नळदुर्ग शहरात एकता आणि बंधु भावाने सन उत्सव साजरे व्हावेत

:- – डॉ निलेश देशमुख
नळदुर्ग येथे पोलीस ठाण्यात गणेश उत्सव व ईद ए मिलाद उत्सवा निमीत्त शांतता कमेटीची बैठक संपन्न
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे या सारख्या शहरात हिंदू व मुस्लिम बांधवानी एकत्र येऊन समता आणि एकता बंधु भावाने दोन्ही ही सन साजरे झाले पाहिजे कारण नळदुर्ग शहराला खूप मोठा इतिहास आहे म्हणून नळदुर्गकरानी सर्वांना एकतेचा संदेश दाखवून द्यावा या मधुनच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आसे प्रतिपादन तुळजापूर येथील पोलीस उप विभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांनी केले .
नळदुर्ग येथे नुकतीच गणेश उत्सव व ईद ए मिलाद उत्सवा निमीत्त महत्वपूर्ण शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळेस ते बोलत होते .
यावेळी नळदुर्ग ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके उपस्थित होते ते पुढे म्हणाले
नळदुर्ग शहरातल्या टवाळखोर टोळक्यावर शिवाय मोटार सायकल स्वार पुंगळी काढली आसेल तर त्याची पुंगी वाजणार यामध्ये कॉलेज रोड रोड रोमियो व बस स्थानक परिसरात टवाळखोरी करणाऱ्या तरुणावर पोलीसांची करडी नजर राहणार आहे एम एस ई बी विभागाने दोन्ही उत्सवात शहरात कोणत्या भागात आडथळा निर्माण होतो त्या ठिकाणचा आडथाळा दुर करणे शिवाय नगर परिषदेने शहरातल्या दोन्ही उत्सवाना आडथाळा निर्माण होणारी रस्त्यावरील अतिक्रमणे दुर करणे या सोयी उपलब्ध करून दयाव्यात किल्ल्यातील पर्यंटकांवर कुठला ही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाणार
यावेळी माजी नगराध्यक्ष शहबाज काझी , माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दासकर , माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण , माजी नगर उपाध्यक्ष शफी भाई शेख
माजी नगरसेवक विनायक अहंकारी , शिवसनेचे संतोष पुदाले पत्रकार आयूब शेख पत्रकार शोएब काझी आदीनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी , माजी नगरसेवक इमाम शेख , माजी नगरसेवक बसवराज धरणे , सामाजिक कार्यकर्ते अजहर जागीरदार , जेष्ठ पत्रकार विलास येडगे , एम एस ई बी चे अभियंता दाऊत तगारे सह कर्मचारी , नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक खलील शेख , सरदारसिंग ठाकुर , ग्रामीण रुग्णालयाचे गजानन धावारे , शायन काझी , पत्रकार दादासाहेब बनसोडे , आबेद कुरेशी , इद ई मिलाद कमीटीचे अध्यक्ष नियमात हाफिज , शहा हुसेन इनामदार , सलीम दाऊद शेख ,
वजाहत काझी , बकर सालार , सलीम आयुब शेख , लिंबु दादा समीर राजेशा , आदील बागवान , अजहर शेख सह गणेश मंडळ व ईद ए मिलाद उत्सव कमीटीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त भैरवनाथ कानडे यांनी केले .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत