता आता काही ओबीसी जागृत होत आहेत पण आणखी बरेच ओबीसी आर.एस.एस. मध्ये तन-मन-आणि धनाने काम करतात याचे जास्त वाईट वाटते. आज देशात बरेच लोक या ओबीसींना जागृत करण्याचे काम करीत आहेत त्यांना सलाम आहे. रथयात्रा काढली तेंव्हा त्यात सर्वात मोठा सहभाग ओबीसीचा होता पण त्यांना हे माहीत नव्हते की, ही रथयात्रा मंडल कमिशन विरोधात आहे. कारण माजी प्रधानमंत्री अटलबिहारी यांचे वाक्य होते की, “ तुम मंडल निकलोगे तो हम कमंडल निकालेंगे.” आता एवढे स्पष्ट सांगितल्यावर जर ओबीसींना समजत नसेल तर मग आता समाज काय करणार आहे ? आणि त्यामुळे आपल्या भारतीय समाजात प्रत्येक जाती आणि धर्माच्या लोकांनी प्रथम हे नीट समजून घेतले पाहिजे की, ज्या समूहाला अनेक पिढयापासून संधीच मिळाली नाही त्यांना थोडी सवलत देऊन आपल्या समान आणणे हे गरजेचे आहे. ते म्हणतात ना “ पाण्यातील मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे.” म्हणजे आपण समाजातील प्रत्येक समस्या समजून घ्यायची असेल तर आपण त्यांच्या जागी असतो तर काय झाले असते याचा विचार करा म्हणजे सर्व समस्या समजेल. भारतीय समाजव्यवस्थेने जो अन्याय अत्याचार केला त्यांना जनावरापेक्षा सुद्धा तुच्छ वागणूक दिली आणि आज सुद्धा मानसिकता बदलली नाही. आज सुद्धा एका IPS असणार्या व्यक्तीला लग्नात घोडयावर मिरवणूक काढतांना पोलिस संरक्षण घ्यावे लागत असेल तर मग समान्य माणसाचे काय ? म्हणजे सामाजिक विषमता कायम आहे आणि आरक्षण दिले तर पोटात दुखते मग पहिले जातीयवाद संपवा आणि नंतर आरक्षण संपले तरी हरकत नाही. आणि जातीयवाद सापविणे ही जबाबदारी उच्चवर्णीय लोकांची आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.
आता ज्या जातींना आरक्षण नाही आणि त्यांना आज आरक्षण पाहिजे आहे ते म्हणतात की, सर्वांना समानतेने वागवा पण यांना हे माहीत नाही की, जर मुळात आपल्या समाजात अनेक बाबतीत समानता नाही तर त्यांना समानतेने कसे वागवता येईल ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की, “ स्पृश्य आणि अस्पृश्य याबाबतीत कोणत्याही प्रकारची समानता नाही हे उघड आहे शिक्षण ,संपत्ती व लोकसंख्या याबाबतीत या दोन्ही वर्गात जमीन आसमानचे अंतर आहे.” मग अशा असमान वर्गाच्या बाबतीत समानतेने वागायचे ठरले तर कसे शक्य आहे.? आपणास कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांनी घोडयांचे दिलेले उदाहरण आपणास चांगले ठाऊक आहे. मग ते तर छ्त्रपती होते मग त्यांनी 1901 ला कोल्हापूर संस्थानात 50% आरक्षण लागू केले ते का केले असेल याचा विचार आज आरक्षणाला विरोध करणार्या लोकांनी करावा. प्रवाहाच्या बाहेर असणार्या लोकांना प्रवाहात आणणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि आता सर्वात महत्वाची बाब म्हणजे आरक्षण मिळत नाही म्हणून आम्हाला नौकर्या नाहीत अशी जी ओरड सुरू आहे यात काहीच तथ्य नाही. आपल्या देशात ज्या जागा भरल्या गेल्या त्यात पुन्हा महत्वाच्या पदावर म्हणजे न्यायाधीश , जिल्हा पोलिस प्रमुख आणि जिल्हा अधिकारी आणि अशा अनेक महत्वाच्या पदावर ब्राम्हण जास्त प्रमाणात आहेत आणि आपले बहुजन शिक्षक, क्लार्क आणि शिपाई आहेत तसेच पोलिस शिपाई आणि सैन्यात आहेत म्हणजे जिथे पगार कमी आणि जोखीम जास्त आहे तिथे आपले बहुजन आहेत आणि जिथे जोखीम कमी आणि पगार जास्त आहे तिथे ब्राम्हण जास्त आहेत ही देशातील आकडेवारी आहे. एस.एसी ,एस.एसटी आणि इतर मागासवर्गीय लोक आपल्या नगरपालिका आणि महापालिका यात सफाई कामगार जास्त आहेत आणि सर्वात कमी म्हणजे आदिवासी समाजाचा बॅकलोग आहे. त्यांना आणखी सत्तर वर्षात शिक्षण आणि इतर सुविधा सरकारने पुरविल्याच नाहीत. त्यांचा विचार मात्र कोणीच करीत नाहीत आणि उलट अनेक नकली आदिवासी प्रमाणपत्र घेऊन नौकर्या आणि राजकरणात लोक येत आहेत. पण आदिवासी आज सुद्धा अर्धनग्न आणि उपाशी आहे त्यांच्याकडे कोणाचे लक्ष नाही. आणि इकडे 10-20 लाखाच्या गाडयात मोर्चे काढून मराठा आरक्षण मागत आहेत. आपण थोडा आपल्या आदिवासी बांधवांचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणखी काही भटके समाज आहेत त्यांना आपण VJNT म्हणतो त्यांना सुद्धा घर नाही, रेशनकार्ड नाही पण त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. विचार करा यांच्या अनेक पिढया अभावग्रस्त जीवन जगत आले आहेत. आज तरी त्यांना काही चांगले दिवस येतील याचा विचार समाज आणि सरकारने करावा. आणि ब्राम्हण मात्र आपल्या समाजातील सर्व लोक हे आपसात संघर्ष करीत राहिले पाहिजे आणि हे सर्व आर्थिक ,राजकीय आणि सामाजिक फायदे ब्राम्हण घेत आहेत. ही ब्राम्हण पॉलिसी आहे म्हणजे ओबोसींना निवडणुका आल्या की, हिंदू करतात आणि ओबीसीना आरक्षण देण्याची वेळ आली की, त्यांना गुणवत्ता कमी आहे असे म्हणायचे याला काय म्हणावे ? पण या जाळ्यात ओबोसी अडकतो कारण त्याला हिंदू नांवाचे एक इंजेक्शन दिले जाते याची गुंगी ओबीसीला येते. आज सुद्धा तेच होत आहे एवढा मोठा वर्ग देशात ओबीसी आहे पण त्याला त्याच्या सामर्थ्याची जाणीव नाही. मा. कांशीराम साहेब ओबीसीला हत्ती म्हणत असत ते म्हणत की, “ ओबीसी हत्ती है उसने थोडी करवट बदली तो सत्ता को हिला देता है और अगर हत्ती चलने लगा तो पुरी सत्ता पलट जायगी|” याचा अर्थ आजपर्यंत आपल्या ओबीसी बांधवाचा विचार या ब्राम्हणी व्यवस्थेने केला नाही असाच अर्थ होतो. आमचे मित्र प्रेमानंद बनसोड असे म्हणतात की,
एकलव्याचा अंगठा कापल्याशिवाय , अर्जुनाला मोठं होता येत नाही
ढसाळाला जोडल्याशिवाय ढालेला तोडता येत नाही, प्रत्येक निवडणुकीत असच होत असतं
शिका आमचा आणि मत त्यांचं असतय ,कष्टाचे धनी आम्ही आणि मलिदा तिसरच खातय.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत