व्यक्ती , समाज व देशाचे पालनपोषण करणारी शिक्षण व्यवस्था हवी :– प्रबुद्ध साठे
पुणे (देहूरोड) ::— आजची शिक्षण व्यवस्था ही सुशिक्षित बेरोजगारांची पैदास करणारी असून शिक्षणातून कर्तबगार पिढी तसेच व्यक्ती, समाज, व देशाचे पालनपोषण करणारी शिक्षण व्यवस्था हवी असे प्रतिपादन चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केले, ते देहूरोड धम्म भूमी येथे वर्षावास प्रारंभाचे उद्घाटन भाषणपर बोलत होते,, यावेळी देहूरोड धम्म भूमीचे विकास प्रणेते भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड, डॉ किर्तीपाल गायकवाड, अशोक वाघमारे, बहुजन संघटक चॅनेल चे राहुल खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते,
याप्रसंगी 10 वी, 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व धम्म प्रवचन देताना प्रबुद्ध साठे पुढे म्हणाले, देवाला नवस व देवभक्ती करून यशस्वी होता येत नाही, तर सातत्यपूर्ण प्रयत्न व आत्मविश्वास हि तुमची शक्ती असून त्यातूनच स्वतः चे व देशाचे भवितव्य घडवा, शिक्षणाला सामाजिक जाणीव , चारित्र्य व संस्काराची जोड हवी, आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवणारा विद्यार्थी कधीच अपयशी होत नाही , सुत्रसंचालन बीएसपीचे अशोक गायकवाड यांनी केले, बुद्ध विहार कृती समिती ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थीनी पालक उपासक, उपासिका बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत