” व्यथा , भीमाच्या लेकरांची. !”
अरुण निकम
बाबा,
तुम्ही,
रंजल्या, गांजल्या, पिचलेल्या,
वेशीबाहेर टाकलेल्या,
समुचि बहिष्कृत समाजाला,
उत्कर्षाच्या वाटेवर नेताना,
पोटाला चिमटा काढीत,
अठरा अठरा तास अभ्यास करीत,
मूकनायक ते प्रबुद्ध भारत,
चवदार तळे ते काळाराम सत्याग्रह,
संविधान निर्मिती, ते हिंदू कोड बिल,
तहहयात क्षण न क्षण झिजलात,
प्रसंगी पोटच्या पोराचे कलेवर पडले
असतानाही तुम्ही,
दुर्लक्षितांच्या व्यथा मांडण्यासाठी,
हजेरी लावली, गोलमेज परिषदेला,
टेकता गांधीजी मरणाला,
दिला दुजोरा पुणे कराराला,
करून विचार गोर गरिबांचा,
आणि पेटवला स्फुलिंग स्वाभिमानाचा,
अन केले उभे समतेच्या परिघात.!
दिलीत जाणीव करून,
मानवी हक्काची, न्यायाची,
मानवतेची, आणि बंड करण्याची,
आणि उद्धरली कोटी कोटी कुळे,
दिन दुबदुबळ्यांची.!
चाललोय आम्ही, तुमच्याच वाटेने,
कोरून हृदयी, “शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा” बाण्याने,
घेऊन शिक्षण, करताहेत प्रगती तुमच्याच कृपेने,
रंजलेले, गांजलेले, समूचि दलीत,
आदिवासी, वनवासी ही,
तुम्ही दिलेल्या सवलतीने,
पण खेदाने सांगावेसे वाटते की,
विसरून तुम्हाला, रमलेत,
अन उबावताहेत खुर्च्या सरकारी अधिकाराच्या अन् सत्तेच्या दरबारात.!
पण बाबा एक सांगू का?
तुम ही हो, माता पिता,तुम् ही हो,
तुम ही हो, बंधू सखा, तुम ही हो,
तुम्हाला नाहीतर, कुणाल सांगणार ? तुमच्या महापरिनिर्वाणानंतर,
अन्याय,अत्याचाराच्या विरोधात, लढताहेत एकटीच, बनुनी शिलेदार एकांडे, लेकरे तुमचीच,
लाठ्या पोलिसांच्या झेलताहेत,
लेकरे तुमचीच,
निषेध ,मोर्चे,प्रतिकार ह्यांचा
ठेका, घेतलाय लेकरानी तुमच्याच,
बघताहेत सगळे, लांब उभे राहुनी,
संघर्ष लेकरांचा तुमच्याच,
फायदा असता, होती जमा,
दावा करती,हक्क सांगती, आरक्षणाचा,
पण ना दिसे तसबीर तुमची,
कुणाच्याच घरात.!
पण दिसे ना तसबीर तुमची,
कुणाच्याच घरात.!!
पण दिसे ना तसबीर तुमची,
कुणाच्याच घरात.!!!
जयभीम.
आपला,
अरुण निकम
9323249487
मुंबई.
दिनांक…26/07/2024.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत