
दहावी उत्तीर्ण असलेल्या गरजू व होतकरू विध्यार्थ्यांसाठी एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत भरती सुरु असून दहावी उत्तीर्णांना येथे चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत हॅंडीमन आणि यूटिलिटी एजंटच्या एकूण 998 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. हँडीमनच्या एकूण 971 जागा असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
यूटिलिटी एजंट (पुरुष) च्या एकूण 20 तर यूटिलिटी एजंट (महिला) च्या एकूण 7 रिक्त जागा भरल्या जातील. यासाठी उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 21 हजार 330 रुपये पगार दिला जाणार आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 सप्टेंबर 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. एससी/एसटी पदासाठी 5 वर्षे तर ओबीसीसाठी 3 वर्षे सवलत देण्यात येणार आहे. जनरल/ओबीसी उमेदवारांकडून 500 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे. तर एससी/एसी/एक्स सर्व्हिसमनकडून कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 21 हजार 330 रुपये पगार दिला जाणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत