नेपाळची सिंहदरबार लायब्ररी जळत आहे

नेपाळची सिंहदरबार लायब्ररी जळत आहे ही बातमी पाहून मन सुन्न झालं. ह्या ग्रंथालयात चर्यापदासारखा ९ व्या शतकातला प्राचीन संग्रह, मध्ययुगीन साहित्यकारांची लिखाणं, आणि हिंदू-बौद्ध समाजाच्या आध्यात्मिक परंपरेचे हजारो वर्षं जुने अनेक ग्रंथ होते. ह्या घटनेकडे केवळ collateral damage म्हणून पाहता येणार नाही. सांस्कृतिक वारसा जळणे म्हणजे काय लेवलचा लॉस आहे हे शब्दांत किंवा आकड्यांत सांगता येणार नाही.
ही लायब्ररी माझ्या नेपाळ itinerary मध्ये होती. १२व्या शतकात झालेल्या अश्याच एका उठावानंतर ही भव्य लायब्ररी बांधली गेली होती. २०२५ च्या ‘GenZ’ उठावात हजारो वर्षं जपलेली स्मृती, अनेक पिढ्यांनी जतन केलेला वारसा, आणि आपल्या सामूहिक विचारविश्वाचा पाया पिसाळलेल्या गर्दीने काही तासांत राखेत कालवला.
इतिहासात असे प्रसंग वारंवार घडलेत – अफगाणिस्तान, युक्रेन आणि आता नेपाळ. संघर्ष पेटतो तेव्हा सर्वप्रथम जळतात ती ही soft targets. पण पुस्तकं, शिल्पं, कला ह्या समाजाचं soul असतात. आणि soul नष्ट केलं की काय अस्तित्व राहतं ?
मला हे सगळं इतकं वैयक्तिक का वाटतंय, याचं कारण एकच आहे: पुस्तकं, शिल्पं, चित्रं आणि ऐतिहासिक साधनं नष्ट होतात तेव्हा मला माझं आयुष्य शून्य वाटायला लागतं. मी ज्या संस्कृतीत जन्मलो, जीने साहित्य-संगीत-कला ह्या संस्कृतीच्या अविभाज्य अंगांबद्दल मला शिकवलं, ज्या ज्ञानपरंपरेतून मला स्वतःला घडवण्याची संधी मिळाली, ती राख होताना पाहणं असह्य आहे.
ह्या युवकांच्या संतापामागे नक्कीच कारणं असतील. अन्याय, बेरोजगारी, राजकीय ताण…. पण ‘मॉब जस्टिस’ हा कायम uncouth, barbaric आणि मूर्खपणाचा असतो. अशा हिंसेतून फक्त हानी जन्माला येते.
लायब्ररी जाळणं म्हणजे स्वतःच्या इतिहासालाच अग्नी देणं. आणि इतिहास राखेत गेला की भविष्य रिकामं होतं.
‘हे GenZ बिनडोक आहेत, त्यांना अभ्यासाची पुस्तकं वाचता येत नाहीत – प्राचीन ग्रंथांची त्यांना काय अक्कल असणार ?!’ हे म्हणणं फार सोपं आहे. ह्या जाळपोळ करणार्या झुंडीचं समर्थन होऊच शकत नाही, पण त्याचबरोबर मला असंही वाटतं की तितकीच चूक तिथल्या leadership ची आहे – ज्यांनी हे आपलं heritage आहे, आपल्यासाठी महत्वाचं आहे अशी मूल्यंच कधी समाजात instill केली नाहीत. असे अनेक व्हिडियोज येतायत की नेपाळच्या जाळपोळीत सगळे पर्यटकांना व्यवस्थित प्रोटेक्ट करत आहेत. कारण पर्यटक आपल्यासाठी महत्वाचे हे त्यांना कळतंय. हे पुस्तकांबाबत का नाही होऊ शकलं ?
आज नेपाळचं दु:ख पाहताना मला हे जाणवतंय की जगात कुठेही अशी घटना घडते तेव्हा तोटा आपल्या सर्वांचाच झालेला असतो.. कारण ज्ञानाला सीमा नसतात, संस्कृतीला राष्ट्रीयत्व नसतं आणि मॉबला डोकं.
-Nikhil Talegaonkar
महत्वाचे
🌹नमोबुध्दायमैत्रीपुर्ण जयभिम🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत