महा विकास आघाडी ,,, महायुती सत्ता स्पर्धेत भावनिक तेची लाट कशासाठी?
ऍड अविनाश टी काले अकलूज
9960178213
राजकारणात सत्ता हस्तगत करण्यासाठी , राजकारणात टिकण्या साठी , अनेक डावपेच आखले जातात त्यात भावनिकता हा एक भाग असतोच असतो .
मनुष्य हा जसा समाजशील प्राणी आहे तसाच तो भावनाशील ही आहे ,
आपले गाव , आपला तालुका , आपला जिल्हा आपले राष्ट्र या प्रति प्रेम अभिमान असतो तसाच तो अभिमान आपली जात , आपला धर्म आपली श्रद्धा यावर ही असतो ,
यात प्रत्येकाचे स्वतः शी नाते असणारा आपला म्हणून एक नेता ही असतो , आणि हा नेता सर्व व्यापी , सर्व स्वीकृत लोकमान्य लोकनायक व्हावा ही इच्छा ही त्या प्रत्येकाची असते , तो नेता ज्या पक्षात असेल किंवा त्यांचा जो पक्ष असेल त्याचे शी या व्यक्तीचे किंवा व्यक्ती समूहाचे नाते जुळलेले असते , ते नाते अधिक दृढ व्हावे म्हणून जी वैचारिक मांडणी केली जाते त्या मांडणीला भावनिक ता ही जोडलेली असतेच असते.
हे आपण उदाहरण म्हणून पाहू
महा युतीतील भाजपा आणि एकनाथ जी शिंदे यांची शिवसेना ही हिंदुत्वाशी निगडित आहे .
तर काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस ही गांधी वादी समाजवाद याचे शी निगडित आहे ,
सत्ता स्पर्धेच्या लढाई मुळे भाजपा पासून विभक्त झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिव सेनेचे हिंदुत्व हे आत्ता प्रबोधन कार ठाकरे यांच्या दिशेने वाटचाल करत असून या सोबत महाराष्ट्र धर्म नावाची भावनिक गोष्ट त्यांनी जोडलेली आहे .
याच सत्ता संघर्षात जेंव्हा अधिकची वाढ झाली तेंव्हा या राजकारणाचा केंद्र बिंदू हा जात वर्ग म्हणून उभा केला गेला .
महाराष्ट्रात ब्राम्हणी सत्तेला शह देण्यासाठी इतिहासातील प्रतीकांचा आधार घेतला गेला .
ज्या अणाजी पंत यांनी छत्रपती संभाजी राजे यांना डावलून राजाराम महाराज यांना छत्रपती बनवण्याचा घाट घातला त्यास अधिक बळ देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करण्याचे ठरवले या सर्व बाबी राज द्रोह म्हणून त्यांना हत्तीच्या पायी देण्यात आले .
तो इतिहासातील किस्सा आहे , ती सत्ता खुद्द आणाजी पंत यांचे साठी होती का? छत्रपती चे घराण्यातील फुटी मुळे या दोन विभाजन कारी भेगा निर्माण झाल्या , पण खलनायक ठरले ते अनाजी पंत ,,,,!
200वर्षा पूर्वी छत्रपती शिवरायांची समाधी ही काळाच्या नजरेआड करण्याचे पाप महाराष्ट्रीयन माणसाने घडवले , ती समाधी महात्मा फुले यांनी शोधली , आणि त्या नंतर इतिहास संशोधन करून इतिहासाच्या मांडणी करण्यात आली ,
या इतिहासातील मांडणीचा आपल्याला सोयीचा ठरेल असाच इतिहास घेऊन ब्राम्हणी सत्तेचे वाहक प्रमुख या नात्याने देवेंद्र जी फडणवीस यांना अनाजी पंत ठरवण्यात आले , आणि त्यांच्या राजकीय स्पर्धा आणि कुट निती ला षडयंत्रकारी ठरवून त्यांची प्रतिमा धूसर करण्यात आली.
भारत एकसंघ देश आहे , आणि या देशातील केंद्रीय सरकार ही सर्वोच्य शक्ती आहे ,
देश पातळी वरील पक्ष आणि राज्य पातळीवरील पक्ष यांच्यात मूलभूत फरक हाच असतो की , प्रादेशिक भाषा , प्रादेशिक अभिमान , याचा कठोर असा आग्रह प्रादेशिक पक्षांना धरता येतो , तसा तो देशव्यापी पक्षा साठी धूसर होत जातो , सर्व राज्यासाठी त्यांना समान धोरण आखावे लागते .
आपल्या कडे छत्रपतींच्या इतिहासाला वळवून महाराष्ट्र हा दिल्ली तख्त पुढे झुकणार नाही असा नारा दिला जातो , आणि आपण आजचे संदर्भ इतिहासातील औरंगजेब आणि छत्रपती शिवराय यांच्या भेटी शी जोडून पाहतो .
हे सर्वस्वी चुकीचे आहे ,
केंद्रातील सरकार हे औरंगजेबाचे सरकार नसते , आणि महाराष्ट्रातील राज्यकर्ते हे छत्रपती नसतात हे आपण समजून घेतले पाहिजे
आपण बऱ्याच वेळा महा युती सरकार वर ते गुजरात धार्जिणे सरकार असल्याची , गुजरात मध्ये उद्योग पळवल्याचे आरोप केले जाताना पाहतो .
यातील कारणाचा शोध आपण कधी महाराष्ट्रीयन म्हणून केला आहे काय? गुजरात सरकारने प बंगाल मध्ये टाटा च्या सिंगूर येथील कार उत्पादनाला अडथळे आणि विरोध केल्या नंतर त्या उद्योगा साठी गुजरात सरकारने आपले महाद्वार उघडले ,
गुजराथी माणूस हा व्यापारी वृत्तीचा आहे ,
या उलट आपला इतिहास आहे , एनरॉन प्रकल्प ते डावू प्रकल्पाला आपणच विरोध केला ,
इथे आलेल्या उद्योजकांनी फक्त मराठीच बोलावी ,, अश्या ही सक्ती लादण्यात आपल्याला अभिमान आणि गर्व वाटला ,
अगदी म्हसवड माळशिरस तालुक्याचा कायापालट घडवू शकेल अश्या एम आय डी सी कॉरिडॉर निर्मिती साठी ही माळा वरची ही जमीन न देण्याची मानसिकता अस्तित्वात असेल तर उद्योग तरी कसे उभारणार?
आपल्याला संधी पेक्षा संघर्षात मौज वाटते , आणि या सर्व बाबी ह्या राजकीय कुरघोडी चां नित्य व्यवहार बनलेल्या आहेत .
आपण मतदार व कार्यकर्ते म्हणून इतकंच करायचे आहे ,
की महा युती व महाविकास आघाडी यातील संघर्ष हा राजकीय संघर्ष आहे हे समजून घ्यायचे आहे ,
त्या साठी त्यांनी टाकलेले डाव प्रति डाव हे राजकीय सत्ता कारण या साठी असतात हे समजून घ्यायचे आहे
महा विकास आघाडीची सत्ता आली तरच आपल्या सर्वांचा उद्धार होईल व महायुती ची सत्ता आली तर आपण सारे बुडून जाऊ हा ही भ्रम बाजूला सारायचा आहे ,
जुन्या पिढीतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे , व त्यांचे समकालीन असणारे पवार साहेब यांच्या सारखे नेते हे महाराष्ट्राचे आयकॉन आहेत हे जाणून घ्यायचे आहे ,
आत्ता चे घडीला पवार साहेबांना त्यांच्या पक्षाचे व घराचे व्यवस्थापन करायचे आहे व राजकीय वारसदार ही ठरवायचां आहे , हे लक्षात घेतलं की ते कुणाला बाजूला सारणार ? याचे उत्तर मिळते ,
35ते 40 वर्ष राजकारणात राहिलेल्या ना असे बाजूला सारता येऊ शकते का? आणि असे होत असताना त्या व्यक्तीने पूर्णतः शरणागती स्विकारावी अशी आपण अपेक्षा करणारे कोण?
म्हणून भावनिक बनू नका ,
अंध मतदार बनण्या पेक्षा डोळस व जागृत मतदार बना ,,
असे एकदा तुम्ही बनले की आपोआप चिकित्सक व्हाल ,,
व राजकीय आखाड्यातील डावपेच तटस्थपणे पाहण्याची दृष्टी विकसित होईल , व तीच लोकशाही साठी आवश्यक असते ,
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत